शेतकऱ्यांसाठी 20 लाख कोटी रुपयांचं कर्ज! KCC योजनेची माहिती जाणून घ्या
भारताला शेतीमध्ये प्रगत बनविण्यासाठी केंद्रसरकार आणि राज्यसरकार नेहमीच नवीन काहीतरी योजना घेऊन येत असते. त्यातीलच एक योजना म्हणजे KCC अर्थात किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजना. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना 20 लाख कोटी रुपयांचं कर्ज वाटप करणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या योजनेचा लाभ शेतीसोबतच, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील घेता येणार आहे.
चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल:
भारतातील सर्व शेतकरी ज्यांचे वय 18 ते 70 वर्षाच्या दरम्यान आहे ते या योजनेस पात्र ठरू शकतात. या योजनेअंतर्गत मागील वर्षापेक्षा जास्त कर्जाचा आणि कमी व्याजदराचा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. तुमच्या जवळच्या बँकेत जमिनीची कागदपत्रे तसेच कर्ज मिळवण्यासाठी जमिनीचा नकाशा, पटवारी कागदपत्रे, बँक पासबुक, पॅनकार्ड, आधार कार्ड आदी कागदपत्रे भरणे बंधनकारक आहे. HDFC बँक, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा या बँकांद्वारे किसान क्रेडिट कार्ड बँकांद्वारे ऑफर केले जाते.
तुम्ही KCC Bank Loan कशा कशासाठी घेऊ शकता?
1. KCC Bank Loan शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी घेऊ शकतो.
2. किटकनाशके, खते, बियाणे खरेदीसाठी आणि कृषी यंत्रं घेण्यासाठी कर्ज घेऊ शकता.
3. काढणीनंतरचा खर्च भागवण्यासाठी शेतकरी हे कर्ज घेऊ शकतात.
4. कृषी मालमत्तेच्या देखभालीसाठी तसेच आपला माल विकण्यासाठी देखील या कर्जाचा वापर केला जाऊ शकतो.
5. तसेच मत्स्यपालन करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांच्या खरेदीसाठी.
6. कुक्कुटपालन करण्यासाठी मेंढ्या, ससे, शेळ्या, डुकर यांच्या पालनपोषणासाठी लागणाऱ्या खाद्य खरेदीसाठी
7. दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतःचे शेड उभारण्यासाठी किंवा भाडेतत्वावर शेड घेण्यासाठी देखील या कर्जाची मदत होऊ शकते.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमीत कमी 50 हजारांपासून ते जास्तीतजास्त 3 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. १.६० लाख रुपयां पर्यंतच्या कर्जासाठी कोणतंही तारण लागत नाही. यासोबतच शेतकऱ्यांना पिकांचा विमाही काढता येऊ शकतो. हे कर्ज 4% व्याजदराने घेता येऊ शकते. पण जसजशी तुमची कर्जाची रक्कम वाढेल तसे त्यावरचे व्याज देखील वाढू शकते. शेतकऱ्यांना बँकांकडून नियमित दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या उच्च व्याजदरातून KCC Bank Loan अंतर्गत सूट दिली जाते.
मात्र मिळालेल्या या कर्जाची परतफेड केव्हा करायची?
तर ज्या पिकासाठी तुमचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे, त्या पिकाच्या अपेक्षित कापणी आणि एकूण उत्पादन येण्याच्या कालावधीनुसार बँक मुदतीचा कालावधी ठरवत असते. सामान्यतः प्रत्येक बँकेत 5 वर्षांचा कालावधी हा परतफेड करण्यायोग्य कालावधी असतो.
सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना घेऊन येत असते, मात्र बऱ्याचशा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्याच नसतात. त्या योजना नवी अर्थक्रांती तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. त्यामुळे अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी नवी अर्थक्रांती वेबसाईटला नियमित भेट द्या.
आणखी वाचा
- उत्तम शेती करण्यासाठी कोणत्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.
- Agro Tourism – शेतकऱ्यांसाठी वरदान
- काय आहे एसआरटी तंत्रज्ञान?
- कमी खर्चात लाखोंची कमाई, बेबी कॉर्न लागवड करा
- पंतप्रधान कुसुम सोलार योजनेबद्दल सर्वकाही
- शेतजमीन विकत घ्यायची आहे का? वाचा या 5 गोष्टी, नाहीतर पडाल नुकसानीत!
- Tomato Price : टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल! नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकार सज्ज