बिझनेस आयडियास्टार्टअप

भारतीयांसाठी 5 भन्नाट स्मॉल बिझनेस आयडिया, चौथा बिझनेस सर्वात भारी

उद्योजक बनण्याचं स्वप्न बाळगणारे अनेकजण संघर्ष करताना दिसतात. पण आपल्याकडे घरबसल्या करता येतील अशा अनेक आयडिया आहेत, ज्यातून आपण प्रचंड नफा मिळवू शकतो.

आम्ही आज कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देणारी ५ लहान बिझनेस आयडिया सांगणार आहोत. त्या कोणत्या आयडिया आहेत, जाणून घेऊयात…

१. सुक्या मेव्याचा व्यवसाय

सुका मेवा म्हणजेच ड्राय फ्रूट्स शरीरासाठी फायदेशीर असतो. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या घरात सुका मेवा ठेवतो म्हणजे ठेवतोच. सुका मेवा हा लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतो. सुक्या मेव्याच्या आरोग्यासाठी वाढत्या फायद्यांमुळे भारतात सुक्या फळांची विक्री घाऊक, घरगुती, किरकोळ आणि ऑनलाइन मार्केटच्या स्वरूपात होत आहे.

भारतीय मिठायांमध्ये सुका मेवा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत विशेषतः सणांच्या काळात मिठाईत भेसळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत भेसळयुक्त मिठाई घेण्यापेक्षा सुका मेवा घेण्यास लोक पसंती दर्शवतात. त्यामुळे सुक्या मेव्याची विक्रीही दिवसेंदिवस वाढत आहे.

अशात हा स्टार्टअप सुरू करून कोणीही पैसे कमवू शकतो. आजकाल सणासुदीला, लग्नसमारंभात सुका मेवाही भेट म्हणून दिला जातो. तुमच्याकडे जागेची उपलब्धता, तुमची भांडवल क्षमता आणि व्यवसायाचे स्वरूप याप्रमाणे तुम्ही तुमचा ड्रायफ्रूट व्यवसाय खालीलप्रमाणे सुरु करू शकता:

  • घरगुती विक्री
  • ऑनलाइन विक्री
  • किरकोळ विक्री

सामान्यतः डेअरी, बेकिंग उद्योग, मिठाई, सण आणि शुभ समारंभाच्या प्रसंगी पॅकेज केलेल्या भेटवस्तू म्हणून सुकामेवा मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. अंदाजे 15,000 ते 25,000 रुपयांच्या कमी गुंतवणुकीत सुक्या मेव्यांची विक्री घरबसल्या करता येते. या सुकामेव्याच्या विक्रीतून दरमहा 20000 ते 30000 रुपयांइतका नफा मिळू शकतो.

तुमच्या सुक्या मेव्यासाठी मिठाईची दुकाने, बेकिंगची दुकाने, केटरिंग सेवा, डेअरी आणि मिठाई, ऑनलाइन किराणा दुकाने आणि कॉस्मेटिक उद्योग, ही लक्ष्यित ग्राहकांची काही उदाहरणे आहेत.

२. स्टेशनरी शॉप

आपण सर्वजण जाणता की, आजकाल लोकांमध्ये शिक्षणाबाबत बरीच जागृती झाली आहे. तसेच, आता बहुतांश मुले-मुली शिक्षण घेण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये जात आहेत. तुम्ही या संधीचा फायदा घेऊन तुमच्या परिसरात अगदी कमी गुंतवणुकीत स्टेशनरीचे दुकान सुरू करू शकता आणि हे स्टेशनरी स्टोअर कुठेही सहज चालू शकते. जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत पैसे कमवायचे असतील, तर तुम्ही स्टेशनरीचे दुकान सुरू करू शकता.

आजकाल शाळा, महाविद्यालये किंवा कोचिंग सेंटर्स सगळीकडेच पाहायला मिळतात. अशा वेळी मोठी मागणी असलेले स्टेशनरीचे दुकान आपण सुरू करू शकतो. आजच्या काळात, शाळा किंवा कार्यालयीन स्टेशनरीला जास्त मागणी आहे. विशेष म्हणजे, काही बाजारपेठा अशा आहेत, ज्या कधीही बंद होणार नाहीत. त्यात स्टेशनरीचाही समावेश आहे.

लॅपटॉप, टॅबलेट आणि मोबाईलच्या जमान्यातही शाळा, कॉलेज आणि ऑफिसमध्ये पेपर आणि पेनचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. रेझ्युमे आणि ग्रीटिंग कार्ड्स आजही जुन्या पद्धतीच्या पद्धतीने कागदावर छापण्यास प्राधान्य दिले जाते. तसेच, फक्त नोटबुक, कागदपत्रे, पेन याशिवाय स्टेशनरीमध्ये बरेच काही आहे.

जर तुम्ही कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असाल, तर स्टेशनरीचे दुकान सुरू करणे तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरू शकते. स्टेशनरीचे दुकान कसे सुरू करावे याबद्दल काही सूचना देत आहोत.

स्टेशनरी शॉप सुरू करताना विक्री करायच्या असलेल्या गोष्टींची यादी करा.

  • डिंक, कात्री, टेप, स्टेपलर आणि गिफ्ट रॅपर यांसारखी स्टेशनरी ठेवा.
  • व्हाईटबोर्ड, खोडरबर, क्रेयॉन, पेन, पेन्सिल, शार्पनर, कंपास बॉक्स, पेंट्स, नोटबुक, ग्लोब्सपासून सुरू होणारे शालेय साहित्य.
  • ऑफिस स्टेशनरी सामान जसे की, कार्यालयीन कामासाठी लागणारे व्हाईट पेपर्स, हायलायटर पेन, फोल्डर्स, लिफाफे, ऑर्गनायझर्स, स्टेपलर, मार्कर, फाइल्स, नोटपॅड्स, व्हाईटनर, रबर स्टॅम्प आणि कव्हर.
  • सर्व प्रकारचे चारकोल, वॉटर पेंट्स, स्टेन्सिल इत्यादी.
  • शाईचा बॉक्स, संगणक सॉफ्टवेअर आणि प्रिंटर, हेडफोन, टोनर.
  • रिबन, ग्लिटर, बटणे, मणी, आणि लोकर यांसारखा हस्तकला पुरवठा.
  • पार्टी साहित्य जसे की, रंगीत कागदाचे छोटे तुकडे, फुगे, मुकुट, मुखवटे, स्ट्रीमर आणि मेणबत्त्या.

तुम्हाला कोणत्या वस्तू विकायच्या आहेत याची कल्पना आल्यावर, एक पोर्टफोलिओ तयार करा आणि तुमच्या स्थानिक भागात जाहिरात करा. हे तुमच्या संभाव्य ग्राहकांना प्रत्यक्ष भेट देण्यापूर्वी स्टोअरमध्ये काय आहे याची कल्पना देण्यात मदत करते.

ठिकाण- भारतातील इतर लहान व्यवसाय कल्पनांप्रमाणे, तुम्ही दुकान सुरू करण्यापूर्वी तुम्हाला बाजाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे स्टेशनरी स्टोअर मॉलमध्ये किंवा एखाद्या शाळा-कॉलेजच्या किंवा सरकारी कार्यालयाच्या परिसरात उघडू शकता. ज्यामुळे तुमची विक्री होण्याची शक्यता वाढते. स्टेशनरीचे दुकान हे प्रवेशयोग्य असावे, अर्ध-निवासी भागात स्थित आणि तुमचे संभाव्य ग्राहक असण्याची शक्यता असलेल्या लोकांसाठी दिसेल अशा ठिकाणी असावे.

इतर कोणत्याही लहान स्टोअर किंवा दुकानाप्रमाणे, तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी निधीची आवश्यकता असते. तुमच्या बजेटमध्ये स्टोअरच्या जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार, वीजबिल, वाहतूक, पुरवठा, साठा आणि विविध खर्चांचा समावेश करणे आवश्यक आहे.

आजच्या पिढीमध्ये, बहुतेक लोक ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देतात. त्यामुळे तुमची माहिती सांगण्यासाठी तुमचे ऑनलाइन स्टेशनरी स्टोअर तयार करा. जसे की, तुमच्या वस्तूंच्या किंमती, मिशन, उद्दिष्टे, तुमचे स्थान, तुमच्या स्टोअरबद्दल, तुम्ही विकू इच्छित असलेल्या वस्तू, मालकी आणि बरेच काही. इतर कोणत्याही छोट्या दुकानाप्रमाणे तुमच्या दुकानाची नोंदणी करा. एकतर एकमेव मालकी, भागीदारी किंवा LLC. आवश्यक स्टेशनरी स्टोअर परवाने आणि व्यापार नोंदणी जसे की, दुकान आणि आस्थापना कायदा परवाना मिळवा. GST सारख्या करांसाठी नोंदणी करा, PAN आणि TAN साठी अर्ज करा.

या स्टेशनरी व्यवसायातून तुम्ही महिन्याकाठी ४०००० ते ५०००० रुपयांपर्यंतचा नफा कमवू शकता.

३. सॅनिटरी पॅड (नॅपकिन) बनवण्याचा व्यवसाय

महिला त्यांच्या मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी पॅड वापरतात. भारतीय बाजारपेठेत महिलांच्या स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रकारचे सॅनिटरी पॅड आणि उत्पादने उपलब्ध आहेत. त्यामुळे जर तुम्ही सॅनिटरी पॅड बनवायला सुरुवात केलीत, तर तुम्हाला कमी वेळात भरपूर नफा मिळू शकतो. ज्यांना कमी गुंतवणुकीत लघु-व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी ही भारतातील सर्वोत्तम लघु व्यवसाय कल्पनांपैकी एक आहे.

सॅनिटरी पॅड बनवणे सुरू करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही सॅनिटरी पॅड बनवण्याचे प्रशिक्षण घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला या प्रकल्पासाठी योग्य स्ट्रॅटेजी बनवावी लागेल आणि बाजारात सॅनिटरी पॅड नॅपकिन्सची किती मागणी आहे हे समजून घ्या. त्यानंतर, तुम्ही सर्व कच्चा माल आणि आवश्यक मशीन्सची यादी तयार करा आणि तुमचे बजेट सेट करा.

तुम्ही निधी उभारण्याचा विचार करत असाल, तर प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि स्टार्टअप इंडिया, स्टँड-अप इंडिया, PMEGP अशा कर्ज योजना आहेत, जिथे तुम्ही संपर्क साधू शकता. तसेच, तुमच्या स्टार्टअपसाठी कर्ज मिळवू शकता. या कर्ज योजना तुम्हाला राष्ट्रीयीकृत बँकांकडून अनुदानासह 10 लाख ते 1 कोटींपर्यंत कर्ज घेण्याची परवानगी देतात.

४. टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय

उद्योजक बनायचं ठरवलेल्या तरुणांनो, तुम्ही भारतात कमी गुंतवणुकीसह लघु- प्रकल्प सुरू करण्याचा शोध घेत असाल, तर प्रचंड मागणी असणारा अजून एक व्यवसाय आहे. आजच्या काळात तरुणांना/तरुणींना नवनवीन डिझाइन्स आणि रंगीबेरंगी प्रिंटेड टी-शर्ट्स घालायला आवडतात. तुम्हाला छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही कमी गुंतवणुकीत टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय सुरू करू शकता आणि पैसे कमवू शकता.

टी-शर्ट प्रिंटिंग हा एक लोकप्रिय व्यवसाय बनला आहे. विशेषत: सुरू करण्यासाठी तुलनेने कमी गुंतवणूकीचा व्यवसाय शोधू पाहणाऱ्या उद्योजकांसाठी. तुम्ही प्रिंटेड टी-शर्ट ऑनलाइन विकल्यास सुरुवातीला तुम्हाला कोणत्याही परवान्याची गरज लागत नाही. किंवा तुम्ही साधं शॉप ऍक्ट काढूनसुद्धा सुरुवात करू शकता.

टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय सुरू कसा कराल?

  • दर्जेदार सामग्रीसाठी विश्वसनीय उत्पादक किंवा पुरवठादाराशी टाय-अप करा
  • लक्ष आकर्षित करण्यासाठी एक निश (Niche) प्रकार निवडा
  • तुमचे टी-शर्ट मॉकअप करा
  • तुमच्या डिझाईन्स तयार करा

टी-शर्ट प्रिंटिंग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे

  • स्क्रीन प्रिंटिंग
  • उष्णता हस्तांतरण (Heat transfer)
  • डायरेक्ट-टू-गारमेंट (DTG) इत्यादी

5. टिफिन सर्व्हिस व्यवसाय

अनेकजण कामासाठी, शिक्षणासाठी आपल्या कुटुंबापासून दूर दुसऱ्या शहरात राहायला जातात. अशावेळी त्यांच्या जेवणाची समस्या उद्भवते. दररोज बाहेरचे अन्न खाल्ल्याने तब्येतही चांगली राहत नाही. अशा परिस्थितीत आजच्या काळात टिफिन सेवेचा व्यवसाय खूप विकसित होत आहे. जर तुम्ही एक महिला असाल किंवा तुम्हाला घरी कमी गुंतवणुकीचा कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल, तर अशा परिस्थितीत टिफिन सेवा व्यवसाय तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो.

हा व्यवसाय अनेक प्रकारचा असू शकतो, जसे की टिफिन देण्यासाठी लोकांच्या घरी जाणे, ग्राहकांना तुमच्या ठिकाणी बोलावणे आणि त्यांना घरासारखे जेवण देणे.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जवळपास २० ते ३० हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तसेच, तुम्ही जर दररोज ५० लोकांना दोन वेळचे जेवण देत असाल, तर तुमचा खर्च वगळून तुम्ही महिन्याला ७० हजार ते ८० रुपयांची कमाई करू शकता.

अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या वेगवेगळे व्यवसाय करू शकता.

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button