इलॉन मस्कच्या ‘या’ 5 टिप्स ठरतील तुमच्याच फायद्याच्या, शेवटचा सल्ला सर्वात महत्त्वाचा
‘कोई भी धंदा छोटा नहीं होता और धंदे से बड़ा धर्म कोई नहीं होता’, हा डायलॉग आपण ऐकला असेलच. त्यामुळे आज आपण आजच्या लेखात धंदा/व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ टिप्स पाहणार आहोत. विशेष म्हणजे, या टिप्स इतर कुणी नाही, तर स्वत: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या इलॉन मस्कच्या आहेत. मस्क साहेबांची संपत्ती आजघडीला २१० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. म्हणजे आपल्या मुकेश अंबानींच्या दुप्पट.
मस्क हा PayPal, Tesla Motors, आणि SpaceX यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा संस्थापक आहे. मस्क त्याच्या नाविण्यपूर्ण विचारासाठी आणि जोखीम पत्करण्याच्या स्वभावासाठी ओळखला जातो. ज्या व्यक्तीच्या घरी श्रीमंती नांदते अशा मस्कला अनेकदा व्यवसाय चालवण्याबाबत सल्ला विचारला जातो. तेव्हा या लेखातून आपण त्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी सांगितलेल्या ५ महत्त्वाच्या टिप्स कोणत्या आहेत, हे पाहूयात…
इलॉन मस्कने व्यवसाय सुरू करण्यासाठी सांगितलेल्या ५ टिप्स (Elon Musk’s 5 Best Tips for Running a Business)
१. तुमच्या कामाप्रती कायम उत्साही राहा
धनाढ्य इलॉन मस्क (Elon Musk) याच्या मते यशस्वी होण्यासाठी तुम्ही जे काही करत आहात, त्याच्याबद्दल कायम उत्साही असलं पाहिजे. तो म्हणतो, “लोकांनी तेच केलं पाहिजे, ज्याची त्यांना आवड आहे. यामुळे त्यांना इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त आनंद मिळेल.”
२. जोखीम पत्करा
इलॉन मस्क असेही सांगतो की, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल आणि तुमच्या बँक अकाऊंटमध्ये भर घालायची असेल, तर तुम्ही जोखीम पत्करण्यासाठी तयार असला पाहिजेत. २०१२ सालच्या एका मुलाखतीत मस्क म्हणाला होता की, “प्रत्येकजण एकाच साच्यात बसण्याचा प्रयत्न करत आहे. कारण, जोखीम घेण्याविरूद्ध एक प्रचंड पूर्वाग्रह आहे.” मस्कचा असाही विश्वास आहे की, कोणतीच जोखीम न घेणे, ही सर्वात मोठी जोखीम आहे. विशेषत: अशा जगात जे सातत्याने बदलत आहे. अपयशी ठरण्याची हमी एकमेव स्ट्रॅटेजी देते, ती म्हणजे जोखीम न घेणे.
३. कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा
इलॉन मस्क हा त्याच्या कामाच्या नैतिकतेसाठी ओळखला जातो. मस्क म्हणतो की, “चिकाटी ही खूप महत्वाची आहे. जोपर्यंत तुम्हाला हार मानायला भाग पाडले जात नाही, तोपर्यंत तुम्ही हार मानू नका.” मस्कचा विश्वास आहे की, यशस्वी होण्यासाठी लोकांना ‘जीवतोड काम’ करावे लागेल. इतरांपेक्षा जास्त मेहनत केल्याने तुमच्या यशाची शक्यता वाढेल.
मस्क असेही म्हणतो की, “एकसारख्या कामासाठी जर इतर लोक आठवड्याचे ४० तास कामात घालवत असतील आणि त्याच वेळी तुम्ही आठवड्याचे १०० तास काम करत असाल, तर तुम्हाला माहिती आहे की, त्यांना जी गोष्ट साध्य करण्यासाठी जिथे वर्ष लागतं, ते तुम्ही अवघ्या ४ महिन्यात कराल.” त्यामुळे तुम्ही कठोर परिश्रमासाठी तयार असले पाहिजे. तसेच, तुमचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागेल.
४. कायम चिकाटी ठेवा
इलॉन मस्क आज जगातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. इथपर्यंत पोहोचण्याच्या त्याचा मार्ग सोपा नव्हता. त्याच्याकडेही अपयशाचा मोठा वाटा होता, पण त्याने चिकाटी दाखवली आणि हार मानली नाही. मस्कने स्थापन केलेल्या Zip2 आणि PayPal या दोन्ही कंपन्यांमधून बाहेर पडल्यानंतर २००८च्या मंदीच्या लाटेत त्याची Tesla आणि SpaceX या दोन्ही कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होत्या. त्यामुळे अनेकांना वाटले की, आता मस्क पुन्हा एकदा अपयशाच्या खाईत लोटला जाईल. पण मस्कने त्याच्या आधीच्या चुकांमधून धडा घेतला आणि आज तो जगातली श्रीमंत व्यक्तींच्या मांडीला मांडी लावून बसला आहे. अशाप्रकारे कोणीही स्वतःचे आर्थिक टप्पे गाठण्यासाठी आणि प्रेरणा शोधण्यासाठी त्याच्या अनुभवातून शिकू शकतो.
५. स्वतःमध्ये गुंतवणूक करत राहा
इलॉन मस्क याचा एकच सर्वोत्तम सल्ला कोणता असेल, तर तो हा की, “तुम्ही गोष्टी चांगल्या प्रकारे कशा करता येतील याचा सतत विचार करा आणि स्वतःला प्रश्न विचारा.” वयाच्या अवघ्या ८ वर्षापर्यंत मस्क हा दिवसाला तब्बल १० तास वाचन करत होता. त्याची पुस्तक वाचण्याची आवड इतकी प्रचंड होती की, लायब्ररीत वाचण्यासाठी त्याच्याकडील पुस्तके संपली म्हणून त्याने संपूर्ण एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका वाचण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या वयात, मस्क सातत्याने काहीतरी शिकण्यावर आणि स्वत:मध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करायचा. त्याने स्वतःला प्रोग्राम करायला शिकवले आणि वयाच्या १२ व्या वर्षी त्याने 500 डॉलर्समध्ये व्हिडिओ गेम लिहिली आणि विकली देखील. पुढे मस्कने पेनिल्व्हेनिया विद्यापीठातून भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्रात दुहेरी पदवी घेतली. मस्कने सतत स्वत:मध्ये आणि त्याच्या स्वप्नांमध्ये गुंतवणूक केली. आज पाहा मस्कने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
मस्क हा आपल्या काळातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक आहे. मस्कने अनेक व्यवसाय शून्यातून उभे केले आहेत. तसेच, आपली राहण्याची आणि काम करण्याची पद्धत बदलण्यात मदत केली आहे. मस्कचा सल्ला कोणत्याही व्यवसायात लागू केला जाऊ शकतो.
तुम्ही जर मस्कच्या या टिप्सचे पालन केले, तर तुम्हालाही यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
वाचक मित्रांनो, तुम्हालाही हा लेख आवडला असेल, तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसेच, तुम्हाला आणखी कोणत्या व्यक्तींच्या टिप्स वाचायला आवडतील, या कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा.
आणखी वाचा
- RBI चं मोठं पाऊल! Paytm Payment Bank वर घातली बंदी, एका क्लिकवर वाचा A to Z प्रश्नांची उत्तरे
- UPI मधील नवीन बदल: आर्थिक व्यवहार अधिक सोपे आणि सुरक्षित
- तंत्रज्ञानाच्या वापराने भविष्यातील ‘या’ 5 समस्या होणार दूर!