उद्योजकताबिझनेस महारथी

पेपर विकणाऱ्या या व्यक्तीला उंदराच्या कार्टूनने अब्जाधीश बनवलं- वॉल्ट डिज्नी

नमस्कार! नवी अर्थक्रांतीमध्ये आपलं स्वागत आहे… स्टार्टअप आणि उद्योग क्षेत्रातील रंजक आणि उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. तेव्हा चॅनेल आत्ताच सबस्क्राइब करा. 

वॉल्ट डिज्नी यांचा जन्म ५ डिसेंबर १९०१ मध्ये अमेरिकेतील शिकागोमधील हेर्मोसा इथं झाला. वडिलांचं हातावरचं पोट. शेतात मजुरी करून ते कुटुंबाचं पालनपोषण करत होते. वॉल्ट यांना मोठा भाऊ होता रॉय, जो त्यांचा सर्वात जवळचा मित्र होता. वॉल्ट यांना लहानापासून चित्र रेखाटण्याची आवड होती. एकदा तर त्यांनी आपल्या घरची भिंत चित्रांनी भरून काढली आणि वडिलांचा बेदम मार खाल्ला. त्यांनी एकदा आपल्या शेजारी राहणाऱ्यांच्या घोड्याचं सुंदर चित्र काढलं. ते त्या शेजाऱ्यांना इतकं आवडलं की, त्यांनी ते वॉल्टकडून खरेदी केलं. वॉल्टच्या घराजवळ एक सलून होतं. ती जागा म्हणजे वॉल्टची चित्र रेखाटण्याची हक्काची जागा, कारण तिथल्या मालकाला वॉल्टची चित्र खूप आवडायची. तो ती त्याच्याकडून खरेदी करायचा. वॉल्ट त्याला चित्र विकायचा ते पैशासाठी नाही, तर तो मालक ती चित्रं त्याच्या भिंतीवर फ्रेम करून लावायचा आणि याचा वॉल्टला खूप आनंद व्हायचा.

walt disney 1

वॉल्टच्या वडिलांची खूप इच्छा होती कि आपली मुलं शिकावीत, पण परिस्थितीमुळं त्यांना शिक्षण देणं जमत नव्हतं. मुलांना शिकवलं पाहिजे म्हणून अधिक काम मिळण्यासाठी वॉल्टचं कुटुंब शिकागोला आलं. तिथं तो दिवसा शाळेत जायचा, तर रात्री शिकागो आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन चित्रकला शिकायचा. वडिलांना हातभार लागावा म्हणून वॉल्ट आणि त्याचा भाऊ रॉय वडिलांसोबत सकाळी वर्तमानपत्र टाकायचं काम करत होती. त्यामुळं झालं असं कि वॉल्टचं शिक्षणात लक्ष लागेना, पण काही झालं तरी त्यानं आपली चित्रकला सोडली नाही. आपल्या कल्पनाशक्तीतून तो जे जमेल ते रेखाटायचा.

म्हणून वॉल्ट यांनी आता ऍनिमेशन मालिका बनवायचं ठरवलं. १९२८ साली मिकी माऊसचा पहिला ॲनिमेटेड बोलपट स्टीमबोट विली प्रदर्शित झाला आणि मिकी जणूकाही सगळ्यांच्या गळ्यातील ताईतच झाला. आता मात्र वॉल्ट डिज्नी हा कलाकार काय आहे, त्याची कल्पनाशक्ती काय आहे हे सगळ्या जगाला कळलं. १९३५ साली मिकीला इंटरनॅशनल सिम्बॉल ऑफ गुडविल म्हणून गौरविण्यात आले. वॉल्टने मिकीला नुसता जन्मच दिला नाही, तर १९४७ पर्यंत त्याला स्वतःचा आवाजही दिला. मिकीमाऊस नंतर त्याची फॅमिली मिनी, डोनाल्ड डक पुढे सिन्ड्रेला, डंबो, बम्पी, हिमपरी आणि सात बुटके यांसारख्या अप्रतिम कलाकृतींची निर्मिती वॉल्ट डिज्नी यांनी केली.

The Story of Walt Disney 1

वॉल्ट डिज्नी यांनी निर्माता म्हणून ५७६, दिग्दर्शक म्हणून ११२ व अभिनेता म्हणूनही १०-१२ फिल्म्सची निर्मिती केली. वॉल्ट यांना जगातील कोणत्याही कलाकाराला मिळाले नसतील इतके पुरस्कार मिळाले. आज चित्रपटसृष्टीत सर्वोत्तम गणल्या जाणाऱ्या ऑस्करसाठी वॉल्ट यांना ५९ वेळा नामांकन मिळालं. तर यापैकी २२ वेळा त्यांना प्रत्यक्ष पुरस्काराने गौरवण्यात आलं. अशा या महान कलाकाराने १५ डिसेंबर १९६६ रोजी जगाचा निरोप घेतला.

मुलांना परिवारासह डिज्नी कॅरेक्टर्सला भेटता यावे, अशी जागा वॉल्ट शोधत होते. त्यामुळे मुलांना त्यांच्याबरोबर वेळ देता येईल आणि आनंद घेता येईल. यासाठी 1955 मध्ये पहिले डिज्नीलॅँड थीम पार्क तयार झाले. हेच पॉर्क आंतरराष्‍ट्रीय पर्यटन केंद्र ठरले. पहिल्या पार्कच्या यशानंतर दुसरे पार्क बनविण्याचा निर्णय घेतला गेला. वॉल्टचे 1966 मध्ये निधन झाले. त्यानंतर रॉय यांनी हे काम सुरूच ठेवले. 1971 मध्ये फ्लोरिडात दुसरा पार्क तयार झाला. आज जगात सहा डिज्नी थीम पार्क आहेत.

walt disney

अनेक अपयश सोसूनही वॉल्ट खचले नाहीत. नकारात्मकता, निराशा या गोष्टींना त्यांनी आपल्यापासून दूर ठेवले. माणूस कितीही कठीण परिस्थितीतून आला, तरी त्याची कला त्याला जगवते आणि ती योग्य दिशेने जोपासली गेली कि ती त्याला योग्य ती कीर्ती मिळवूनच देते. याच उत्तम उदाहरण त्यांनी प्रस्थापित केले. तुम्हीही आपल्या कला जोपासा, त्याला वाढवा काय माहित तुमच्यातील वॉल्ट डिज्नीसुद्धा असाच आकार घेईल.

हा लेख विडीयो मध्ये पहा

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button