एकेकाळी फुकट वाटूनही न खपणारा कोका-कोला आज १९३ देशांत विकला जातोय.
तुम्ही आजवर अनेकदा कोका कोलाचा एक घोट तरी घेतला असेलच. इतकंच नाही तर तुमच्या आई बाबांनी, आज्जी आजोबांनी कोका कोला ब्रॅंड माहीत नाही ही शक्य नाहीच.चला तर जाणून घेऊ ह्या जगप्रसिद्ध कोका कोला विषयी बरचं काही…
प्रत्येक गोष्टीला एक इतिहास असतो. एकदा सुरू झालेली गोष्ट लगेच यश मिळवते असे नाही त्यासाठी संयम, कठीण परिश्रम आणि अपयश पचविण्याची ताकद असणे महत्वाचे असते.
तर झालं अस की, 8 जुलै 1831 रोजी जॉन पेंबरटण या अमेरिकन farmactis चा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना संशोधनात रस होता, नवनवीन आणि नावीन्यपूर्ण औषधे तयार करणे हाच त्यांचा छंद होता. 1860 च्या काळात अमेरिकेत Vin Mariani ही वाइन लोकांच्या पसंतीस उतरली होती. आणि जॉन पेंबरटण यांनी ठरवलं की, आपणसुद्धा असच काहीतरी नावीन्यपूर्ण बनवायच. कोला या झाडाच्या पानांपासून बनविलेली ही वाइन अनेक मोठ-मोठ्या उद्योगपतींच्या पसंतीस उतरली होती. एतकचं नाही तर थॉमस एडिसण देखील vin mariani चे सेवन करायचे.
8 मे 1886 रोजी पेंबरटण यांनी आफ्रिकन कोला फ्रूट आणि कोकेन वापरुन एक पेय बनवलं. आणि त्याचे नाव कोका कोला असे ठेवले. आणि कोका कोलाने जगात आपली एक वेगळी ओळख तयार केली. कोलाच्या पानांचा आणि फळांचा वापर हा शारीरिक थकवा घालविण्यासाठी केला जायचा.
शारीरिक आणि मानसिक आजारावरील रामबाण काढा अशी जाहिरात करून कोका कोला विकला जायचा. तो काढा अर्थातच कोका कोला लोकांच्या पसंतीस इतका आला की, कोका कोला शिवाय लोकांना काहीच दिसत नव्हत. अल्पावधीतच कोका कोला लोकांच्या पसंतीस उतरला. अनेकांना कोका कोलाचे व्यसन देखील लागले. त्यात जॉन पेंबरटण काही बाकी नव्हते. त्यांना देखील कोका कोलचे व्यसन लागले.
आणि त्यांनी एसा ग्रिग्स कॅडलर यांना केवळ 2300 डॉलर ने कंपनीचे सगळे हक्क विकले.
आणि त्यांनंतर एसा ग्रिग्स कॅडलर यांनी कोका कोलाची रेसीपी बदलली. कोकेन काढून त्यांनी त्यात साखरेचे प्रमाण वाढविले. आणि त्याचवेळी बाजारात कोका कोलाचा प्रतिस्पर्धी तयार झाला. तो म्हणजे पेप्सी. कोका कोलच्या मागून आलेला पेप्सी ब्रॅंड देखील लोकांच्या पसंतीस उतरला.
जगप्रसिद्ध कोका कोला अनेकदा वादाचा विषय ठरला. कधी अल्कोहोल मुळे तरी कधी प्लॅस्टिकच्या प्रदूषणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला कोका कोला लोकांच्या मनातून काही उतरला नाही
आणखी वाचा
- जगातील सर्वात मोठ्या बँकेचे संस्थापक जे पी मोर्गन यांची कहाणी
- या माणसामुळे आपल्या घरापर्यंत वीज पोहचली- निकोला टेस्ला
- फोटोग्राफी क्षेत्रातला पहिला कॅमेरा बनवणारा अवलिया – जॉर्ज इस्टमन
- जगातील पहिली गाडी बनवणारा कार्ल बेंझ
- यांच्यामुळे सामान्य माणसाच्या दारात गाडी उभी राहिले – हेन्री फोर्ड
- सायकलच्या दुकानापासून १० हजार कोटींपर्यंत पहिले मराठी उद्योगपती – लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर
- मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, तोच मुलगा जगातील सर्वात मोठा संशोधक बनला
- अवघ्या भारताच भविष्य बदलणाऱ्या टाटा कंपनीची सुरुवात कशी झाली?