लेखरंजक-रोचक माहितीविज्ञान आणि तंत्रज्ञान

QWERTY Keyboard History: कीबोर्डची अक्षरे सरळ ‘A-B-C-D’ नसून ‘Q-W-E-R-T-Y’ अशी का असतात?

QWERTY Keyboard History: मोबाईलवर मेसेज टाईप करताना तुम्ही कधी विचार केलाय का, की ही अक्षरे एवढी विस्कळीत का असतात? याच्या मागचे खरे कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हा ‘QWERTY‘ लेआउट तुमचा टाईपिंगचा वेग कमी करण्यासाठी बनवला होता. १८०० च्या दशकात जेव्हा पहिला टाईपरायटर आला, तेव्हा अक्षरे ‘A-B-C-D’ अशी सरळ क्रमानेच होती. पण त्यामुळे लोक एवढ्या वेगाने टाईप करायचे की टाईपरायटरच्या Keys एकमेकांत अडकायच्या आणि मशीन जाम व्हायचे. यावर उपाय म्हणून १८७३ मध्ये ख्रिस्तोफर शोल्स यांनी एक भन्नाट युक्ती केली, त्यांनी इंग्रजीत सर्वात जास्त एकत्र वापरली जाणारी अक्षरे T आणि H एकमेकांपासून लांब ठेवली. यामुळे टाईपिंगचा वेग योग्य मर्यादेत राहिला, मशीन अडकणे बंद झाले आणि जन्म झाला आजच्या ‘QWERTY’ कीबोर्डचा! एक मजेदार गोष्ट म्हणजे, तुमच्या कीबोर्डची फक्त पहिली ओळ वापरून तुम्ही “TYPEWRITER” हा शब्द पूर्णपणे टाईप करू शकता. एकदा नक्की ट्राय करून बघा!

पहिली सुरुवात आणि हेन्री मिल

QWERTY Keyboard History: आज आपण जो आधुनिक कीबोर्ड वापरतो, त्याची पायाभरणी खूप वर्षांपूर्वी झाली होती. 1741 मध्ये इंग्लंडच्या हेन्री मिल यांनी पहिल्यांदा अशा एका उपकरणाचे पेटंट घेतले, ज्याच्या मदतीने कागदावर अक्षरे उमटवता येत होती.

हे यंत्र आजच्या कीबोर्डसारखे नव्हते, पण यामुळेच जगाला समजले की हाताने न लिहिता यंत्रानेही लिहिता येऊ शकते.

‘QWERTY’ लेआउटचा खरा शोधक

यानंतर 1868 मध्ये ख्रिस्तोफर शोल्स, कार्लोस ग्लिडन आणि सॅम्युअल सॉले यांनी मिळून पहिला व्यावहारिक टाइपरायटर बनवला. ख्रिस्तोफर शोल्स यांनाच पहिल्या आधुनिक टाइपरायटरचे जनक मानले जाते.

त्यांनीच ‘QWERTY’ लेआउट डिझाईन केले. सुरुवातीला अक्षरे सरळ रेषेत (A, B, C…) होती, पण त्यामुळे टाईप करताना यंत्राच्या Keys एकमेकांत अडकायच्या. म्हणून त्यांनी जास्त वापरली जाणारी अक्षरे दूर दूर ठेवली, जेणेकरून टायपिंगचा वेग योग्य राहील आणि मशीन अडकणार नाही.

‘QWERTY’ लेआउट का बनवला?

QWERTY Keyboard History: सुरुवातीला अक्षरे एका ओळीत (A, B, C…) होती. पण वेगाने टाईप करताना मशीनच्या कीज एकमेकांत अडकू लागल्या (Jamming). यावर उपाय म्हणून ख्रिस्तोफर शोल्स यांनी जास्त वापरली जाणारी अक्षरे लांब ठेवून ‘QWERTY’ लेआउट तयार केला!

50 लाख टाईपरायटरची विक्री!

केवळ टाईपरायटरच नाही, तर संदेश पाठवण्याच्या तंत्रज्ञानानेही कीबोर्डच्या विकासात मदत केली.1846 मध्ये रॉयल अर्ल हाऊस यांनी एक प्रिंटिंग टेलिग्राफ बनवला होता, ज्याला 28 पियानोसारखी बटणे होती.या बटणांवर वर्णमालेतील अक्षरे होती. यामुळे लांब अंतरावर संदेश पाठवणे खूप सोपे आणि वेगवान झाले होते.

जेव्हा संगणक आणि कीबोर्ड एकत्र आले…

1970 च्या आधी संगणकात माहिती (Data) भरण्यासाठी आजच्यासारखा कीबोर्ड नसायचा, तर संगणकासमोरील मोठे स्विचेस चालू-बंद करावे लागायचे. ते खूप अवघड होते. पण 1970 च्या दशकाच्या शेवटी Apple, कमोडोर आणि रेडिओ शॅक या कंपन्यांनी क्रांती केली. 

त्यांनी संगणकामध्येच कीबोर्ड इनबिल्ट (जोडून) देण्यास सुरुवात केली. यामुळे सामान्य माणसाला संगणक वापरणे शक्य झाले.

आजचा आधुनिक कीबोर्ड (IBM Model M)

QWERTY Keyboard History: IBM कंपनीने 1986 मध्ये ‘Model M’ कीबोर्ड बाजारात आणला. आज आपण जो 101 Keys चा लेआउट वापरतो आणि सर्वात वर ज्या F1 ते F12 (Function Keys) पाहतो, त्या याच मॉडेलमुळे सुरू झाल्या.

हा कीबोर्ड इतका परफेक्ट होता की आजचे विंडोज (Windows) कीबोर्ड्स याच रचनेवर आधारित आहेत.

आजचा हलका आणि आधुनिक कीबोर्ड!

QWERTY Keyboard History: मेम्ब्रेन तंत्रज्ञानामुळे आजचे कीबोर्ड खूप वजनाने हलके, पातळ आणि स्वस्त झाले आहेत, जे जुन्या जड मेकॅनिकल कीबोर्डपेक्षा खूप वेगळे आहेत. 1714 मधील एका साध्या कल्पनेपासून सुरू झालेला हा प्रवास आज आपल्या मोबाईल स्क्रीनवरील व्हर्च्युअल कीबोर्डपर्यंत येऊन पोहोचला आहे!

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button