स्टार्टअपस्टार्टअप विश्व

Minimal Viable Product तुमच्या व्यवसायाला यशस्वी होण्यास मदत करणारा एक शक्तिशाली साधन

नमस्कार मित्रांनो, स्टार्टअप विश्वाच्या नव्या कोऱ्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो मला सांगा समजा तुम्हाला Market मध्ये एक Product launch करायचं आहे. असं Product की जे लोकांसाठी खूप उपयोगी असेल, असं Product की ज्यामुळे लोकांचं आयुष्य बदलून जाईल,या Product चा Sale इतका जास्त होईल की तुम्ही मालामाल व्हाल! एक मिनिट… पण असेल, जाईल, होईल या सगळ्या भविष्यातल्या गोष्टी झाल्या ना; यापैकी अजून एकही गोष्ट झालेली नाही, हे सगळं तुम्हाला सध्या फक्त वाटतंय. यातल्या गोष्टी खऱ्या ठरण्यासाठी तुम्हाला वर्तमानात यावं लागेल, म्हणजे आधी तुम्हाला तुमचं Product Launch करावं लागेल. तर आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. याच Product बद्दल म्हणजेच Minimal Viable Product बद्दल. चला मग करूया सुरुवात.

What is MVP (Minimal Viable Product)?

MVP किंवा Minimal Viable Product म्हणजे असं एक Basic Product की ज्यामध्ये तुमच्या Final Product मध्ये असणारे सगळे Main Features आहेत, पण ते इतकंही परफेक्ट नाहीये की, ते तुमच्या Final Product शी Compete करू शकेल बर हे समजून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या App चं उदाहरण पाहूया WhatsApp चं! तुम्हाला आठवतंय का जेव्हा WhatsApp launch झालं होतं, तेव्हा त्यात फक्त दोनच Features होते. Text Messaging आणि Voice Messaging. हे ते Features होते जे की Normal Users पर्यंत वापरण्यासाठी आले होते. पण त्याहीआधी WhatsApp ने त्यांचं Minimal Viable Product बनवलं होतं जे की काही लोकांनाच वापरण्यासाठी मिळालं होतं आणि त्या Version मध्ये फक्त एक महत्वाचं feature होतं ते म्हणजे Text Messaging चं! जेव्हा WhatsApp ला समजलं की आपलं हे MVP लोकांना आवडतंय, तेव्हाच त्यांनी यावर आणखी काम करायला सुरुवात केली.

MVP launch करण्यामागची कारणं

Eric Ries या अमेरिकन उद्योजकाने MVP या concept चा शोध लावला. MVP का launch केलं पाहिजे हे सांगण्यासाठी त्यांनी तीन महत्त्वाची कारणं सांगितली.

१. पहिलं कारण म्हणजे MVP मुळे तुमचं जे Dream Product आहे, ते लवकरात लवकर Market मध्ये उतरवता येतं.

२. दुसरं कारण म्हणजे तुम्हाला हे समजतं की Customer तुमच्या Product ला कसं React करतायेत. तुम्हाला जसं वाटलं होतं, तसं ते Actually काही Value Generate करतंय का? हे समजायला मदत होते.

३. तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या वेळेचा आणि पैशाचा खर्च कमी होतो. आता MVP असल्यामुळं साहजिक आहे Final Product च्या Comparison मध्ये याला बनवायला कमी वेळ आणि पैसा खर्च होणार आहे. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू म्हणजे जर तुम्ही एखादं Product मोठ्या Scale वर Launch केलं, पण ते लोकांना आवडलंच नाही तर यात नुकसान कोणाचं आहे? तुमचं! पण जर हेच Product तुम्ही MVP च्या रुपात Launch केलं आणि लोकांना ते नाही आवडलं, तर आधीच्या तुलनेत इथं होणार नुकसान हे खूप कमी  आहे. बघा आहे का नाही Double फायदा?

हा लेख विडीयो मध्ये पहा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button