स्टार्टअपस्टार्टअप विश्व

Angel Investors: स्टार्टअपसाठी एक शक्तिशाली संसाधन

Angel Investors म्हणजे अशी लोकं ज्यांच्याकडे भरपूर पैसे असतात आणि ते सुरुवातीच्या काळात नवउद्योजकांना पैशांचा पुरवठा करतात. बँक, एफडी, सोने अशा पारंपारिक आणि तुलनेने कमी रिटर्न्स देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांऐवजी ते भरभक्कम परतावा मिळेल अशा पर्यायांच्या शोधात असतात. 

बिझनेस सुरु करताना नव्या उद्योजकाकडे सुरुवातीला फायनान्ससाठी तीन पर्याय असतात – मित्र, कुटुंबीय किंवा बँका. जेव्हा तुमच्या डोक्यात बिझनेसची फक्त आयडिया असते, तेव्हा त्यात १००% जोखीम ही असतेच. त्यामुळे बँका आणि इतर मोठे गुंतवणूकदार अशा बिझनेसमध्ये पैसे गुंतवण्यास कचरतात. अशा वेळी अँजेल इन्व्हेस्टर्स हा चांगला पर्याय आहे. अँजेल म्हणजे देवदूत. गरजेच्या वेळी धावून येणारे गुंतवणूकदार म्हणून अँजेल इन्व्हेस्टर्स.

Angel Investors गुंतवलेल्या पैशांच्या बदल्यात त्यांना कंपनीत भागीदारी म्हणजेच शेअर्स द्यावे लागतात. त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. या Angel Investors चा सर्वात मोठा फायदा म्हणजे या लोकांचं नेटवर्क फार मोठं असतं आणि फायदा उद्योजकांना करून घेता येतो. आणि दुसरा फायदा म्हणजे बँकेसारखे इथे हप्ते भरण्याची गरज नाही. कारण त्यांनी शेअर्स घेतलेले असतात, त्यामुळे जर व्यवसाय वाढला तर त्यांचा फायदाच होतो आणि जर व्यवसाय बुडाला तर त्यांचा तोटा. म्हणजेच त्यांचेही पैसे बुडतात.

साधारणत: ते उद्योगाच्या विविध पैलूंची व आंत्रप्रिन्युअर्सची माहिती आदी बाबींचा तपास घेतात. याला ड्यू डिलिजेन्स असे म्हणतात. सर्वसाधारणपणे गुंतवणूकदार अशा कंपनीकडे बघतात जिच्याकडे ग्राहक पुनःपुन्हा येतील किंवा उत्पन्न चांगले मिळू शकते, चांगले मार्जिन्स असतील, उत्पादन वैशिष्ट्यपूर्ण असेल. अँजेल इन्व्हेस्टमेंट ही एक ‘हाय रिस्क, हाय रिटर्न’ गुंतवणूक आहे. जगातील Angel Investors ना अपेक्षित फायदा मिळ्ण्याचे ५० टक्क्यांहून कमी आहे.

जवळपास ५ ते ७ वर्षांत जेव्हा उद्योग नफा कमावू लागतो आणि उद्योगास भांडवल गोळा करण्यासाठी आपले शेअर्स काढतो तेव्हा एंजल इन्व्हेस्टरला व्यवसायात भागीदारीनुसार शेअर्स मिळतात. मग त्याला वाटले तर ते शेअर्स तो विकू शकतो किंवा नव्या व्यवसायात विकू शकतो.

हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button