पेपर आणि दूध विकून २२ लाख लोकांना नोकरी देणारी ‘वॉलमार्ट’ उभी करणारे ‘सॅम वॉल्टन’
एक असा काळ होता, जेव्हा रोजच्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या दुकानांमध्ये फिरावं लागत असे. सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळत नसत. पण काळ बदलला आणि किराणा दुकानांची जागा आता बिग बाजार, डी- मार्टसारख्या मोठाल्या रिटेल शॉप्सनी घेतली. या रिटेल शॉप्सच्या क्षेत्रात जगातील सर्वात मोठं असलेलं नाव म्हणजे वॉलमार्ट. बेकरी प्रॉडक्टपासून ते चिकन, फिशपर्यंत आणि भाजीपाल्यापासून ते सुंदर, सुंदर Showpiece पर्यंत तुम्हाला इथे सगळंच अगदी स्वस्तात मिळून जातं. तुम्हाला हव्या असलेल्या, नको असलेल्या आणि तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी देखील तुम्हाला Walmart मध्ये दिसतात.
वॉलमार्टचा विषय काढायचं कारण म्हणजे, बरोबर 106 वर्षांपूर्वी 29 मार्च 1918 रोजी अमेरिकेच्या ओक्लाहोमा शहरात walmart च्या संस्थापकाचा जन्म अमेरिकेतल्या एका गरीब शेतकरी घरामध्ये झाला. त्यांच्या जन्मदात्यांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती, पण या संघर्षावर मात करुन त्यांनी वॉलमार्टचं महाकाय साम्राज्य उभं केलं. हे साम्राज्य उभं करणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव आहे सॅम वॉल्टन.
वडिलांकडे असलेल्या शेतीमध्ये घरखर्चही भागत नसे. त्यामुळे अखेर नाईलाजानं सॅमचे वडील थॉमस वॉल्टन यांना आपलं शेत विकून एका नातेवाईकाकडे विमा एजंट म्हणून नोकरी करावी लागली. सॅम अभ्यासात हुशार होता. पण घरातली आर्थिक परिस्थिती खालावत चालली होती. वडिलांचे उत्पन्न अपूरे पडत होते. या परिस्थितीमुळे सॅम अस्वस्थ होता. पैसे कमावण्यासाठी 15 वर्षांचा सॅम शाळेसोबतच घरच्या गाईचं दूध विकण्याचं काम करू लागला. तसेच घरोघरी पेपर टाकण्याचं कामही त्यांनी सुरु केलं. कष्ट आणि शिक्षणाच्या जोरावर आपली परिस्थिती नक्कीच बदलेल यावर त्याचा विश्वास होता. पैसे नाहीत म्हणून शिक्षण सोडण्यऐवजी उलट कॉलेजच्या फीससाठी त्याने कॉलेज सांभाळून एका रेस्टॉरंटमध्ये तसेच वेगवेगळ्या रिटेल स्टोअरमध्ये देखील काम करायला सुरुवात केली. University of Missouri मध्ये Admission घेऊन Economics विषयात डिग्री घेऊन College मधील ईगल स्काऊटचा award देखील सॅमने मिळवला.
असा हा कष्टाळू सॅम दुसऱ्या महायुद्धात आर्मीत भरती झाला. Captain पदापर्यंत पोहोचला. सॅमने आपण एक कर्तव्यशील नागरिक असल्याचे दाखवून दिले. Military तून 1945 साली बाहेर पडून सॅमने आपली एक वेगळी ओळख बनवायचं ठरवलं. त्यासाठी त्याने Ben Franklin नावाचं छोटसं किराणा दुकान खरेदी केलं. मात्र त्यासाठी अर्थातच अडथळा होता तो पैशांचा. Military तून मिळालेल्या केवळ 5000 हजारांमध्ये स्टोअर उभं करणं कठीण होतं, म्हणून आपल्या सासऱ्यांकडून कर्ज घेऊन त्यांनी तोट्यात गेलेल्या त्या दुकानाला पुन्हा नव्याने उभे केले. घरात लागणाऱ्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्याने आपल्या दुकानात ठेवल्या. लोकांमध्ये असलेल्या डिस्काऊंटच्या भुकेला ओळखून त्याने discount द्यायला सुरुवात केली. तोट्यात सुरू झालेले सॅमचे दुकान आता चांगलेच चालत होते.
जवळजवळ 10-15 वर्ष दुकान अगदी चांगलेले. दुकानासाठी घेतलेले कर्ज देखील सॅमने केव्हाच चुकते केले. या दुकानाच्या प्रगतीमुळे सॅमची घरची परिस्थिती एकूणच पालटली. मात्र काही वर्षांनंतर सॅमला ते दुकान त्याच्या पूर्वीच्या मालकाला परत द्यावे लागले. आत्ता त्याला पुन्हा नवी सुरुवात करायची होती.
मोठ्या शहरात राहणाऱ्या लोकांना नियमित शॉपिंग करण्यात रस नव्हता. उलट छोट्या शहरात किंवा दुर्गम गावांमध्ये राहणारी मंडळी नियमितपणे शहरांमध्ये येऊन आपल्याला आवश्यक अशा सामानांची खरेदी करतात. हे सॅम यांच्या लक्षात आलं. त्यामुळे केवळ मोठ्या शहरांपुरतं मर्यादीत राहण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा आहे हे सॅम वॉल्टन यांना जाणवले. त्यानंतर वॉल्टन यांनी आपले धोरण बदलले. आता त्यांनी विकसित होत असलेल्या छोट्या गावांवर आपलं लक्ष्य केंद्रीत केलं.
या गावात वॉल्टन यांनी मोठे-मोठे दुकानं उघडण्याचा सपाटा लावला. सॅम वॉल्टन यांनी आता आपल्या व्यापाराचा सर्व पोत बदलला होता. त्यांनी दुकानात घरामध्ये रोज लागणारी प्रत्येक वस्तू ठेवण्यास सुरुवात केली. त्याची किंमतही बाजारभावापेक्षा कमी ठेवली. ग्राहकांना एकाच छताखाली सर्व वस्तू कमी किंमतीमध्ये वॉल्टन देऊ लागले. वॉल्टन यांचा हा निर्णय म्हणजे आत्महत्या आहे. असं त्यांच्या सहकारी आणि मित्रांना वाटत असे. तसा इशाराही त्यांनी वॉल्टन यांना दिला होता. पण वॉल्टन यांना यांच्या डोळ्यांना यशस्वी व्यवसायाचं चित्र स्पष्ट दिसत होतं. यामुळे रिटेल विश्वात क्रांती होईल असा त्यांना ठाम विश्वास होता. त्यानंतरच्या काळात त्यांचा हा विश्वास खरा ठरला.
तर मित्रांनो, Walton यांनी Walmart खेड्यात देखील उभे केले. आजही आपण पाहतो की गावातील लोकांना बाजारासाठी, अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी शहरात जावं लागतं आणि walton यांनी लोकांचा हाच प्रॉब्लेम ओळखून छोट्या छोट्या गावात देखील walmart चे छोटे छोटे स्टोअर उभे केले. लोकांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या. या बिझनेस आयडियाने संपूर्ण अमेरिकेत Walmartचे जाळे विणले. आज Wallmart चा Turnover 611 Billion Dollars इतका आहे. फक्त इतकंच नाही, तर गुगलवर साधं Richest family in the World? असा प्रश्न केला तरी एका क्षणात Walton Family चं नाव पहिलं येतं.
सॅम वॉल्टन यांनी आपल्या कामाने जगात कीर्ती मिळविली. पेपर आणि दूध विकण्यापासून सुरू झालेला प्रवास आयुष्याच्या अशा टप्प्यावर येऊन थांबला जिथे संपूर्ण जग त्यांचा आदर्श घेऊन चालत होतं. Bill Gates, Jack Ma सारखे उद्योजक Sam Walton यांचाच आदर्श घेऊन अब्जाधीश बनले. मात्र 4 एप्रिल 1992 रोजी संपूर्ण जगाला बिझनेस शिकविणाऱ्या आणि रिटेल व्यवसायाचा जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अवलियाचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. पण Walmart च्या रूपाने Sam Walton अजरामर झाले.
तुम्ही मोठं स्वप्न पाहत असाल, तर ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक कष्ट आणि योग्य वेळी योग्य काम करणं आवश्यक आहे. त्यासाठी वेगळे विचार आणि वेगळी समजूतही हवी. हेच वॉलमार्ट यांच्यापासून शिकण्यासारखं आहे
आणखी वाचा
- जगातील सर्वात मोठ्या बँकेचे संस्थापक जे पी मोर्गन यांची कहाणी
- या माणसामुळे आपल्या घरापर्यंत वीज पोहचली- निकोला टेस्ला
- फोटोग्राफी क्षेत्रातला पहिला कॅमेरा बनवणारा अवलिया – जॉर्ज इस्टमन
- जगातील पहिली गाडी बनवणारा कार्ल बेंझ
- यांच्यामुळे सामान्य माणसाच्या दारात गाडी उभी राहिले – हेन्री फोर्ड