Agro Tourism – शेतकऱ्यांसाठी वरदान
Agro Tourism – सिमेंटच्या शहरांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे, बेसुमार औद्योगिकरण आणि वाढत जाणारे प्रदूषण यामळे शहरं बकाल होत आहेत. मोठ्या प्रमाणावर गावागावातील लोक शहराकडे नोकरीसाठी येत आहेत. ज्यामुळे शहरांमध्ये गर्दी वाढत आहे. अशावेळी या गर्दीला गरजेचा असतो मोकळा श्वास आणि एक विरंगुळ्याची जागा.
यासाठी प्रत्येक आठवड्याच्या शेवटी म्हणजेच विकेंडला सगळे जात असतात प्रेक्षणीय किंवा रम्य ठिकाणी जिथे आपल्या कुटुंबासोबत त्यांना निवांत वेळ घालवता येईल आणि रोजच्या जेवणापेक्षा छान, वेगळं काहीतरी खाता येईल. लोक हे पर्यटन नेमके कशासाठी करतात. त्यांचं स्वतःचं शहर सोडून, देश सोडून का जातात पर्यटनाला. तर Enjoy करता यावं, कामातून थोडीशी उसंत मिळावी. सुट्टीचा दिवस आनंदात घालता यावा, एक नवीन अनुभव मिळावा म्हणून.
असं म्हणतात “गरज हीच शोधाची जननी” आणि नेमकी हीच गरज ओळखून आपण आपल्या उद्योगाला सुरुवात करू शकतो. कृषी या विषयाचा तुम्हाला गंध असेल किंवा मूळातच शेती हा तुमचा व्यवसाय असेल, तर शेती करत करत किंवा अगदी पूर्णवेळ उद्योग म्हणून “Agro Tourism” म्हणजेच “कृषी पर्यटन” या व्यवसायाकडे बघू शकता.
नेमके हे कृषी पर्यटन म्हणजे काय हे आता आपण पाहणार आहोत. शहरात राहात असताना अनेकांना ग्रामीण जीवनाबद्दल प्रचंड कुतूहल असते. त्यांचे राहणीमान, शेती, शेतीचे व्यवस्थापन, पशुपालन, गावरान भोजन आणि निसर्गरम्य वातावरण याबद्दल प्रचंड आकर्षण असते. धकाधकीच्या जीवनातून एक दिवस हे सर्व याची देही, याची डोळा अनुभवता यावे यासाठी लोक कृषी पर्यटन करतात. हे निव्वळ पर्यटन नाही तर एक प्रकारचे संस्कार आणि सामाजिक जाणिवेचा उपक्रम आहे.
तुम्हाला माहित आहे का की भारतामध्ये Travel आणि Tourism industry ही Service Sector मधील सर्वात मोठ्या Industry पैकी एक आहे. २०१८ साली भारतामध्ये Travel आणि Tourism Industry हि २३४ बिलियन डॉलरची होती. २०१९ मध्ये देशातील एकूण Jobs पैकी ८% Jobs हे या Industry ने देशाला दिले होते. भारतामध्ये दर वर्षी करोडो लोक पर्यटनाला जातात. इतकंच नाही तर अनेकी लोक दरवर्षी बाहेरच्या देशातून भारतामध्ये फिरायला येतात. भारतामध्ये अनेक अशी पर्यटन स्थळं आहेत, ज्यांना करोडो लोक दरवर्षी भेट देतात.
या कृषी पर्यटनामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आपण सामावून घेऊ शकतो? तर त्यासाठी अनेक पर्याय आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय शेती पद्धत आणि तिचे महत्त्व, पशुपालन पद्धत, चुलीवरच्या जेवणाची पद्धत तसेच बैलगाडी, घोडागाडी, घोड्याची सवारी, कुकुटपालन आणि नैसर्गिक साधन संपत्तीची माहिती व महत्त्व अशा गोष्टींचा समावेश होऊ शकतो. यासाठी तुमच्याकडे शेती असणे आवश्यक आहे किंवा शेत जमीन. त्यावर इतर गोष्टी तुम्ही विकसित करू शकता. तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा हा प्रकल्प उभा करणार आहात. त्या ठिकाणी जवळच असलेल्या पर्यटन स्थळांची माहिती घेऊन त्याचाही वापर तुम्ही यासाठी करू शकता.
तुम्ही जर शेतकरी असाल तर शेतीसोबत जोडधंदा म्हणून हा व्यवसाय उभा करू शकता. यासाठी भेट देणाऱ्या लोकांसाठी ठराविक तिकीट रक्कम तसेच ग्रुपसाठी काही खास ग्रुप बुकिंग सवलत आणि विध्यार्थ्यांसाठी किंवा शालेय सहलींसाठी खास ऑफर ठेऊ शकतो. अशापद्धतीने शेती सांभाळत पर्यटन हा उद्योग खास करून शेतकऱ्यांना एक नवी आर्थिक उभारी देऊ शकतो. तसेच या माध्यमातून निसर्ग संवर्धनासाठी आपण जागरूकता निर्माण करू शकतो.
या संकल्पनेविषयी तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.
आणखी वाचा
- उत्तम शेती करण्यासाठी कोणत्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.
- शेतकऱ्यांसाठी 20 लाख कोटी रुपयांचं कर्ज! KCC योजनेची माहिती जाणून घ्या
- काय आहे एसआरटी तंत्रज्ञान?
- कमी खर्चात लाखोंची कमाई, बेबी कॉर्न लागवड करा
- पंतप्रधान कुसुम सोलार योजनेबद्दल सर्वकाही
- शेतजमीन विकत घ्यायची आहे का? वाचा या 5 गोष्टी, नाहीतर पडाल नुकसानीत!
- Tomato Price : टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल! नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकार सज्ज