


जेआरडी यांचा जन्म 29 जुलै 1904 रोजी रतन दादाभॉय व सूनी टाटा यांच्या पोटी पॅरिस येथे झाला. ते टाटा ग्रुपचे चौथे अध्यक्ष होते.

जेआरडींचं बालपण फ्रान्समध्ये गेलं. तर शिक्षण लंडन, जपान, फ्रान्स आणि भारतात झालं. त्यांना केंब्रिजमधून इंजिनिअरिंग करायची इच्छा होती, पण वडिलांनी व्यवसाय सांभाळण्यासाठी भारतात बोलावून घेतलं.

बिनपगारी अॅप्रेंटिस म्हणून त्यांनी कंपनीत कामाला सुरुवात केली.
वयाच्या 22 व्या वर्षी ते टाटा सन्सचे डायरेक्टर बनले, तर 34 व्या वर्षी कंपनीचे चेअरमन बनले.

भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक म्हणून जेआरडी ओळखले जातात. ते भारताचे पहिले कमर्शिअल पायलट होते. कराची ते मुंबई
हे पहिलं विमान त्यांनी स्वतः उडवलं होतं. त्यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्स स्थापना केली. ज्याचं नाव नंतर एअर इंडिया झालं.

जेआरडी अध्यक्ष झाले तेव्हा टाटांच्या 14 कंपन्या होत्या. निवृत्तीच्या वेळेस ही संख्या 95 पर्यंत पोहोचली. ग्रुपचा महसूल 100 दशलक्ष डॉलर्सवरून 5 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. टीसीएस, टायटन, टाटा मोटर्स, वोल्टास, एअर इंडिया इत्यादी कंपन्या जेआरडींच्याच काळात सुरु झाल्या.

त्यांनी कामगारांसाठी दिवसात 8 तास काम, मोफत आरोग्यसेवा, भविष्य निर्वाह निधी, अपघात विमा योजना सुरु केली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा मेमोरिअल कॅन्सर रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल इत्यादी संस्था स्थापना करण्यात भूमिका बजावली.

जेआरडी हे पहिले आणि एकमेव उद्योगपती आहेत, ज्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे. फ्रान्सचा लिजन ऑफ ऑनर हा सर्वोच्च नागरी सन्मान सुद्धा त्यांना दिला गेला. भारतीय हवाई दलातील एअर व्हाईस मार्शल हे मानद पद त्यांना देण्यात आले होते. हवाई क्षेत्रातील

एक उद्योजक म्हणून मिळणारे कोणतेही यश अपूर्ण आहे.
– जेआरडी टाटा