Chat GPTला टक्कर देणार देसी ‘हनुमान’, मार्चमध्येच लाँच होणार 11 भाषेत काम करणारा अंबानींचा AI मॉडेल
असं म्हणतात की अहंकार ही अध:पतनाची पहिली पायरी असते. असाच काहीसा अहंकार ChatGPT टूल बनवणाऱ्या सॅम अल्टमॅन यांनी दाखवला होता. त्यांनी म्हटलं होतं की, जर भारताने ChatGPT सारखं टूल बनवलं, तर ते निश्चितच अपयशी ठरेल. मात्र, आता भारतीयांसाठी आनंदाची बाब समोर येत आहे.
पुढील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये ChatGPT ला टक्कर देण्यासाठी देसी AI टूल हनुमान (Hanooman) लाँच केले जाणार आहे. त्यामुळे Hanooman ChatGPT शी जोरदार टक्कर असेल. कारण, ChatGPT प्रीमिअम सेवांसाठी जास्त पैसे चार्ज करते, तर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले रिलायन्स ग्रूपचे चेअरमन मुकेश अंबानी ही सेवा स्वस्त दरात किंवा मोफतही उपलब्ध करून देऊ शकतात.
काय आहे ‘हनुमान’ AI मॉडेल?
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि आयआयटी मुंबई सोबत इतर ७ आघाडीच्या इंजिनीअरिंग संस्थांच्या प्रयत्नातून एक देसी AI मॉडेल बनवण्यात आले आहे. या AI मॉडेलचे नाव हनुमान ठेवण्यात आले आहे. BharatGPT संस्थेच्या लोकांनी मुंबईतील एका तंत्रज्ञान संम्मेलनात हनुमान AI लँग्वेज मॉडेल सादर केले. हनुमान AI मॉडेलची सेवा पुढील महिन्यापासून सुरू होईल.
यादरम्यान एक बाईक मेकॅनिकला AI मॉडेलसह तमिळ भाषेत प्रश्न विचारताना दाखवले गेले. तसेच, एका बँकरला AI बॉटसोबत हिंदी भाषेत संवाद साधताना पाहिले गेले. यासोबतच एका डेव्हलपरने AI मॉडेलच्या मदतीने कम्प्यूटर कोडही लिहिला.
का आहे खास?
हनुमान AI मॉडेल ११ स्थानिक भाषांमध्ये काम करण्यास सक्षम असेल. हनुमान AI मॉडेल, शासन, आरोग्य, शिक्षण आणि वित्त सेवांसारख्या प्रमुख 4 क्षेत्रांना प्राथमिकता देऊन आपल्या सेवा पुरवेल. हे मॉडेल शासन, मॉडेल आरोग्य, शिक्षण आणि वित्त यांसारख्या क्षेत्रांसाठी डिझाईन केले गेले आहे. जर हे मॉडेल यशस्वी ठरले, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात रिलायन्स मोठा प्लेअर म्हणून समोर येईल. हनुमान AI मॉडेल (Hanooman AI Model) भारतीय धर्मग्रंथापासून प्रेरित आहे. जिओकडून इतर अनेक AI मॉडेल जसे की, जिओ ब्रेनवरही काम सुरू आहे.
LLM आहे तरी काय?
हनुमान AI मॉडेल स्पीच टू टेक्स्ट यासारख्या युजर फ्रेंडली सेवा देईल. हे एक मोठे लँग्वेज मॉडेल किंवा LLM (Large Language Model) सिस्टीम आहे, जी मोठ्या प्रमाणात डेटाचा वापर करून शिकते आणि नैसर्गिक साऊंड रिस्पॉन्स जनरेट करते. असे मॉडेल जनरेटिव्ह AI चा वापर करतात, जी एक नवीन प्रकारची आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. भारताचे हे मॉडेल आगामी काळात OpenAI च्या ChatGPT ला टक्कर देईल.
हे मॉडेल यशस्वी झाले, तर हे AI तंत्रज्ञान विकसित करण्याच्या शर्यतीत भारताचा मार्ग मोकळा करेल. मागील वर्षीच्या एका कार्यक्रमादरम्यान रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एका कार्यक्रमादरम्यान IIT Bombay सोबत एका प्रोजेक्टवर सन २०१४ पासून काम करण्याची माहिती दिली होती. त्यांनी म्हटले होते की, जिओ २.० सोबत BharatGPT चीही सुरुवात केली जाईल. अशाप्रकारे, सर्वांनाच या मॉडेलची आतुरता लागली आहे.
तुम्हाला हा लेख कसा वाटला, हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच, तुम्हाला लेख आवडला असेल, तर तमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका. याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर लेख वाचायला आवडेल, हेही नक्की कळवा.
आणखी वाचा
- इस्रोच्या गगनयानमधून पहिल्यांदाच 4 भारतीय अंतराळवीर करणार अवकाश वारी वाचा कोण आहेत ते बहाद्दर?
- कृत्रिम बुद्धिमत्ता: एका चमत्कारिक तंत्रज्ञानाची वाटचाल!
- तंत्रज्ञानाच्या वापराने भविष्यातील ‘या’ 5 समस्या होणार दूर!