पेपर विकणाऱ्या या व्यक्तीला उंदराच्या कार्टूनने अब्जाधीश बनवलं- वॉल्ट डिज्नी
आपल्या प्रत्येकाला विचारलं की, तुझ्या बालपणीच्या आठवणी सांग, तर त्या आठवणीत सगळ्यांची एक कॉमन आठवण असेल ती म्हणजे कार्टून. आणि त्यातही मिकी माउस, डोनाल्ड डक, सिन्ड्रेला यांनी तर आपलं बालपण सुंदर केलंय. या कार्टून्सप्रमाणेच त्यांना जन्म देणाऱ्या अवलियाचं आयुष्य देखील तितकंच कलात्मक पण संघर्षपूर्ण होतं. आज जागतिक चित्रपटसृष्टीत सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी त्याला ५९ वेळा नामांकन मिळालं आणि त्यापैकी २२ वेळा त्याला पुरस्कार मिळाला. या अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक, ध्वनिअभिनेता, रेखाचित्रकार आणि उद्योजक असणाऱ्या कलाकाराचे नाव आहे वॉल्ट डिज्नी…
नमस्कार! नवी अर्थक्रांतीमध्ये आपलं स्वागत आहे… स्टार्टअप आणि उद्योग क्षेत्रातील रंजक आणि उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. तेव्हा चॅनेल आत्ताच सबस्क्राइब करा.
वॉल्ट डिज्नी यांचा जन्म ५ डिसेंबर १९०१ मध्ये अमेरिकेतील शिकागोमधील हेर्मोसा इथं झाला. वडिलांचं हातावरचं पोट. शेतात मजुरी करून ते कुटुंबाचं पालनपोषण करत होते. वॉल्ट यांना मोठा भाऊ होता रॉय, जो त्यांचा सर्वात जवळचा मित्र होता. वॉल्ट यांना लहानापासून चित्र रेखाटण्याची आवड होती. एकदा तर त्यांनी आपल्या घरची भिंत चित्रांनी भरून काढली आणि वडिलांचा बेदम मार खाल्ला. त्यांनी एकदा आपल्या शेजारी राहणाऱ्यांच्या घोड्याचं सुंदर चित्र काढलं. ते त्या शेजाऱ्यांना इतकं आवडलं की, त्यांनी ते वॉल्टकडून खरेदी केलं. वॉल्टच्या घराजवळ एक सलून होतं. ती जागा म्हणजे वॉल्टची चित्र रेखाटण्याची हक्काची जागा, कारण तिथल्या मालकाला वॉल्टची चित्र खूप आवडायची. तो ती त्याच्याकडून खरेदी करायचा. वॉल्ट त्याला चित्र विकायचा ते पैशासाठी नाही, तर तो मालक ती चित्रं त्याच्या भिंतीवर फ्रेम करून लावायचा आणि याचा वॉल्टला खूप आनंद व्हायचा.
वॉल्टच्या वडिलांची खूप इच्छा होती कि आपली मुलं शिकावीत, पण परिस्थितीमुळं त्यांना शिक्षण देणं जमत नव्हतं. मुलांना शिकवलं पाहिजे म्हणून अधिक काम मिळण्यासाठी वॉल्टचं कुटुंब शिकागोला आलं. तिथं तो दिवसा शाळेत जायचा, तर रात्री शिकागो आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन चित्रकला शिकायचा. वडिलांना हातभार लागावा म्हणून वॉल्ट आणि त्याचा भाऊ रॉय वडिलांसोबत सकाळी वर्तमानपत्र टाकायचं काम करत होती. त्यामुळं झालं असं कि वॉल्टचं शिक्षणात लक्ष लागेना, पण काही झालं तरी त्यानं आपली चित्रकला सोडली नाही. आपल्या कल्पनाशक्तीतून तो जे जमेल ते रेखाटायचा.
वयाच्या १६व्या वर्षी वॉल्टनं शिक्षण थांबवलं तेव्हा पहिल्या महायुद्धाच वारं वाहत होतं. आपणही सैन्यात जावं म्हणून वॉल्ट प्रयत्न करत होता, पण त्याच वय कमी असल्यामुळं त्याला प्रवेश मिळाला नाही. मग तो एका रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करू लागला. त्या रुग्णवाहिकेला देखील त्याने आपल्या चित्राने रंगवून टाकले, पण रुग्णवाहिकेचा चालक हे आपलं स्वप्न नाही. त्याच्यातील कलाकार जागा झाल्यावर त्यानं ती नोकरी सोडली आणि तो कॅन्सास शहरात आला. व्यंगचित्रकार किंवा अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करू लागला. पण त्यात काही त्याला यश आलं नाही. नंतर त्याने आपला सहकारी आयवर्क्स याच्या सोबत मिळून एक स्टुडिओ चालू केला. एका फिल्म कंपनी सोबत काम करत तो ऍनिमेशनचे बारकावे शिकला. या अनुभवातून त्याने २० वर्षांच्या वयात नवीन कंपनीची स्थापना केली. लाफ-ओ-ग्राम्स ही एक मालिका तयार केली, जी खूप लोकप्रिय झाली. पण केवळ तीन वाढत्या कर्जामुळे वॉल्ट यांची ही कंपनी चांगलीच डबघाईला आली. कंपनीतील कर्मचाऱ्यांचे वेतनही थकले. अखेर कंपनी दिवाळखोरीत गेली. आयुष्यात अपयशाचे डोंगर कोसळत होते. मात्र तरीही वॉल्ट यांनी हार मानली नाही. जीव तोडून ते प्रयत्न करीत राहिले.
वॉल्ट डिज्नी यांचा हा चढउतार चालूच होता. नंतर त्यांचा भाऊ रॉयकडचे अडीचशे डॉलर आणि ५००-६०० डॉलर्सचे कर्ज यातून एका गॅरेजमधे काम सुरू झाले. या पैशातून दोघांनी मिळून डिस्ने ब्रदर्स ही संस्था चालू केली. ज्याचं नाव नंतर त्यांनी द वॉल्ट डिस्ने स्टुडिओ असं ठेवलं. यात आयवर्क्स देखील त्यांना मदतीला होताच. या स्टुडिओने ‘ओस्वाल्ड-द रॅबिट’ नावाची मालिका सुरु केली. जी प्रचंड लोकप्रिय झाली. त्या मालिकेची लोकप्रियता पाहता हॉलीवूडच्या प्रसिद्ध युनिव्हर्सल पिक्चर्सने करार करून दुसरी मालिका तयार केली. मालिका तर खूपच चालली. पण भागीदाराने त्याला धोका देऊन त्याने बनवलेले हे कार्टून आपल्या नावावर केले.
काही लोकांच्या मते वॉल्टने “मिकी” हे पात्र त्यांनी एका रेल्वे प्रवासात तयार केले, तर काहीजण असे म्हणतात, की १९२८ मध्ये घरात निराश अवस्थेत बसला असताना वॉल्टला तेथेच बघितलेल्या उंदराच्या चिमुकल्या पिल्लावरून हे कॉमिक कार्टून करावे वाटले. या कार्टूनचे नाव त्याने “मोरटाइमर” असे ठेवले होते. पण मुलांना हे नाव उच्चारणे अवघड होईल,असे पत्नीने सांगितल्यावर, त्यांनी ते बदलून मिकी असं छोटंसं नाव ठेवलं. हाच तो दोन पायांवर पळणारा मस्तीखोर मिकी माऊस. मिकीचा पहिला मूक चित्रपट Plane Crazy तयार झाला, पण तो काळ असा होता कि मूकपटांची मागणी कमी झाली होती.
Exciting part of the story
म्हणून वॉल्ट यांनी आता ऍनिमेशन मालिका बनवायचं ठरवलं. १९२८ साली मिकी माऊसचा पहिला ॲनिमेटेड बोलपट स्टीमबोट विली प्रदर्शित झाला आणि मिकी जणूकाही सगळ्यांच्या गळ्यातील ताईतच झाला. आता मात्र वॉल्ट डिज्नी हा कलाकार काय आहे, त्याची कल्पनाशक्ती काय आहे हे सगळ्या जगाला कळलं. १९३५ साली मिकीला इंटरनॅशनल सिम्बॉल ऑफ गुडविल म्हणून गौरविण्यात आले. वॉल्टने मिकीला नुसता जन्मच दिला नाही, तर १९४७ पर्यंत त्याला स्वतःचा आवाजही दिला. मिकीमाऊस नंतर त्याची फॅमिली मिनी, डोनाल्ड डक पुढे सिन्ड्रेला, डंबो, बम्पी, हिमपरी आणि सात बुटके यांसारख्या अप्रतिम कलाकृतींची निर्मिती वॉल्ट डिज्नी यांनी केली.
वॉल्ट डिज्नी यांनी निर्माता म्हणून ५७६, दिग्दर्शक म्हणून ११२ व अभिनेता म्हणूनही १०-१२ फिल्म्सची निर्मिती केली. वॉल्ट यांना जगातील कोणत्याही कलाकाराला मिळाले नसतील इतके पुरस्कार मिळाले. आज चित्रपटसृष्टीत सर्वोत्तम गणल्या जाणाऱ्या ऑस्करसाठी वॉल्ट यांना ५९ वेळा नामांकन मिळालं. तर यापैकी २२ वेळा त्यांना प्रत्यक्ष पुरस्काराने गौरवण्यात आलं. अशा या महान कलाकाराने १५ डिसेंबर १९६६ रोजी जगाचा निरोप घेतला.
मुलांना परिवारासह डिज्नी कॅरेक्टर्सला भेटता यावे, अशी जागा वॉल्ट शोधत होते. त्यामुळे मुलांना त्यांच्याबरोबर वेळ देता येईल आणि आनंद घेता येईल. यासाठी 1955 मध्ये पहिले डिज्नीलॅँड थीम पार्क तयार झाले. हेच पॉर्क आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र ठरले. पहिल्या पार्कच्या यशानंतर दुसरे पार्क बनविण्याचा निर्णय घेतला गेला. वॉल्टचे 1966 मध्ये निधन झाले. त्यानंतर रॉय यांनी हे काम सुरूच ठेवले. 1971 मध्ये फ्लोरिडात दुसरा पार्क तयार झाला. आज जगात सहा डिज्नी थीम पार्क आहेत.
अनेक अपयश सोसूनही वॉल्ट खचले नाहीत. नकारात्मकता, निराशा या गोष्टींना त्यांनी आपल्यापासून दूर ठेवले. माणूस कितीही कठीण परिस्थितीतून आला, तरी त्याची कला त्याला जगवते आणि ती योग्य दिशेने जोपासली गेली कि ती त्याला योग्य ती कीर्ती मिळवूनच देते. याच उत्तम उदाहरण त्यांनी प्रस्थापित केले. तुम्हीही आपल्या कला जोपासा, त्याला वाढवा काय माहित तुमच्यातील वॉल्ट डिज्नीसुद्धा असाच आकार घेईल.
तर ही होती वॉल्ट डिज्नी यांची जीवनकहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या उद्योजकांच्या गोष्टी ऐकून आयुष्याचे धडे गिरवण्यासाठी चॅनेल आताच सबस्क्राईब करा.
आणखी वाचा
- जगातील सर्वात मोठ्या बँकेचे संस्थापक जे पी मोर्गन यांची कहाणी
- या माणसामुळे आपल्या घरापर्यंत वीज पोहचली- निकोला टेस्ला
- फोटोग्राफी क्षेत्रातला पहिला कॅमेरा बनवणारा अवलिया – जॉर्ज इस्टमन
- जगातील पहिली गाडी बनवणारा कार्ल बेंझ
- यांच्यामुळे सामान्य माणसाच्या दारात गाडी उभी राहिले – हेन्री फोर्ड
- सायकलच्या दुकानापासून १० हजार कोटींपर्यंत पहिले मराठी उद्योगपती – लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर
- मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, तोच मुलगा जगातील सर्वात मोठा संशोधक बनला
- इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या
- अवघ्या भारताच भविष्य बदलणाऱ्या टाटा कंपनीची सुरुवात कशी झाली?