शाळेत जाण्याच्या वयात उभारली कंपनी, टर्नओव्हर आहे तब्बल 100 कोटी रुपये, वाचा प्रेरणादायी कहाणी
मुलं ज्या वयात खेळतात-बागडतात आणि शाळेत जात असतात, त्याच वयात मुंबईत राहणाऱ्या एका मुलाने तब्बल १०० कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. १८ वर्षीय मुलाच्या या कंपनीत २००हून अधिक लोक काम करत आहेत.
आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात, ज्या खूपच सामान्य असतात. मात्र, त्यातही दूरदृष्टी असणारे व्यक्ती असं काही शोधतात, ज्यामुळे त्यांच्यासोबतच शेकडो लोकांचं भलं झाल्याशिवाय राहत नाही. असंच काहीसं असामान्य काम केलंय तिलक मेहता नावाच्या मुलानं. हा मुलगा इतर कुणी नसून पेपर एन पार्सल या १०० कोटींची उलाढाल करणाऱ्या कंपनीचा संस्थापक आहे. शाळेत जाण्याच्या वयात तिलकने ही कंपनी कशी उभारली, हेच सांगणारा हा लेख.
कुटुंब
आज तिलक मेहताचे वय १८ वर्षे आहे. सन २००६मध्ये गुजरातमध्ये जन्मलेला तिलक पेपर एन पार्सल (Paper N Parcel) या कुरिअर कंपनीचा संस्थापक आहे. तिलकच्या कुटुंबाविषयी जाणून घ्यायचं झालं, तर तिलकचे वडील विशाल मेहता एक लॉजिस्टिक कंपनीशी जोडलेले आहेत. तिलकची आई काजल मेहता या गृहिणी आहेत. तसेच, तिलकला एक बहीणदेखील असून तिचं नाव तन्वी मेहता असं आहे.
कशी सुचली कल्पना?
तिलक मेहता जेव्हा १३ वर्षांचा होता, तेव्हा एकेदिवशी वडिलांच्या थकव्यामुळे त्याला व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवण्याची कल्पना सुचली. तिलक त्याच्या वडिलांना ऑफिसहून घरी परतल्यानंतर जेव्हाही स्टेशनरीचे सामान आणायला सांगायचा, तेव्हा त्याला वाईट वाटायचे. वडिलांचा थकवा पाहून तो सतत त्यांना हे सांगू शकत नव्हता की, त्याला शाळेसाठी स्टेशनरी हवीये. एकदा काय झालं की, तिलक त्याच्या काकांकडे सुट्ट्यांसाठी गेला होता. त्यावेळी घरी परतताना तो त्याची पुस्तके त्यांच्या घरी विसरला. मात्र, काही दिवसांनी परीक्षा सुरू होणार होत्या, त्यामुळे तिलक मेहताला ती पुस्तके हवी होती.
जेव्हा त्याने कुरिअर एजन्सीशी संपर्क साधला, तेव्हा समजले की, पुस्तक कुरिअर करण्यासाठी पुस्तकांच्या किमतीपेक्षा जास्त रुपये खर्च होत आहेत. एवढंच नाही, तर इतके सारे रुपये खर्च करूनही त्याचे पुस्तक एका दिवसात पोहोचले नाही. इथेच तिलकच्या डोक्यात व्यवसायाच्या कल्पनेने जन्म घेतला.
तिलक मेहताने त्याच्या वडिलांसोबत आपल्या व्यवसायाच्या योजनेविषयी चर्चा केली आणि त्याने कुरिअर सर्व्हिस सुरू करण्याची संपूर्ण योजना आखली. वडिलांनी तिलकला पेपर एन पार्सल सुरू करण्यासाठी फंडिंग केलं. त्यानंतर त्याची भेट बँक अधिकारी घनश्याम पारीक यांच्याशी घालून दिली, ज्यांनी तिलकच्या व्यवसायात गुंतवणूक केली.
तिलक मेहताच्या व्यवसायाची कल्पना ऐकून पारीक यांनी बँकेची नोकरी सोडून थेट पेपर एन पार्सल व्यवसाय जॉईन केला. दोघांनी मिळून २०१८मध्ये पेपर एन पार्सल कुरिअर सर्व्हिस सुरू केली. तिलकने आपल्या कंपनीचे नाव पेपर एन पार्सल ठेवले आणि घनश्याम यांना कंपनीचा सीईओ बनवले. १०० कोटींची वार्षिक उलाढाल करणाऱ्या कंपनीत आजघडीला २००हून अधिक लोक काम करतात. तसेच, तिलक मेहता देशातील सर्वात युवा उद्योजक बनला आहे.
कंपनी काय काम करते?
तिलकची कंपनी ही एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, जी शिपिंग आणि लॉजिस्टिकशी संबंधित सेवा देते. ही कंपनी प्रत्येक प्रकारची गरजेची वस्तू, दैनंदिन आयुष्यातील वापरली जाणारी गोष्ट डिलीव्हर करते. तिलकची कंपनी आपल्या मोबाईल ऍपमार्फत लोकांना डोअरस्टेप सेवा देते. कंपनीत २००हून अधिक कर्मचारी तर आहेतच. शिवाय ३००हून जास्त मुंबईचे डब्बेवालेही कंपनीशी जोडले गेले आहेत. या कर्मचाऱ्यांमार्फत कंपनी दरदिवशी हजारो पार्सल डिलीव्हर करते. यासाठी कंपनी ४० ते १८० रुपये आकारते.
सन २०१८मध्ये सुरू झालेल्या तिलकच्या कंपनीने ६ वर्षांच्या कालावधीत यशाचे शिखर गाठले आहे. अशाप्रकारे १८ वर्षांच्या वयातच एवढी मोठी कंपनी उभी केल्यामुळे तिलकला सर्वात यशस्वी युवा उद्योजकाचा दर्जाही मिळाला.
वाचक मित्रांनो, तुम्हीही तिलक मेहताचा हा प्रेरणादायी प्रवास वाचून प्रेरित झाला असाल, तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसेच, हा लेख तुमच्या व्यवसाय सुरू करण्याची इच्छा बाळगणाऱ्या मित्रमैत्रिणींनाही आवर्जून शेअर करा, ज्यामुळे नवीन उद्योजक तयार होण्यासाठी त्यांनाही प्रेरणा मिळेल.
आणखी वाचा
- सुरुवात किराणा मालाच्या दुकानापासून ते जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कंपनीपर्यंत
- ‘LinkedIn’ ची सुरुवात कशी झाली?
- THE IKEA Effect – एकदा आत गेलेला माणूस इथून लवकर बाहेर पडत नाही