यु-ट्युब सुरु करण्याचा हेतू ऐकून आश्चर्यचकित व्हाल
युट्यूब हा सर्वांच्याच परिचयाचा प्लॅटफॉर्म. दिवसभरात आपल्यापर्यंत जी काही माहिती पोहोचते, त्यामध्ये युट्युबचा वाटा मोठा आहे. कित्येक व्यक्तींना युट्युबच्या माध्यमातून ओळख मिळाली. सप्टेंबर २०२३ च्या रिपोर्टनुसार युट्युबवर ११४ मिलियन (११.४ कोटी) ॲक्टिव्ह युट्युब चॅनल्स आहेत आणि १०० हून अधिक देशांमधील २.६ बिलियन (२६० कोटी) पेक्षा जास्त लोकांकडे यु-ट्युब आहे, डेली युजर्सच्या बाबतीत बोलायचं झालं, तर ते 122 मिलियन (12.20 कोटी) पेक्षा जास्त आहेत. यावर एक युजर 100 पेक्षा जास्त चॅनल्स बनवू शकतो.
संशोधनानुसार एक युजर यावर सरासरी दररोज 19 मिनिटे वेळ घालवतो. युट्युब ही गुगल पाठोपाठ जगातील दुसरी सर्वात जास्त पाहिली जाणारी साईट आहे. 2020 मध्ये युट्युब शॉर्ट्सची सुरुवात झाल्यानंतर अगदी थोड्या कालावधीत त्यांची लोकप्रियता वाढू लागली. आता या शॉर्ट्सना सरासरी 30 अब्ज डेली व्ह्यूज मिळतात. युट्युबवर दर मिनिटाला 2,500 पेक्षा जास्त व्हिडिओज अपलोड केले जातात. सध्याला यु -ट्युब वर 800 मिलियन किंवा कदाचित त्याहीपेक्षा जास्त व्हिडिओज असतील. 80 टक्यांहून अधिक लोक यु-ट्युबचा वापर मनोरंजनासाठी करतात. उर्वरित लोक ते अन्य कारणांसाठी वापरतात.
पहिला यु-ट्युबर हा ‘जावेद करीम’ नावाचा व्यक्ती होता ज्याने ‘Me at zoo’ या कॅप्शनसहित त्याने पहिला व्हिडीओ अपलोड केला. पण प्लॅटफॉर्म सुरु करण्याचा मूळ उद्देश हा नव्हताच. कोणी आणि कशी केली याची सुरुवात आणि कसा आहे यु-ट्युबचा प्रवास हेच आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
यु-ट्युब ची सुरुवात –
14 फेब्रुवारी 2005 मध्ये यु-ट्युबची सुरुवात करण्यात आली. स्टीव्ह चेन, हर्ले आणि जावेद करीम हे ‘पे-पाल’ या अमेरिकन ई-कॉमर्स कंपनीत नोकरी करत होते. त्यांनी ती कंपनी सोडली आणि यु-ट्युब सुरु केले.
जावेद करीम जो यु-ट्युबच्या निर्मात्यांपैकी एक आहे त्याने यु-ट्युब वरती पहिला व्हिडिओ शेअर केला आणि त्याला 277 मिलियन व्यूज मिळाले. सुरुवात केल्यानंतर पहिल्या महिन्यातच यु-ट्युब ने 30,000 व्युअर्स ना आकर्षित केले.
सुरुवातीला वर्षाच्या शेवटी यु ट्युब ला 25 मिलियन व्युज आणि 2,000 अपलोड्स मिळाले. त्यावर अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओज ची विविधता हेच यु – ट्युब हिट होण्याचे पहिले कारण ठरले. सध्या यु-ट्युब वर DIY ते प्रोफेशनल म्युझिक व्हिडिओज अपलोड केले जातात. यु ट्युब वरती म्युझिक व्हिडिओज जास्त प्रमाणात पाहिले जातात. 13 Nov 2006 रोजी गुगल ने 1.6 बिलियन डॉलर्सना यु- ट्यूब विकत घेतले .
काय होता यु-ट्यूबचा मूळ हेतू
2016 मध्ये यु-ट्यूब च्या निर्मात्यांपैकी एक असणारे स्टीव्ह चेन यांनी एका परिषदेत सांगितले की युट्युब सुरु करण्याचा मूळ उद्देश्य हा नव्हता.खरतर आमही तिघांनी यु -ट्यूब एक व्हिडिओ साईट म्हणून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही ते यासाठी सुरु केले की लोक तिथे त्यांना कसा पार्टनर आहे हे सांगून व्हिडिओ डेटिंग करू शकतील. एवढाच काय तर ‘Tune in, hook up’ ही टॅगलाईन सुद्धा यु-ट्यूब ने वापरली. परंतु निर्मात्यांना जसे लक्षात आले की याने जास्त फायदा होऊ शकत नाही तेव्हा त्यांनी सर्व प्रकारच्या व्हिडिओजना प्लॅटफॉर्म खुला केला आणि त्याने यु-ट्यूब ला प्रचंड फायदा झाला.
तुम्हाला आजचा लेख कसा वाटला हे कंमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा.