कोणतीही नवीन सवय लावू शकता फक्त 2 मिनिटांत | Sunday Motivation
मोठे बदल घडवण्याच्या छोट्या सवयी!
Procrastination टाळण्यासाठी हा २ मिनिटांचा नियम पाळाच!
Proocrrraaasssttttiiiinnnaaattttiiooon हा शब्द मुळातच इतका रटाळवाना आहे की हा शब्द ऐकूनच आपण कामं उद्यावर ढकलतो. पण कामं उद्यावर ढकलून देण्याची ही सवय आपल्या बऱ्याच जणांना खूप त्रासदायक ठरते. रोज सकाळी उठून व्यायाम करणं असो किंवा रात्री झोपताना निदान १५ मिनिटे पुस्तक वाचन असो प्रत्येक गोष्ट आपण “आजच्या दिवस जाऊ दे यार! उद्यापासून करू” असं करण्यातच घालवतो. असे अनेक उद्या जात राहतात आणि याचा शेवट होतो तो स्वतःलाच दोष देण्यात. इतकी छोटी सवय आपण स्वतःला लावू शकलो नाही? इतकं छोटं काम आपण करू शकलो नाही? स्वतःला दोष देणाऱ्या प्रश्नांची list मग पुढे वाढतच जाते.
पण मग यावर करणार काय? प्रत्येक प्रश्नाला जसं उत्तर असतं तसं याही प्रश्नाला उत्तर असेलच की! चला मग शोधूया या उत्तराला!
आधुनिक युगातील 5 महान dancers and choreographers मध्ये Twyla Tharp यांची गणना केली जाते. 1992 मध्ये त्यांना ‘मॅकआर्थर फेलोशिप’ देण्यात आली जी फक्त त्याच लोकांना देण्यात येते ज्यांनी आपल्या क्षेत्रात खूप मोठं काम केलं. Twyla यांनी आपल्या career चा बराचसा काळ जगभर फिरण्यात आणि आपली कला सादर करण्यात घालवला. त्या त्यांच्या या यशाचे श्रेय देतात रोजच्या जगण्यातील छोट्या छोट्या सवयींना.
Dancing सोबतच Twyla यांना लिखाणाची सुद्धा आवड आहे त्यांनी आत्तापर्यंत बरीचशी पुस्तकं लिहिली आणि यातलं सर्वात गाजलेलं पुस्तक म्हणजे “The Creative Habit” या पुस्तकात त्या लिहितात की: “मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाची सुरुवात एका सवयीने करते. सकाळी 5.30 ला उठून मी माझे वर्कआउटचे कपडे, लेग वॉर्मर्स, स्वेट शर्ट आणि टोपी घालते.
मॅनहॅटनमधील माझ्या घरातून बाहेर पडते, टॅक्सी बोलावते आणि जिममध्ये जाऊन तिथे दोन तास workout करते.” आता यात गंमत म्हणजे Twyla ह्या या जिममध्ये जाऊन तिथे दोन तास workout करायला सवय नाही मानत तर त्यांच्या मते खरी सवय आहे रोज घरातून बाहेर पडणं आणि बाहेर पडल्यावर जिमला जाण्यासाठी taxi बोलावणं.” मित्रांनो तुम्ही आम्ही विचार केला की असं वाटत ही एक खूप छोटी गोष्ट आहे पण ही छोटी गोष्टच रोज रोज केल्याने सवय बनून जाते और “अगर एक बार आदत पड़ गयी तो चाहकर भी उसे छोड़ना मुश्क़िल हो जाता है”
आता समजा Twyla यांना Taxi पकडण्यासाठी ३ किलोमीटर चालत जावं लागलं असतं किंवा आपल्याला आज कोणते कपडे घालायचे आहेत याचा विचार करत बसावा लागला असता तर बहुतेक त्या ती taxi पकडूच शकल्या नसत्या कारण सकाळी उठल्या उठल्या ३ किलोमीटर चालणं अवघड आहे. त्यामुळे कोणतीही सवय लावताना ती सुरु करतानाची process ही खूप simple असली पाहिजे. या गोष्टीला आपल्या रोजच्या जीवनात उतरवण्यासाठी आपण पाहूया २ मिनिटांचा नियम.
आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की सुरुवात ही नेहमी सोपी झाली पाहिजे. जेव्हा आपण कोणतीही सवय लावायचा किंवा काही बदल करण्याचा विचार करतो तेव्हा आधी आपण खूप excited असतो; कधी एकदा काम करायला घेतो आणि कधी ते संपवतो असं होतं आपल्याला! हे किती दिवस टिकतं तर फक्त १ दिवस. मग दुसरा दिवस उजाडतो आणि परत आपलं रोजचं जगणं सुरु होतं. पण याच गोष्टी टाळण्यासाठी महत्त्वाचा ठरतो तो २ मिनिटांचा नियम हा नियम काय आहे तर “कोणतीही नवी सवय सुरु करण्यासाठी ती सवय २ मिनिटांत पूर्ण करून झाली पाहिजे” नाही समजलं ना ? सांगतो!
समजा तुम्हाला रोज रात्री झोपायच्या आधी पुस्तक वाचण्याची सवय लावायची आहे. आता तुम्हाला २ मिनिटांचा नियम माहिती आहे तर तुम्ही काय करणार आधी सवय लावणार फक्त १ पान वाचण्याची. दोन मिनिटांत एक पान वाचून झालं की तुम्ही ते पुस्तक ठेऊन द्यायचं. बघा तुमचं target achieve झालं. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी तुम्ही हीच process follow करणार पाचव्या दिवशी तुम्हाला वाटेल की यार आज १ पान वाचण्यापेक्षा आपण २ पानं वाचूया. मग हळूहळू तुम्ही २ पानावरून ३ पानावर, ३ पानावरून ४ वर, ४ वरून पाच, सहा, दहा, वीस, तीस वर जाल आणि पहा आता तुम्हाला पुस्तक वाचनाची सवय लागलीये.
अशाच पद्धतीने तुम्हाला जर रोज जॉगिंग करायची आहे तर तुम्हाला आधी रोज shoes घालण्याची सवय लागली पाहिजे, तुम्हाला जर योगा करायचा असेल तर रोज Yoga Mat अंथरण्याची सवय लागली पाहिजे, जर अभ्यास करायचा असेल तर आधी पुस्तक उघडण्याची सवय लागली पाहिजे. कारण की या सगळ्या सवयी लावणं खूप छोटं काम आहे… पण जेव्हा या छोट्या सवयी लागतील तेव्हाच मोठे बदल घडायला सुरुवात होईल.
आणखी वाचा
- तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…
- यश मिळवण्यासाठी कल्पकता व शांत डोक पाहिजे
- दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल
- अती विचाराच्या रोगापासून दूर राहा
- फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता