उद्योजकता

How to start your own blog? : स्वत:चा ब्लॉग कसा सुरू करावा?

ब्लॉग म्हणजे काय ? 

साध्या सरळ भाषेत सांगायचे झाले, तर ब्लॉग म्हणजे आपले ज्ञान (विचार, कला) इंटरनेटद्वारे इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्याचा वापर केला जातो. त्यालाच ब्लॉग असे म्हणतात. 

आपल्याला विशिष्ट प्रकारची माहिती शोधायची असेल, तर इंटरनेट हे सर्वात जलद माध्यम आहे. त्याचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेदेखील आहेत. यात एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे वेळ. आपणही वेळेसाठी बांधील असतो आणि प्रत्येकाला फक्त आणि फक्त २४ तास आहेत. मग त्या वेळेचं योग्य व्यवस्थापन व्हावं असं प्रत्येकाला वाटतं ना. मग जिथे जिथे वेळ वाचवता येईल तिथे आपण नक्कीच प्रयत्न करतो. 

अशा वेळी बऱ्यापैकी वाचक वर्ग कमी वेळात हवी असणारी माहिती एका ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतो. या वाचक वर्गाचा विचार करून आपण निश्चितपणे स्वत:चा ब्लॉग लिहिण्याचा विचार करु शकतो. ब्लॉग लिहायला सुरुवात करण्यासाठी काही प्राथमिक गोष्टींचा अभ्यास करणं सुरुवातीला अपेक्षित असतं. यात सर्वात आधीची आणि महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आवड. आपल्याला लिहिण्याची आवड आहे का ?

स्वतःचा ब्लॉग सुरु करण्याची अनेक कारणे असू शकतात जसे की, आपल्याजवळ एखादे कौशल्य असेल किंवा आपल्याला एखादी गोष्ट उत्तमरित्या जमत असेल तर किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल लोकांना सांगायचे असेल तर आपण मायक्रो ब्लॉगच्या मदतीने ब्लॉग सुरु करू शकतो आणि सहज लोकांपर्यंत माहिती देखील पोहोचवू देखील शकतो. ब्लॉग सुरू करण्यासाठी ब्लॉगर.कॉम किंवा वर्डप्रेस.कॉम या वेबसाईटचा वापर करता येतो.

How to start your own blog? : स्वत:चा ब्लॉग कसा सुरू करावा?

स्वत:चा ब्लॉग सुरू करण्याच्या प्राथमिक पायऱ्या : 

1.  ब्लॉगचा विषय निवडणे

ब्लॉग तयार करण्यासाठी सर्वात आपल्याला नक्की कोणत्या विषयावर व्यक्त व्हायचं आहे हे आधी ठरवणं अत्यावश्यक ठरतं. ब्लॉगचा विषय निवडणे महत्वाचे आहे, आपल्याला एखाद्या विषयाची आवड असेल, तर आपण ब्लॉगचा विषय निवडून लेखन केले, तर नक्कीच आपल्या ब्लॉगवर वाचक आकर्षित होतील यात शंका नाही. आपल्या आवडीसंदर्भात, कृती संदर्भात किंवा एखाद्या ठिकाणा संदर्भात ब्लॉगचा विषय निवडावा.

2.  वेबसाईट डिझाईन

वेबसाईट डिझाईन हे ब्लॉगचे स्वरूप ठरविते, ब्लॉग किती Professional आहे ते Web Design वरुन कळते. जेवढी आकर्षक वेबसाईट डिझाईन असेल तेवढी लोक जास्त प्रतिसाद देतील, म्हणून वेब डिझाइन सुंदर व आकर्षक असायला हवी. 

3. डोमेनचे नाव निवडणे

डोमेन नेम हा वेबसाईटचा पत्ता (Address) आहे, जो लोक आपल्या वेबसाइटला भेट देण्यासाठी Browser च्या URL मध्ये टाईप करतात. डोमेन निवडताना आपला ब्लॉग कशा संदर्भात आहे, त्या संदर्भात डोमेन निवडावेत. डोमेन नाव निवडताना ते लांबलचक नसावे, आणि उच्चार करण्यास सोपे असावे.

4. Unique Content 

स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करत असताना कंटेंट अतिशय महत्वाचा भाग आहे. आपला ब्लॉग समजायला सोपा असावा, जास्त किचकट लिहू नये. आपण जेवढा विस्तृत ब्लॉग लिहणार तेवढाच जास्त वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार आहे. 

ब्लॉग सुरू करण्यासाठी पैसे लागतात का?

नाही, ब्लॉग सुरु करायचा असेल, तर आपण मोफत आणि सशुल्क या दोन्ही माध्यमातून ब्लॉग सुरु करू शकतो. जर आपल्याला मोफत म्हणजेच विनामूल्य ब्लॉग सुरु करायचा असेल, तर आपण ब्लॉगर किंवा वर्डप्रेस या साईटच्या साहाय्याने मोफत ब्लॉग बनवू शकतो. जर सशुल्क ब्लॉग सुरु करायचा असल्यास आपल्याला डोमेन आणि वेब होस्टिंग खरेदी करावी लागेल.  

आणखी वाचा :

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button