लेखआर्थिक

Insurance Claim: पावसाळ्यात गाडी पाण्यात अडकली किंवा झाड पडलं तर इन्शुरन्स मिळतो का?

Insurance Claim: सध्या पाऊस आणि पूर परिस्थिती काय धुमाकूळ घालतेय, हे आपण सगळेच बघतोय. अशात आपल्या डोळ्यांदेखत जीवापाड जपलेली, लाखो रुपयांची गाडी पाण्यात बुडताना पाहणं… म्हणजे कोणत्याही वाहनधारकासाठी काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग असतो हा. पण खरी लढाई सुरू होते पूर ओसरल्यावर… गाडी दुरुस्त करण्याची आणि इन्शुरन्स कंपनीकडून क्लेम मिळवण्याची! 

पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या एका छोट्याशा चुकीमुळं किंवा घाईगडबडीमुळं इन्शुरन्स कंपनी तुमचा लाखो रुपयांचा क्लेम एका झटक्यात ‘रिजेक्ट’ करू शकते! मग हक्काचा १००% क्लेम मिळवण्यासाठी नेमके कोणते नियम लक्षात ठेवायचे? चला,जाणून घेऊया

इंजिन चालू करण्याची चूक अजिबात करू नका!

पाण्यात बुडालेल्या गाडीचे इंजिन कधीही स्टार्ट करण्याचा प्रयत्न करू नका. 

याला ‘हायड्रोस्टॅटिक लॉक’ (Hydrostatic Lock) म्हणतात. जर तुम्ही स्वतः गाडी सुरू केली आणि इंजिन खराब झाले, तर इन्शुरन्स कंपनी क्लेम थेट रिजेक्ट करते.

आधी फोटो काढा, मगच पुढे बोला!

Insurance Claim: पाणी ओसरण्याची वाट पाहू नका. गाडी ज्या परिस्थितीत आणि ज्या जागेवर पाण्यात बुडाली आहे, 

तिथेच तिचे वेगवेगळ्या अँगलने फोटो आणि व्हिडिओ काढून घ्या. 

हे फोटो क्लेम पास करताना भक्कम पुरावा म्हणून काम करतात.

24 तासांच्या आत कंपनीला कळवा!

उशीर करू नका! गाडी पाण्यात बुडल्याची माहिती तुमच्या इन्शुरन्स कंपनीला किंवा एजंटला ताबडतोब (शक्यतो 24 ते 48 तासांत) माहिती द्या. 

उशिरा माहिती दिल्यास कंपनी क्लेम नाकारू शकते. फोनवर बोलून क्लेम नंबर (Claim Number) नक्की मिळवा.

स्वतः गाडी ओढत नेऊ नका, हायड्रोलिक टोईंग वापरा!

गाडी गॅरेजला नेण्यासाठी कंपनीच्या अधिकृत टोईंग सर्व्हिसची मदत घ्या. 

गाडी मॅन्युअली ओढल्याने नुकसान वाढू शकते. टोईंगचे बिल सांभाळून ठेवा. 

कारण काही पॉलिसीमध्ये टोईंगचा खर्चही परत मिळतो.

हे 4 कागदपत्रे सोबत ठेवा, क्लेम झटपट होईल!

Insurance Claim: क्लेम फाईल करताना खालील गोष्टी तयार ठेवा-

आरसी बुक (RC Book)

ड्रायव्हिंग लायसन्स (DL)

मूळ इन्शुरन्स पॉलिसी कॉपी

पुराचे फोटो आणि व्हिडिओ

तुमच्या पॉलिसीमध्ये ‘Engine Protection Cover’ आहे का?

Insurance Claim: पूर किंवा पाण्यात गाडी खराब झाल्यास सामान्य पॉलिसी इंजिनच्या नुकसानीचा खर्च पूर्णपणे उचलत नाही. 

पण जर तुमच्याकडे ‘इंजिन प्रोटेक्शन’ हा ॲड-ऑन कव्हर (Add-on Cover) असेल, 

तर इंजिन दुरुस्तीचा लाखो रुपयांचा खर्च इन्शुरन्स कंपनी देते.

नैसर्गिक आपत्ती कधीही सांगून येत नाही. ऐन वेळी धावपळ होऊ नये म्हणून ही माहिती सेव्ह करून ठेवा.  तुमच्या कुटुंबातील आणि मित्रांमधील वाहनचालकांना नक्की शेअर करा!

आणखी वाचा:

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button