आसान है!प्रेरणादायी

‘दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल

हल्ली Social Media वर तुम्हाला इतके सारे  Motivational Speaker पाहायला मिळतील की विचारायची सोय नाही. YouTube वर साधं Motivation हा शब्द जरी टाइप केला तरी संदीप महेश्वरी, विवेक बिंद्रा, प्रिया कुमार, गौर गोपाल दास अशा कित्येक Motivational Speakers चे Channels ओपन होतील. ते आपल्याला नेहमी प्रेरणा देत असतात. त्यांच्या बोलण्यातून आपल्या रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींपासून ते जीवनातील अध्यात्माच्या, ध्यानाच्या अनेक गोष्टींपर्यंतची प्रेरणा मिळते. प्रेरणा ही अग्निसारखी असते. तिला जर इंधन पुरवलं नाही तर ती विझून जाते. ‘मला यशस्वी व्हायचंय, मला पैसा कमवायचाय’ या जिद्दीतूनच प्रेरणेचा जन्म होत असतो. जर तुमच्यात जिद्दच नसेल तर इंधन नसलेल्या वाहनाप्रमाणे तुमच्या यशाची गाडी धक्के खात खात धीम्या गतीने चालेल.

एका वाक्यात प्रेरणा म्हणजे काय सांगायचं झालं, तर प्रेरणा ही आपल्या आयुष्याला गती देणारी एक शक्ती आहे. ती तुम्हाला कोणाच्या बोलण्यातून मिळेल, वाचनातून मिळेल किंवा कृतीतून मिळेल. आमच्या घराशेजारी पाटील कुटुंबीय राहत होते. त्यांचा तुषार नावाचा मुलगा चांगल्या कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत होता. नम्र आणि इतरांप्रती नेहमी आदराची भावना बाळगणारा तुषार सगळ्यांच्याच आवडीचा होता. मात्र त्याचा भाऊ मंगेश व्यसनी आणि व्याभिचारी होता. दारू, सिगारेट, गांजाचं त्याला व्यसन होतं. तो आपल्या बायकोला देखील भरपूर मारायचा. एके दिवशी असंच त्याला कोणीतरी विचारलं. का रे तु असा वागतोस, दारू पिऊन का मारझोड करत असतोस? त्यावर मंगेश म्हणाला, “लहानपणी माझे बाबा दारू पिऊन आईला खूप मारायचे. रोज दारू पिऊन शिवीगाळ करायचे. त्याच वातावरणात मी वाढलो आणि मला देखील त्यांच्यासारखीच सवय लागली. कामाच्या आळसामुळे माझी ही अशी माझ्या वडिलांसारखीच अवस्था झाली.”

कुसुमाग्रजांच्या कणा कवितेतील तरुण. इतक्या मोठ्या संकटात देखील तो गुरुजींकडे पैसे नाही, तर पाठीवर एक प्रेरणेची थाप मागत होता. मित्रांनो हे जे प्रोत्साहन आहे ना, तेच नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळवून देत असतं. लहानपणी शाळेत गुणगौरव सोहळा असायचा. शालेय परीक्षा, खेळ, संगीत, नृत्य, वादन अशा प्रत्येक क्षेत्रात अव्वल असलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिलं जायचं. साहाजिकच त्यामुळे मुलांच्यात अजून चांगलं काम करण्याची ऊर्जा निर्माण व्हायची. आयुष्यात एकतरी अशी व्यक्ती असावी जी तुम्हाला नेहमी प्रेरणा देईल. नवीन काहीतरी करण्याचं बळ देईल आणि जर कोणी नसेलच तर बाह्य प्रेरणा मिळविण्यापेक्षा तुम्हीच स्वतःला प्रेरणा देऊन तुमच्यातील अंतर्गत प्रेरणेचा दरवाजा खुला करा. तुमच्यातील अंतर्गत प्रेरणेला बळ देऊन तिला भरभक्कम बनवा.

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button