उद्योजकताबिझनेस टिप्स
Trending

यशस्वी व्हायचं असेल, तर वेळ काढून मुकेश अंबानींचे ‘हे’ 5 नियम एकदा वाचाच

मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मालक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज ही तीच कंपनी आहे, जिने प्रत्येकाला फोन वापरण्याची सवय लावली होती. ही रिलायन्स कंपनी आज भारतातील सर्वाधिक मूल्य असणारी कंपनीही आहे. विशेष म्हणजे, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही १११ बिलियन डॉलर्स एवढी आहे. एवढं मोठं साम्राज्य, कोट्यवधी-अब्जो रुपये एका दिवसात किंवा एका रात्रीत कमावले जात नाहीत. यामागे त्यांचे वडील स्वर्गीय धीरूभाई अंबानी यांची कठोर मेहनत राहिली आहे. त्यांच्यानंतर मुकेश अंबानी यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे चालवत यशाच्या शिखरावर पोहोचवला आहे. तसं पाहिलं, तर मुकेश अंबानींना हा व्यवसाय वारशात मिळाला आहे, पण त्यांनीही आपलं डोकं लावून आणि कठोर मेहनत घेऊन एक वेगळी ओळख बनवली आहे. त्यामुळे आज आपण या लेखातून यशस्वी बनण्याच्या त्यांच्या ५ नियमांविषयी जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्हीही बिझनेस किंग बनू शकता.

यशस्वी बनण्यासाठी मुकेश अंबानींचे ५ नियम (Mukesh Ambani’s 5 rules to success)


१. धैर्यवान बना

मुकेश अंबानी यांनी यशस्वी बनण्यासाठी सांगितलेला पहिला नियम म्हणजे धैर्यवान बना. व्यवसायात किंवा जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात धैर्याशिवाय कोणीही मोठे यश मिळवले नाहीये. अर्थातच, तुम्ही एखादी मोठी गोष्ट करायला जाता, तेव्हा तुम्हाला थोडी भीती वाटते. मात्र, तुमच्यात दडलेला नायक शोधण्यासाठी तुम्हाला भीतीवर विजय मिळवावाच लागेल. धैर्याने, आत्मविश्वासाने कोणत्याही संकटावर मात करू शकता.

mukesh-ambani-5-rules-to-become-successful

२. समस्या शोधा आणि त्यावर तोडगा काढा

अंबानींचा दुसरा नियम असा की, एक उद्योजक म्हणून, तुम्हाला ज्या समस्येचे निराकरण करायचे आहे ती शोधणे खूप महत्वाचे आहे. अंबानी सांगतात, ममला युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (UDCT) मध्ये प्रोफेसर शर्मा मिळाल्याने मी धन्य झालो. ते नेहमी म्हणायचे की, मी तुम्हाला समस्यांची यादी देणार नाही. तुम्ही जाऊन कोणत्याही गोष्टीवर काम करू शकता. तुम्हाला एखादी समस्या सापडेल आणि मग तुम्हाला सापडलेल्या समस्येच्या आणि त्यावर शोधलेल्या निराकरणाच्या गुणवत्तेवर मी तुम्हाला ग्रेड देईन. त्यामुळे उद्योजकाला हेच नियम लागू होतात की, तो समस्या सोडवत नाही, तर तो प्रथम समस्या शोधतो. एकदा तुम्हाला समस्या सापडली की, तुम्ही ती सोडवता.

mukesh-ambani-5-rules-to-become-successful

३. कठोर मेहनत करा

अंबानी म्हणतात, तुमचे धावण्याचे शूज घाला, परंतु लक्षात ठेवा की, वैयक्तिक आणि व्यावसायिक यश हे स्प्रिंट (Sprint) नसून एक मॅरेथॉन आहे. आपण एका गतिमान जगात राहत असल्याने भाग्यवान आहोत, जिथे काहीही शक्य आहे. मात्र, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, असे रातोरात यश मिळत नाही. तुम्हाला समर्पित व्हावे लागेल. एकल मनाने राहावे लागेल आणि कठोर परिश्रम करावे लागेल. यातील कोणत्याच गोष्टीला पर्याय नाही. तसेच, हेही लक्षात ठेवा की, जीवनाच्या या मॅरेथॉनमध्ये आपले ध्येय साध्य करणे महत्वाचे आहे.

mukesh-ambani-5-rules-to-become-successful

४. उच्च उद्देशाची सेवा करा

वडील धीरूभाई अंबानी यांनी १०० डॉलर्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड सुरू केल्याचे मुकेश अंबानी सांगतात. ते म्हणतात, १९८० मध्ये जेव्हा मी व्यवसाय जॉईन केला, तेव्हा कंपनीचे बाजारमूल्य हे ३० किंवा ४० दशलक्ष डॉलर्स होते. पुढच्या ३० वर्षात, या देशाने दिलेल्या संधींमुळे आम्हाला भारतासाठी संपत्ती निर्माण करता आली.

माझ्या वडिलांचा मोठा विश्वास होता की, कोणताही व्यवसाय ज्याचा एकमेव उद्देश पैसा कमविणे हा आहे तो करणे योग्य नाही. खरं तर, व्यवसाय हा एक मोठा सामाजिक हेतू पूर्ण केला पाहिजे. रिलायन्सने आपले सर्व पैसे भांडवली बाजारातून आणि वैयक्तिक लहान भागधारकांकडून उभे केले, म्हणून आम्ही सामान्य भारतीयांपैकी फक्त रिलायन्समध्ये गुंतवणूक करून दहा लाख करोडपती निर्माण केले आहेत आणि हीच देशासाठी संपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. संधी निर्माण झाली की संपत्ती ही येतेच.

mukesh-ambani-5-rules-to-become-successful

५. अपयश स्वीकारा

अंबानी असेही म्हणतात की, अपयश हे सामान्य असते. सर्व यश पाहून, माझ्या स्वतःच्या बाबतीतही लोक हे पाहत नाहीत की, यशस्वी होण्यापूर्वी मी किती वेळा अयशस्वी झालो आहे. तुम्ही यशस्वी होण्यापासून एक पाऊल दूर आहात. त्यामुळे अपयशाने कधीही निराश होऊ नका. त्याच्याकडून शिका, पण हार मानू नका.

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button