फुकट वाटा, पण उधार नको
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे फुकट वाटा, पण उधार नको… करायची सुरवात?
उधारी आणि व्यवसाय याचं नातं वेगळंच आहे. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. उधार द्यायचं नाही, तर धंदा होत नाही आणि उधार दिलं तर वसूल होत नाही. उधारी देऊन नुकसान होण्यापेक्षा धंदा न करता गप्प बसलेलं काय वाईट? लोकांना फुकट वाटायला तुम्ही काय कुबेराचे नातेवाईक आहात का? उधारी देण्याच्या बदल्यात तुम्ही चिंता विकत घेता व चिंता ही चिता समान असते, जी माणसाला हळूहळू मारते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. आपल्या हक्काचे, कामाचे पैसे दुसऱ्याकडे पडून आहेत, त्याचा वापर आपण करू शकत नाही यापेक्षा वाईट गोष्ट कोणती.
उधारीवर बाजारात खूप मजेशीर किस्से आहेत. “उधार एक जबरदस्त जादू है। हम उधार देंगे आज, तो कल आप गायब हो जाओगे।”, “उधार ८० साल के उपरवाले को मिलेगा, वो भी उनके माता पिता को पुछकर।”
उधार न दिल्याचे व्यवसायात फायदे आणि तोटे
१) डोक्यात नकारात्मक विचार बंद होतात.
२) तुम्ही सकारात्मक योजना व प्लॅनिंग करू शकता.
३) उधार देऊन संबध बिघडण्यापेक्षा उधारी नाकारून बिघडलेले बरे.
४) माल नाही खपला तर तो दानधर्म करा, पुण्य तरी मिळेल; पण उधार देऊन डोक्याला नसता ताप नको.
५) उधारीतून वाद म्हणजे विकतचे भांडण होऊ शकते.
६) उधारीमुळे बुद्धिमान, कौशल्यपूर्ण व्यावसायिक आयुष्यातून बरबाद होतो.
७) उधारीपुढे नुकसान झाल्यास तुमचा चांगुलपणा तुम्हालाच भोवतो व जग तुम्हालाच खुळे समजते, तुम्ही फेल बिझनेसमन आहेत असा समज होतो.
९) माल नाही खपला तर तो दानधर्म करीन, पुण्य तरी मिळेल पण उधार देऊन डोक्याला नसता ताप नको.
प्रमाणाबाहेर उधारी म्हणजे व्यवसायाचा सर्वात मोठा शत्रू. “एक रूपयाच्या मार्जिनवर धंदा करेन, पण उधारीवर करणार नाही.” अशी खूणगाठ बांधा. उधारीची वही हा प्रकारच दुकानात ठेऊ नका. नंतर देतो, लिहून ठेवा; तसले काही नको. ‘माल ठेवा, पैसे असतील तेव्हा घेऊन जा.’ कोणाशी कितीही दुश्मनी असली तरी मृत्यूनंतर आपण त्यांच्या कार्यास जातो; पण उधार घेणारा कधीच येत नाही. उधारी माणसात इतके वाईट अंतर निर्माण करते.
तुम्ही व्यवसाय करत असताना उधारीच्या समस्येला कसे हाताळता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेलला आत्ताच सब्स्क्राइब करा.