दिनविशेष

गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते?

भारतीय शिकवणीनुसार ज्या कुणा सजीव आणि निर्जीव वस्तूचा आपण जगण्यासाठी वापर करतो, त्या वास्तुप्रती कृतज्ञतेचा भाव असला पाहिजे. सामान्य माणसाला हीच शिकवण समजावी म्हणून पुराणांच्या पानांमध्ये गोष्टींच्या रूपाने त्या व्यक्त केल्या जातात एवढंच. त्यामुळे अश्या एखाद्या खास दिवशी आपण ज्या देवाची किंवा वस्तूची पूजा करतो ती का करतोय याची जाणीव असली पाहिजे, केवळ श्रद्धा आणि भक्ती हा त्याचा मागचा प्रमुख उद्देश नसून कृतज्ञतेचा भाव माणसाच्या मनात कायम राहावा हीच त्यामागची खरी शिकवण आहे, त्यामुळे कायम लक्ष्यात ठेवा की भारतीय संस्कृती ही कधीही मागासलेली नव्ह्ती तर कायम पुढारलेलीच होती केवळ आपण त्याचा अर्थ समजायला कमी पडलो एवढंच.

गुरुपौर्णिमेचे पौराणिक महत्व:

आज आपण अश्याच एका महत्वाच्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत. मनुष्य जन्म घेतल्यानंतर थेट मृत्यू येईपर्यंत माणूस काही ना काही शिकत असतो, त्याच्या आजूबाजूचं वातावरण आणि त्यातील अनेकविध घटक त्याला पदोपदी शिकवण देत असतात. मग या सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञतेचा भाव बाळगला पाहिजे की नाही? नक्कीच हो!! आणि यातच गुरुपौर्णिमेच्या दिवसाचं सार दडलेलं आहे. सर्वात अगोदर हे जाणून घेऊया की गुरुपौर्णिमा आपण का साजरी करतो? पुराणांच्या आधारे हा दिवस म्हणजे महर्षी व्यास यांची जन्मदिवस आणि म्हणूनच या दिवसाला व्यास पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. प्रसिद्ध ग्रंथ महाभारताचे रचते आणि चारही वेदांचे विभाजन करणारे वेदव्यासच होते.असं म्हणतात महर्षी व्यासांना दिव्यदृष्टी प्राप्त होती आणि या शक्तीच्या जोरावरच त्यांनी कलयुगातील घटनाक्रम ओळखला होता. व्यासांच्या याच अलौकिक ज्ञानामुळे त्यांना कैक युगानंतरही मानाचं स्थान प्राप्त आहे. ऋषी पराशर आणि निषाद कन्या सत्यवती यांना आषाढ पौर्णिमेला पुत्ररत्न प्राप्त झाले आणि आजही आपण हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतो.

233084184 25903594 aaf4 48fa bc0f 2b7e2755dfd8

गुरु म्हणजे कोण?

असं म्हणतात एका नवजात बालकाचा देखील गुरु असतो आणि ती म्हणजे आई. जिच्या नावातच आत्मा आणि ईश्वर दोन्ही सामावलेले आहेत ती जन्मदात्री आई. आईच तिच्या लेकराला चालायला, बोलायला, जेवायला शिकवते, स्वतःच्या पायावर उभं करते. त्यामुळे जन्मापासूनच माणसाचं शिक्षण एकार्थाने सुरु होतं असं म्हटलं तरीही ते वावगं ठरणार नाही. “अंधकार निरोधित्वात गुरुर-इत्यभिधियते” याचा अर्थ असा की आपल्या आयुष्यातील अंधकार नष्ट करणारा म्हणजे गुरु होय. जीवनाच्या टप्याटप्यावर भेटलेला प्रत्येक माणूस या-ना-त्या प्रकारे आपल्याला शिकवण देऊन जातो, आणि म्हणूनच ही प्रकृती आणि त्यात सामावलेला प्रत्येक घटक हा आपला गुरु आहे. लहान मूल जसजसं मोठं होऊ लागतं तसं त्याला शाळेत भरती करतात आणि पुढे त्याचा शैक्षणिक प्रवास सुरु होतो. शैक्षणिक प्रवासात समोर आलेले शिक्षक आणि मार्गदर्शक आपल्या मनातील गुरु या शब्दाच्या धूसर चित्राला आकार देतात. शैक्षणिक जीवनानंतर माणसाचा खरा प्रवास सुरु होतो, नवीन आव्हानं आणि स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न इथूनच सुरु होतो. अश्या या कठीण काळात भेटणारा प्रत्येक मार्गदर्शक देखील गुरु’च ठरतो नाही?

आजच्या जगात गुरुचे महत्व काय?

काळ कितीही बदलत असला तरीही गुरुचं महत्व कधीही कमी होऊ शकत नाही आणि म्हणूनच आपल्या आयुष्यात येणाऱ्या अश्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञतेचा भाव मनात असणं महत्वाचं आहे. तुम्ही कदाचित आजूबाजूला पाहिलं असेल शाळकरी मुलं किंवा कॉलेजला जाणारे तरुण शिक्षकांची खिल्ली उडवतात, वेळ जाण्यासाठी शिक्षकांच्या नावाने मजा-मस्ती केली जाते. मात्र एकदा स्वतःला विचारून बघा की हे कितपत योय आहे. मित्रपरिवाराच्या आनंदासाठी शिक्षकांची टर उडवणं, त्यांना नावं ठेवणं, नकला करणं हा आपल्या शिकवणीचा भाग नाही. तरुण वयात मजा-मस्ती नक्कीच करावी मात्र त्यात कुणावर शिंतोडे फेकणं योग्य नाही.

WhatsApp Image 2024 07 20 at 4.24.03 PM

भारताच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर आपल्याकडे पिढ्यांपिढ्यांपासून गुरुशिष्य परंपरा चालत आली आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण ज्यांना आपण भगवंताचा परमअवतार मानतो, त्यांचे पूजन करतो त्या भगवंताने देखील गुरुचे शरण मिळवलेच होते. गुरु सांदीपनी असुद्या किंवा गुरु वसिष्ठ भगवंताला देखील गुरुची गरज भासलीच आणि आपण तर क्षुल्लक माणसं आहोत.

आणखी वाचा:

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button