लेखक्रीडा

Paris Olympics 2024: वडिलांनी कर्ज काढलं आणि मुलाला खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं!

Paris Olympics 2024: आज आपण एका अशा खेळाडूबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तो खेळाडू म्हणजे भारताला पॅरिस ऑलिंपिकमध्ये 50 मीटर रायफल, थ्री पोजिशन प्रकारात कांस्य पदक मिळवून देणारा स्टार! .स्वप्निल कुसळे (Swapnil Kusale)

कोल्हापूरच्या कांबळवाडीत ६ ऑगस्ट १९९५ रोजी स्वप्निलचा जन्म झाला, स्वप्निलचे वडील हे पेशाने शिक्षक, तर आई गावच्या सरपंच आहेत.

२०१५ वर्ष खऱ्या अर्थाने स्वप्नीलसाठी टर्निंग पॉईंट ठरलं, कारण याच वर्षी त्याने ऑलिंपिक पदक विजेता गगन नारंगला हरवून राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळवलं आणि याच वर्षी एशियन CHAMPIONSHIP मध्ये गोल्ड मेडलसुद्धा जिंकलं. याच यशाच्या जोरावर त्याला भारतीय रेल्वेने टीसीची नोकरी दिली. मात्र प्रवास अजून संपला नव्हता. स्वप्निलने आपली मेहनत दुप्पट केली आणि २०१७ च्या कॉमनवेल्थ गेममध्ये ब्रॉंझ मेडल पटकवलं. नॅशनल  CHAMPIONSHIP मध्ये गोल्ड आणि २०२२ च्या वर्ल्डकपमध्ये त्याचं विजेतेपद थोडक्यात हुकलं. मात्र त्या कामगिरीच्या बळावर त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपली एन्ट्री निश्चित केली आणि  मेडल जिंकून त्याने  महाराष्ट्राचा ७२ वर्षांचा ऑलम्पिक मेडलचा दुष्काळ संपवला.

नेमबाजी हा अत्यंत खर्चिक खेळ आहे. रायफल आणि इतर उपकरणांवर खूप खर्च येतो आणि सरावात वापरल्या जाणाऱ्या गोळ्याही महागड्या असतात. एकेकाळी, स्वप्निलला सरावासाठी गोळ्या खरेदी करण्यास पैसे नव्हते, पण त्याच्या वडिलांनी कर्ज घेत स्वप्निलला खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं.

स्वप्निलच्या इंस्टाग्राम बायोमधील एक वाक्य सध्या विशेष चर्चेत आहे: “वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही” – हे वाक्य त्याच्या अथक प्रयत्नांचे आणि धाडसाचे प्रतीक आहे. आता हे वाक्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.

जागतिक स्तरावर संपूर्ण देशाची मान उंचावणाऱ्या स्वप्निलला नवी अर्थक्रांती सलाम करते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रेरणादायी माहितीसाठी आम्हाला फॉलो नक्की करा. धन्यवाद!

आणखी वाचा:

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button