आज ज्या संगणकामुळे आपलं आयुष्य सुखकर झालं त्या संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावला. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १७९१ला लंडनमध्ये झाला. लहानपणासूनच गणितात अत्यंत हुशार असणारे चाल्स बॅबेज हे एक गणितज्ञ, तत्त्वज्ञ, संशोधक आणि मेकॅनिकल इंजिनिअर होते. त्यांनी १८१२-१३ मध्ये गणितीय समीकरणे सोडवणारे कॅल्क्युलेटर बनवले होते. आपले गणितीय ज्ञान वापरून चाल्स बॅबेज यांनी एक मशीन बनवलं जे मोठमोठी गणित कमी वेळात सोडवत होतं. १८२२ मध्ये तयार झालेल्या या मशीनचं नाव बॅबेज यांनी डिफरन्स इंजिन असं ठेवलं, पण आणखी संशोधन करण्यासाठी पैसे कमी पडल्यामुळे त्यांना हे काम अर्ध्यातच सोडावं लागलं. पुढं आणखी संशोधन करत त्यांनी याच मशीनच पुढचं व्हर्जन १८४२ मध्ये बनवलं. ज्याचं नाव त्यांनी अनॅलिटीकल इंजिन असं ठेवलं. या मशीनचं वैशिष्ट्य म्हणजे याला इनपुट दिल्यानंतर, त्याच्यावर प्रोसेसिंग करत आणि दिलेल्या माहितीची प्रिंट काढत, ती माहिती स्टोअरसुद्धा करत होते. हेच अनॅलिटीकल इंजिन म्हणजे जगातला पहिला संगणक. हे यंत्र पुर्णपणे मॅकॅनिकल असून त्यात कोणत्याही प्रकारचा विद्युतपुरवठा वापरला गेला नव्हता. असे असले तरी आधुनिक संगणकाचे सर्व मुलभूत घटक त्यात समाविष्ट होते. या अनॅलिटीकल इंजिनचा आकार एका खोलीएवढा होता,तर याचं वजन अनेक पटीने जास्त होतं.हे इंजिन वाफेवर चालणार होतं. चार्ल्स बॅबेज यांना हे इंजिन बनवण्यासाठी ब्रिटिश सरकारने फंडिंग केलं होतं. चार्लस बॅबेज यांनी तयार केलेले Analytical Engine हाच आधुनिक संगणकाचा पाया आहे असे म्हटले जाते. म्हणूनच चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक म्हणतात. असे हे व्यक्तिमत्त्व १८ ऑक्टोबर १८७१ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचा अर्धा मेंदू The Hunterian Museum इथे व अर्धाScience Museum, London इथे जतन करून ठेवलेला आहे.