तंत्रज्ञानाच्या वापराने भविष्यातील ‘या’ 5 समस्या होणार दूर!
तंत्रज्ञानाने माणसाचं आयुष्य सुकर बनवलं आहे. याच टेक इंडस्ट्रीत तुम्हाला भरपूर उद्योजक आणि नवोदित आजच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी काम करताना सापडतील. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. मात्र, आपण तंत्रज्ञानात प्रगती करत असलो, तरीही अवघ्या जगापुढे असंख्य अशा समस्या आहेत, ज्यावर तोडगा काढणे अत्यंत गरजेचे आहे.
एकीकडे पाहिलं, तर जगभरात असा एक घटक आहे, ज्याला अन्न, शुद्ध पिण्याचे पाणी किंवा वीज यांसारख्या मूलभूत स्त्रोतांपर्यंत पोहोचता आलेलेच नाहीये. मात्र, यशस्वी व्यवसाय सुरू करताना समाजात बदल घडवून आणू इच्छिणाऱ्या अनेक टेक संस्थापकांसाठी जगाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे बदलणारे उपाय तयार करणे, हे सर्वोच्च प्राधान्य बनले आहे. अशात, या लेखातून आपण अशा ५ समस्या पाहणार आहोत, ज्या तंत्रज्ञानाद्वारे लवकरात लवकर सोडवल्या जाऊ शकतात.
१. भूकेचा प्रश्न मिटवणे
जगभरात दोन वेळच्या जेवणासाठी लोक वणवण भटकताना दिसतात. खरं तर, प्रत्येकाला पुरेल इतके अन्न आहे, तरीही जवळपास एक अब्जाहून अधिक लोक दररोज रात्री उपाशी झोपतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर जगात प्रचंड विषमता आहे. अनेक लोकांकडे अन्न पिकवण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी आवश्यक जमीन किंवा पुरेसे उत्पन्न नसते. तसेच, आनुवांशिक अभियांत्रिकी आणि शेती पद्धतीतील प्रगतीमुळे आपल्याला स्वस्त आणि कार्यक्षमतेने पिके वाढवता येतील. याचा अर्थ, प्रत्येकासाठी अधिक उपलब्ध आणि परवडणाऱ्या अन्नाचा स्त्रोत तयार होईल.
२. असाध्य (Incurable) रोगावर तोडगा काढणे
फक्त जीनोमिक्समुळे (जीनोमिक्स हे एक जैविक क्षेत्र आहे जे जीनोमची रचना, कार्य, उत्क्रांती, मॅपिंग आणि संपादन यांचा अभ्यास करते.) रोगाबद्दलची आपली समज विकसित होत नाहीये, तर आरोग्य सेवेच्या वितरणामुळेही पूर्ण बदल होत आहे. जीवशास्त्राची आपली समज जसजशी सुधारत जाईल, तसतशी आपली औषधे आणि रोग शोधण्याच्या आणि बरे करण्याच्या पद्धतीही वाढतील. जीनोमिक्सचे आपले ज्ञान सतत विकसित होत आहे, जसे की सर्वसाधारणपणे रोगांबद्दलची आपली समज आहे. पुरेशा प्रगतीमुळे, आपण लवकरच इबोला आणि मलेरिया यांसारख्या प्राणघातक रोगांचा नाश करणाऱ्या रोगांवर उपचार शोधू शकू.
३. स्वस्त आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा देणे
येत्या काळात आपल्याला नवीन औषधे मिळाली नाही, तरीही नवीन आरोग्यसेवा तंत्रज्ञानामुळे लोकांपर्यंत स्वस्त आणि परवडणारी औषधे पोहोचवण्यात मोठा प्रभाव पडेल. हेल्थकेअर इनोव्हेटर्स हेल्थकेअर गुणवत्ता सुधारण्यासाठी सतत नवीन तंत्रज्ञानावर संशोधन करत आहेत. त्यामुळे आरोग्य क्रांती लवकरच पाहायला मिळू शकते. अशाप्रकारे आपण लवकरच आरोग्य निरीक्षण पद्धती आणि जुनाट आजार शोधण्याच्या नवीन पद्धतींमध्ये झेप घेऊ शकतो.
४. सर्वांना दर्जेदार शिक्षण देणे
आधीच्या काळात शिक्षण घेणे खूपच कठीण होते. मात्र, आता इंटरनेटमुळे जास्तीत जास्त लोकांना उच्च शिक्षणापर्यंत मजल मारता येत आहे. विद्यार्थी केव्हाही स्वस्त, वैयक्तिक अभ्यासक्रमांमधून कुठेही शिकू शकतात. आता विद्यार्थ्यांना एका जागी बसून शिक्षणाचे चांगले वातावरण मिळते, यामुळे त्यांना उच्च पदवी आणि उत्तम शिक्षणाचा अनुभवही घेता येतो. वर्गातील तंत्रज्ञान (In-Classroom Technology) अपंग विद्यार्थी आणि पारंपारिक वर्गात संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवण्याची संधी देते. विशेष म्हणजे, हे योग्य तंत्रज्ञानाशिवाय खूपच कठीण असते.
५. प्रत्येकासाठी स्वस्त वीज निर्मिती करणे
सध्या अक्षय ऊर्जेने वेग घेतला आहे. अलीकडेच, सौर ऊर्जा जगातील सर्वात स्वस्त ऊर्जा स्रोत बनली आहे. विकसनशील राष्ट्रांसाठी, जीवाश्म इंधनाला समर्थन देण्यासाठी महागड्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याऐवजी स्वस्त, अक्षय ऊर्जेच्या पर्यायांसह जाणे अर्थपूर्ण आणि फायदेशीर आहे. अक्षय ऊर्जा केवळ उत्पादनासाठी स्वस्तच नाही, तर ती आपल्या पर्यावरणासाठी देखील चांगली आहे, ज्यामुळे भविष्यातील ऊर्जा स्त्रोत म्हणून ती एक चांगला पर्याय बनते.