लेखसरकारी योजना

LPG Gas Subsidy: तुमची गॅस सबसिडी बंद झाली आहे का?

LPG Gas Subsidy: महागाईच्या या काळात LPG गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून टाकतात. अशा वेळी शासनाकडून बँक खात्यात जमा होणारी गॅस सबसिडी हा एक मोठा आर्थिक दिलासा असतो. मात्र, अनेकदा तांत्रिक कारणांमुळे अचानक सबसिडीचे पैसे येणे बंद होते. तुमची सबसिडी जमा होत आहे की नाही, हे घरबसल्या मोबाईलवर कसं चेक करायचं? आणि ती बंद झाली असल्यास पुन्हा कशी चालू करायची? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया… 

१. तुमची गॅस सबसिडी का बंद होऊ शकते? 

जर तुमच्या खात्यात सबसिडीचे पैसे येत नसतील, तर त्यामागे ही ४ कारणे असू शकतात:-

बँक लिंक नसणे: तुमचे बँक खाते गॅस कनेक्शनशी जोडलेले नसेल.

KYC अपूर्ण: गॅस एजन्सी आणि बँक या दोन्ही ठिकाणी तुमचे आधार कार्ड लिंक किंवा ई-केवायसी (e-KYC) पूर्ण नसेल.

उत्पन्नाची अट: जर तुमचे किंवा तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर नियमानुसार गॅस सबसिडी मिळणे बंद होते.

दीर्घकाळ बुकिंग न करणे: तुम्ही खूप महिने गॅस सिलिंडर बुक केला नसेल, तरीही कनेक्शन तात्पुरते निष्क्रिय (Inactive) केले जाते.

२. मोबाईलवरून सबसिडी स्टेटस कसे चेक करावे?

LPG Gas Subsidy: तुम्ही Bharat Gas, HP Gas किंवा Indane पैकी कोणत्याही कंपनीचे ग्राहक असाल, तरीही तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबईलवर सोप्या पद्धतीने तुमचे स्टेटस चेक करू शकता.

स्टेप १: सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये www.mylpg.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

स्टेप २: होम पेजवर तुम्हाला कंपनीचे फोटो (Bharat, HP, Indane) दिसतील. तुमच्या कंपनीच्या सिलिंडरवर क्लिक करा.

स्टेप ३: मेनूमधून Give your feedback online किंवा Check LPG ID या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप ४: तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर किंवा १७ अंकी LPG ID टाकून सबमिट करा.

स्टेप ५: LPG Subsidy चा पर्याय निवडा, त्यानंतर Subsidy Related (PAHAL) वर क्लिक करा आणि नंतर Subsidy Not Received वर क्लिक करा.

स्टेप ६: आता तुमच्या स्क्रीनवर तुमचे सबसिडी लेजर (Subsidy Ledger) उघडेल. यात तुमच्या गेल्या काही महिन्यांचे बुकिंग, सबसिडीची रक्कम आणि ती कोणत्या बँक खात्यात जमा झाली, याची संपूर्ण माहिती दिसेल.

३. बंद झालेली सबसिडी कशी सुरू करावी?

LPG Gas Subsidy: जर तुमची ई-केवायसी (e-KYC) किंवा आधार लिंकिंग अपूर्ण असल्यामुळे सबसिडी थांबली असेल, तर तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीला भेट द्यावी लागेल. तिथे जाताना खालील कागदपत्रे सोबत ठेवा-

1.गॅस पासबुक. LPG Consumer Passbook ची झेरॉक्स.

2.बँक पासबुक. पहिल्या पानाची झेरॉक्स, ज्यात खाते क्रमांक आणि IFSC कोड स्पष्ट दिसेल.

3.ओळख आणि पत्त्याचा पुरावा (आधार कार्डची झेरॉक्स).

4.KYC फॉर्म. हा फॉर्म तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये मोफत मिळेल, तो भरून द्यावा.

LPG Gas Subsidy: हे फॉर्म आणि कागदपत्रे एजन्सीमध्ये जमा केल्यानंतर, साधारण २ ते ३ दिवसांत तुमचे केवायसी अपडेट होते. त्यानंतर तुम्ही जेव्हा पुढचा सिलिंडर बुक कराल, तेव्हा तुमची सबसिडी पुन्हा बँक खात्यात जमा होऊ लागेल. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का? आर्थिक नियोजनाच्या अशाच सोप्या आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी नवी अर्थक्रांतीला लगेच फॉलो करा.

आणखी वाचा :

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button