फेकून दिलेल्या नारळाच्या कवट्यांपासून लाखोंची कमाई | Success story of a young woman from Kerala.

नारळाच्या कवट्या आपण निरुपयोगी समजून फेकून देतो. पण याच नारळाच्या कवट्या Recycle करून केरळच्या एका तरुणीने लाखोंचा बिझनेस उभा केला आहे. आज आम्ही तुम्हाला अशा महिलेबाबत सांगणार आहोत, जिने कचरा म्हणून फेकल्या जाणाऱ्या नारळाच्या कवट्यांपासून कमाईचं नवं साधन शोधलं आणि या महिलेचं नाव आहे मारिया कुरियाकोस.
मारिया कुरियोकोस ही मुळची केरळच्या त्रिशुरची. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर ती स्पेनला शिकायला गेली. 2017 मध्ये तिला नोकरी लागली; पण 2019 मध्ये तिने नोकरी सोडून दिली. तिला स्वतःच असं काहीतरी करायचं होत. थोडं संशोधन केल्यावर तिला समजलं, की लोकं नारळाच्या कवट्या फेकून देतात; पण त्यापासून अनेक उपयोगी वस्तू बनू शकतात. मग तिने नारळाच्या कवट्या Recycle करायला सुरुवात केली आणि त्यापासून सजावटीचे सामान बनवले.
2019 मध्ये मारियाने Thenga Coco नावाने व्यवसाय सुरू केला. ती नारळाच्या कवट्या रिसायकल करून त्यापासून बाऊल, कँडल होल्डर तसेच प्लांट हँगर्स अशा विविध प्रकारच्या वस्तू बनवते.
सुरूवातीला तिने 150 किचन बाऊल बनवले. ते एका इव्हेंटमध्ये तसेच तिच्या मित्रपरिवाराला विकले. 60 रुपयाला एक बाऊल असा व्यवसाय तिने सुरुवातीला केला. त्यातून तिला 9000 रुपये मिळाले. मग तिने 1500 रुपयांची ड्रिलिंग मशीन घेतली. एकूण 4000 गुंतवणुकीतून हा व्यवसाय सुरू केल्याचं मारिया सांगते. आता तिच्याकडे महिला कामाला आहेत ज्या तिला हे प्रोडक्ट्स बनवायला मदत करतात. कोविड-19 मध्ये तिने तिचा व्यवसाय ऑनलाईन नेला, तेव्हा तिच्या व्यवसायाला खरी प्रसिद्धी मिळाली. त्यांचे जास्त ग्राहक हे मुंबई, दिल्ली आणि बंगलोर सारख्या शहरातून आहेत, जिथे लोकं इकोफ्रेंडली प्रोडक्ट्सबद्दल जास्त जागरूक आहेत.
पहिल्या वर्षी त्यांचा वार्षिक टर्नओव्हर 20 लाख रुपये होता, तर दुसऱ्या वर्षी तो 50 लाख रुपये इतका झाला. मागच्या आर्थिक वर्षात त्यांचा टर्नओव्हर 1 कोटींपेक्षा जास्त झाला आहे.
Thenga Coco :
Thenga Coco हा केरळमधील एक स्वदेशी ब्रँड आहे. मल्ल्याळम भाषेत थेंगा या शब्दाचा अर्थ नारळ असा होतो. या ब्रँडमध्ये कचरा मानला जाणाऱ्या नारळाच्या कवट्यांवर पुनर्प्रक्रिया व त्याचे पुनरुत्पादन केले जाते. ही कंपनी नारळाच्या कवचापासून टिकाऊ, पर्यावरणपूरक हस्तनिर्मित वस्तू बनवते. केरळमध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या या उद्योगाने अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. याशिवाय, कंपनी भविष्यात नारळाच्या कवट्यांपासून खेळणी आणि दागिने तयार करण्याचा विचार करत आहे, जे प्लास्टिकच्या खेळण्यांना सुरक्षित पर्याय ठरू शकतात.

थेंगा कोकोचे उत्पादन केवळ पर्यावरणपूरक नसून, हे महिलांना आर्थिक स्वावलंबनही प्रदान करते. कंपनीत 80% कर्मचारी महिला आहेत आणि त्यांच्या हातांनी ह्या वस्तू तयार केल्या जातात. ही उत्पादने स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध आहेत. कंपनीत 18 कर्मचारी आहेत, त्यातील 12 महिला असून, त्यांना लवचिक कामाच्या वेळा दिल्या जातात जेणेकरून त्या घरगुती जबाबदाऱ्यांसह काम करू शकतील.
मारियाची कल्पकता आणि कठोर परिश्रम यामुळे तिच्या व्यवसायाने अडथळ्यांवर मात करत आज स्वतःचा एक मोठा Brand बनवला आहे. मारिया यांच्या यशस्वी प्रवासातून हेच शिकण्यासारखे आहे की योग्य उद्दिष्टं, दृढनिश्चय आणि पर्यावरण संवर्धनासाठीची आंतरिक तळमळ यातून नक्कीच समाजात मोठे परिवर्तन घडवता येऊ शकते.
आणखी वाचा :
- अंध असूनही वयाच्या २३व्या वर्षी उभी केली ५०० कोटींची कंपनी
- आठवी नापास ते हजारो कोटींचा मालक. सीबीआय, रिलायन्स चालतात याच्या इशाऱ्यावर- त्रिशनित अरोरा
- शार्क टॅंकमधील नमिता थापर, भारतातील एकमेव Phar’Maa’ चा असा आहे प्रवास…