दिनविशेष

श्रीमंती ज्याच्या घरी नांदते, ते बर्नार्ड अरनॉल्ट आहेत तरी कोण? एलोन मस्क अन् बिल गेट्सलाही टाकलंय मागे

img 125557 bernardarnault gettyimages 160724991 2048x2048 1

कोण आहेत बर्नार्ड अरनॉल्ट?

सध्या फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही २२८ अब्ज डॉलर्स इतकी आहे. आज बर्नार्ड अरनॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या मांडीला मांडी लावून बसतात. एलोन मस्क (२०२ अब्ज डॉलर्स) आणि जेफ बेझोस (१९८ अब्ज डॉलर्स) हेदेखील बर्नार्ड यांच्या खाली असून अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. लक्झरी गुड्स क्षेत्रातील त्यांचे सम्राज्य जगभरात पसरलेले आहे. लुई व्हिटॉन, डिओर, फेंडी, टॅग ह्यूअर, बल्गरी आणि जिव्हान्ची सारख्या प्रसिद्ध लक्झरी ब्रँड त्यांच्या मालकीचे आहेत. ८० वर्षांच्या वयातही बर्नार्ड अविरत काम करत आहेत आणि नवीन उंची गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.

bernard arnault get awarded

केव्हा बनले होते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती?

बर्नार्ड अरनॉल्ट यांनी यापूर्वी डिसेंबर २०१९, जानेवारी २०२०, मे २०२१ आणि जानेवारी २०२४ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान मिळवला होता.

कधी केली होती कारकीर्दीची सुरुवात?

इंजिनियरिंग पदवी घेतल्यानंतर बर्नार्ड यांनी वडिलांच्या बांधकाम व्यवसायात काम करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांची महत्त्वाकांक्षा त्यांना अधिक काहीतरी करण्यास प्रवृत्त करत होती. फॅशन क्षेत्राची त्यांना मोठी आवड होती. त्यात यशस्वी होण्याची त्यांना खात्री होती. १९७१ साली बर्नार्ड यांनी फॅशन क्षेत्रात पदार्पण केले. तसेच, स्वतःची कंपनी स्थापन केली. क्रिएटिव्हिटी आणि व्यवसायिक कौशल्य यांच्या मिश्रणामुळे बर्नार्ड यांची कंपनी झपाट्याने यशस्वी झाली. अनेक प्रसिद्ध फॅशन ब्रँड त्याच्या एलव्हीएमएच (LVMH) कंपनीच्या स्वामित्वाखाली आले आणि बर्नार्ड जगातील सर्वात शक्तिशाली फॅशन सम्राट बनले.

SIMHV2WNNJOL7AGODORSAW2F3M

टिफनी अँड कंपनीही केली खरेदी

जानेवारी २०२१मध्ये बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या एलव्हीएमएच कंपनीने अमेरिकन ज्वेलरी कंपनी टिफनी अँड कंपनीही १५.८ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केली होती. ही कोणताही लक्झरी ब्रँड खरेदी करण्याची आतापर्यंतची सर्वात मोठी डील ठरली होती.

द टर्मिनेटर नावाने झालेले प्रसिद्ध

सन १९८५मध्ये फ्रान्सच्या सरकारने बर्नार्ड यांनी दिवाळखोरीत निघालेली टेक्सटाईल कंपनी बुसॉक खरेदी केली होती. त्यानंतर दोन वर्षांच्या आतच त्यांनी कंपनीतील ९ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले होते. त्यानंतर त्यांनी याच्या डिओर ब्रँड वगळून अधिकतर संपत्ती विकली. तेव्हापासून बर्नार्ड अरनॉल्ट यांना ‘द टर्मिनेटर’ म्हटले जाऊ लागले.

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button