उद्योजकताबिझनेस स्टोरीझ
Trending

केवळ महिलाच भागीदार असणारा “जगातील” एकमेव गृहउद्योग… उलाढाल १६०० कोटी

साल १९५९. मुंबईतल्या गिरगावमधील एक गुजराती कॉलनी. कॉलनीतल्या ७ गृहिणी दुपारच्या फावल्या वेळेत बसल्या होत्या. वेळेचा सदुपयोग करून काहीतरी गृह उद्योग सुरु करावा असा विचार त्यांच्या डोक्यात सुरु होता. यामागे विचार फक्त एवढाच की वेळही निघून जाईल आणि घरखर्चाला हातभार देखील लागेल. कल्पना सुचली आणि तीला मूर्त रूप देण्यासाठी त्यांनी ठरवलं की घरी बसल्या-बसल्या पापड लाटण्याचा उद्योग सुरु करता येईल. उद्योग तर सुरु करायचा पण, त्यात गुंतवायला काही त्यांच्याकडे पैसे नव्हते.

शेवटी त्या मदतीसाठी ‘सर्वंटस ऑफ इंडिया’ सोसायटीचे अध्यक्ष छगनलाल पारेख यांच्याकडे गेल्या. पारेख यांनी देखील त्यांना निराश केलं नाही आणि त्यांनी या महिलांना ८० रुपये उसने दिले. या पासून त्यांनी तोट्यात गेलेल्या कंपनीकडून जुनी पापड बनवायची मशीन व काही साहित्य खरीदी केले. 

यापासूनच १५ मार्च १९५९ रोजी सुरु झाला पापड बेलण्याचा उद्योग, जो पुढे चालून ‘लिज्जत पापड’ म्हणून प्रसिद्धीस पावला. आपल्याला आश्चर्य वाटेल पण उद्योगाची सुरुवात या ७ महिलांच्या घराच्या छतावर करण्यात आली होती. सर्वप्रथम त्यांनी विक्रीसाठी पापड उपलब्ध करून दिले. ते फक्त ४ पॅकेट होते. हळूहळू त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि मग आजूबाजूच्या अनेक महिला देखील त्यांच्या या गृहउद्योगात सामील होऊ लागल्या. तीन महिन्यातच ७ वरून कामगारांची संख्या २५ पर्यंत गेली. तुटलेले पापड या महिला शेजाऱ्यांना मोफत वाटप करत, त्यामुळे शेजारीही सहकार्य करत. 

image 18

पाहता-पाहता वर्ष सरलं. पहिल्या वर्षांअंती त्यांची उलाढाल होती ६१९६ रुपये. या वर्षभराच्या काळात त्यांच्याशी अनेक महिला जोडल्या गेल्या होत्या. काम जोरात सुरु होतं.

पहिल्या वर्षभरात त्यांना एक महत्वाची अडचण समोर आली होती ती म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांत त्यांना काम बंद ठेवावं लागत असे, कारण पापड वाळतच नव्हते. दुसऱ्या वर्षी मात्र त्यांनी यावर उपाय शोधला. उपाय असा होता की एका पलंगावर त्या पापड वाळत घालत असत आणि खालून स्टोव्हच्या मदतीने उष्णता पुरवीत असत. त्यामुळे ही अडचण देखील दूर झाली होती. 

दुसऱ्या वर्षी त्यांच्या सोबत १०० ते १५० महिला जुळाल्या आणि तिसऱ्या वर्षी हा आकडा ३०० पर्यंत पोहचला होता. जागा कमी पडू लागली. घरी बसायला देखील जागा नसे. त्यानंतर त्यांनी सहकारी महिलांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्या पापडाचे वजन मोजून त्यांना पैसे देण्यात येत होते. आज आपण ज्याला ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणतो, म्हणजे घरी बसून काम करण्याच्या संस्कृतीची सुरुवात त्यांच्या उद्योगात झाली. एवढा मोठा महिलांचा गट तयार झाला होता. त्याची नोंदणी देखील करायची होती.

lijjat papads success story

गटाला नेमकं नांव काय द्यावं हे सुचत नव्हतं. मग यावरही एक शक्कल लढविण्यात आली. महिला गटाचं नांव सुचविण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतूनच विजेत्या ठरलेल्या धीरजबेन रुपारेल यांनी सुचवलेलं ‘लिज्जत’ हे नाव गटाला देण्याचं ठरविण्यात आलं. 

‘लिज्जत’ या गुजराती शब्दाचा अर्थ ‘चवदार किंवा स्वादिष्ट’ असा. विजेत्या धीरजबेन रुपारेल यांना ५ रुपयांचं बक्षिस देखील देण्यात आलं. जुलै १९६६ मध्ये  ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ हे नाव अधिकृतरीत्या नोंदविण्यात आलं. पापडाची गुणवत्ता उत्तम असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात वाढत होती आणि प्रसिद्धी देखील मिळत होती. उद्योग भरभराटीस यायला लागला होता. यात भरीस भर म्हणजे खादी ग्रामोद्योग विभागाच्या अध्यक्षांनी या गृह उद्योगात ८ लाख रुपये गुंतविण्याचा निर्णय घेतला. 

लिज्जतची गाडी वेगाने चालत होती, ती धावायला लागली. ८० च्या दशकात लिज्जतचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. भारतीय घरांमधल्या किचनमध्ये ‘लिज्जत’ हे न टाळता येण्यासारखं नाव झालं. लिज्जतने ९० च्या दशकात विदेशातही व्यवसाय विस्तारला आणि हि घोडदौड अजूनही सुरु आहे.

3b7e3667e492ec5d974a1a9c9565c5be

आज विदेशामध्ये देखील लिज्जतची वेगळी ओळख आहे. अनेक वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गटाच्या कामाचा गौरव करण्यात आलाय. सात मैत्रिणींनी एकत्र येत लावलेल्या रोपट्याचे रुपांतर आज लाखो महिलांना रोजगार देणाऱ्या वटवृक्षात झाले आहे. आज 45 हजार महिला कर्मचारी 4.8 अब्ज पापडाची निर्मिती करतात. लिज्जतच्या 17 राज्यात 82 शाखा आहेत. अमेरिका, जपान ते साऊथ आफ्रिका अशा 25 देशात लिज्जतची पापड आणि इतर उत्पादने निर्यात होतात. २००२ मध्ये लिज्जतचा निव्वळ फायदा वार्षिक १० करोड रुपये होता. २००२ साली त्यांना Economics Times तर्फे बिझनेस वूमन ऑफ द ईयर हा पुरस्कार मिळाला. 

Screenshot 2024 08 25 131804

आज लिज्जतमध्ये काम करणाऱ्या अधिकतम महिला गरजू, निरक्षर आहेत. इथे सर्व महिला एकमेकांना बेहन (बेन) या नावाने संबोधतात. आता लिज्जत पापडा सोबतच अप्पालम, मसाला, गव्हाचे पीठ, चपाती, कपड्याची साबण, लिक्विड डिटर्जेंट इत्यादी उत्पादनेदेखील तयार करते.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button