जिंकलंस भावा!प्रेरणादायी

तुझ्या स्वप्नांचा विसर पडू देऊ नकोस…’, बायकोच्या या शब्दांनी त्याला बनवले जगप्रसिद्ध सिने-दिग्दर्शक

नोकरी मध्ये बॉस आपली ठासत आहे हे कळत असून पण नोकरी टिकवण्यासाठी धडपड करणारा मध्यमवर्गीय माणूस पण रोज संघर्ष करीतच असतो. पण कधी कधी हा संघर्ष खुप लांबतो. इतका लांबतो की आता याला शेवटच नाही अस वाटायला लागत. खुप लोक अशावेळेस Give Up करतात. आणि आयुष्यभर ‘काश …’ च मधुन टोचणी देणार फिलिंग घेऊन जगतात. काही लोक मात्र याला अपवाद असतात. ते टिकून राहतात, लढतात आणि जिंकतात पण. अशीच एक हृदयस्पर्शी संघर्षाची कथा आहे आंग ली ची. इंग्रजी चित्रपट पाहणाऱ्या लोकांसाठी हे नाव अपरिचित नाही. Brokeback Mountain, नुकताच येउन गेलेला आणि गाजलेला life of pie असे अनेक चित्रपट आंग ली ने दिग्दर्शित केले आहेत. आज जगातल्या आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये त्याचा समावेश होतो. पण इथपर्यंत मजल मारण्यासाठी त्याने जो भावनिक, आर्थिक संघर्ष केला त्याची हि कुठलाही आव न आणणारी, melodramatic नसणारी पण हृदयस्पर्शी कहाणी त्याच्याच शब्दात :

१९७८ मध्ये मी Illinois University मध्ये चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेण्याचा निर्णय पक्का केला. माझ्या वडिलांचा या माझ्या निर्णयाला तीव्र विरोध होता. त्यांनी माझ्या तोंडावर काही आकडेवारी फेकून मारली.: ‘दरवर्षी तुझ्यासारखे ५०००० लोक हे असल कुचकामी शिक्षण घेऊन कॉलेजच्या बाहेर पडतात आणि त्यांच्यासाठी नोकऱ्या किती असतात, तर फक्त २००. ‘तरी त्यांचा हा सल्ला ठोकरून मी अमेरिकेला जाणाऱ्या विमानात बसलो. पण त्यामुळे पिता – पुत्राच्या नात्याला कधीही न भरून येणारा तडा गेला. पुढच्या दोन दशकात आम्ही शंभरहून कमी वाक्य एकमेकांशी बोललो असू.

पण जेव्हा मी माझ शिक्षण संपवून बाहेर पडलो तेव्हा माझ्या वडिलांनी व्यक्त केलेली भीती कीती खरी होती हे मला पदोपदी जाणवायला लागलं. एक चिनी वंशाचा माणूस hollywood मध्ये काहीतरी करून दाखवेल असे कुणालापण वाटत नव्हतं. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतरची पुढची सहा वर्ष ही कधीही संपणार नाही असे वाटणाऱ्या अनिश्चिततेने भरलेली होती. या सहा वर्षांमधला बहुतांश वेळ मी अनेक दिग्दर्शक व संकलक यांचा सहायक म्हणून छोटी मोठी किरकोळ काम करण्यात व्यतीत केला. सगळ्यात वेदनादायक भाग हा मी लिहिलेलं स्क्रिप्ट घेऊन निर्मात्यांचे उंबरठे झिजवणे हा होता. त्याकाळात मला साधारणतः ३० निर्मात्यांकडून नकार मिळाला.

त्याच वर्षी मी ३० वर्षाचा झालो. एक जुनी चिनी म्हण आहे : तिशीत माणूस त्याच्या स्वतःच्या पायावर ठाम उभा असतो अशा अर्थाची. पण मी तर अजूनही धड स्वतःच्या प्राथमिक गरजा पूर्ण करू शकत नव्हतो. या अशा पडत्या काळात माझ्यासमोर फार कमी पर्याय शिल्लक होते. एक तर काही घडेपर्यंत वाट बघत बसायचं अथवा चित्रपट बनवण्याचं माझ स्वप्न सोडून द्याच.

या अनिश्चिततेच्या अंधाराने भरलेल्या काळात मला माझ्या बायकोने पाठबळ दिल. तिने तिची पदवी जीवशास्त्र या विषयातून घेतली होती आणि ती एका प्रयोगशाळेत नोकरी करत होती. पण तिच्या नोकरीमधून मिळणारे उत्पन्न आम्हाला पुरेल एवढे नव्हते. त्याचकाळात आम्हाला एक पुत्ररत्न झाले आणि आमच्या जबाबदाऱ्या अजून वाढल्या. घरात मी पैसे आणू शकत नाही या अपराधी भावनेतून मी घरकामांची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली. जेव्हा बायको कामावर जायची तेव्हा मी स्वयंपाक , साफसफाई आणि आमच्या मुलाच संगोपन अशी काम करत असे. फावल्या वेळात वाचन आणि संहिता लेखन चालूच होते. रात्रीच जेवण बनवून झाल की मी आमच्या मुलाला, घेऊन घरासमोरच्या पायऱ्यांवर बसून राही. मी माझ्या बायकोची आणि तो त्याच्या आईची वाट बघत.

हे असलं आयुष्य कुठल्याही पुरुषासाठी मानहानीकारकच. माझ्या सासू सासऱ्यांना हे डाचत असावं. त्यांनी माझ्या बायकोला काही पैसे देऊ केले. त्यांच्या मते मी या भांडवलातून एखाद चायनीज हॉटेल सुरु करावं जेणेकरून माझं स्वतःच काही उत्पन्न सुरु होईल. माझ्या बायकोने हे पैसे घ्यायला इन्कार केला. जेव्हा मला याबद्दल कळल तेव्हा मी सुन्न झालो. अनेक रात्री जागून काढल्यावर शेवटी मी निर्णयाप्रत आलो : माझं चित्रपट बनवण्याचं स्वप्न हे पूर्ण होणार नाही. सत्याला सामोरे जाण्याची वेळ आली आहे

जड अंत:करणाने मी जवळच्या एका कॉलेज मध्ये मी Computer Course ला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यावर मी निराशेच्या गर्तेत बुडून गेलो. माझ्या बायकोला हा माझ्या स्वभावातला फरक जाणवला. कॉम्प्यूटर क्लासचं वेळापत्रक तिने माझ्या बॅगमध्ये पाहिलं. त्या रात्री ती काहीच बोलली नाही.

दुसऱ्या दिवशी ती तिच्या कामाला जायला निघाली. मी सुन्नपणे बसून होतो. ती घराबाहेर पडली. पण अचानक तिच्या मनात काय आल कुणास ठाऊक. घराबाहेरच्या पायऱ्यांवर असताना ती पुन्हा वळली आणि एवढंच म्हणाली, “आंग , तुझ्या स्वप्नांचा विसर पडू देऊ नकोस.” तिच्या या एका वाक्याने जादूची कांडी फिरली. निराशेच्या गर्तेत गटांगळ्या खाणारं माझ स्वप्न पुन्हा जिवंत झालं. त्याचा पुनर्जन्म झाला.

मी ते कॉम्प्यूटर क्लासचं वेळापत्रक बॅगमधून बाहेर काढलं. त्याचे हळूहळू बारीक बारीक तुकडे केले आणि कचऱ्याच्या डब्यात ते फेकून दिले.

अर्थातच एका रात्रीत परिस्थिती बदलली नाही. पण काही दिवसांनी मला माझ्या स्क्रिप्ट साठी finance मिळाला. मी माझ्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. नंतर माझ्या कामाला काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार पण मिळाले. नंतर माझ्या बायकोने माझ्याशी बोलताना कबुली दिली,’ मला नेहमीच असा विश्वास होता की तुझा जन्म हा चित्रपट बनवण्यासाठीच झाला आहे. संगणक क्षेत्रात आधीच खूप लोक काम करत आहेत आणि त्यांना तुझी गरजपण नव्हती.”

(http://whatshihsaid.com/2013/02/26/ang-lee-a-never-ending-dream/) मुळ लेख इथे आहे.

Source : http://www.misalpav.com/node/27124

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button