IPO म्हणजे काय? | IPO कसे काम करते?
IPO. या टर्मबाबत तुम्ही याआधीही खूप वेळा ऐकलं असेल. लवकरच या कंपनीचा IPO येणार आहे, प्रत्येक share ची price एवढी असणार आहे, IPO या तारखेपासून सुरु होऊन या तारखेला संपणार आहे अशा काही चर्चा तुमच्या मार्केट किंग मित्रांमध्ये रंगत असतील. पण तुम्हाला कधी वाटलं का की आपल्यालाही या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती हवी? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. चला तर मग सुरुवात करूया!
IPO म्हणजे काय
IPO चा full form होतो initial public offering. नाव ऐकूनच तुम्हाला याबाबत थोडीफार कल्पना आली असेलच. तर initial public offering ही एक अशी process आहे ज्यामध्ये एखादी मोठी कंपनी शेअर market मध्ये पहिल्यांदाच त्यांचे शेअर विक्रीसाठी काढते. अजून थोडं सोप्या पद्धतीने बघायचं झालं, तर कंपनी त्यांच्या बिझनेसचा विस्तार करण्यासाठी shares च्या माध्यमातून funding गोळा करते. यामध्ये फायदा दोघांचाही होतो म्हणजे कंपनीला पैसे मिळतातच, पण त्यासोबत तुम्हालाही त्या कंपनीचे shares मिळतात म्हणजे तुम्हीसुद्धा काही टक्के का होईना त्या कंपनीचे मालक झालेले असता.
कोणत्याही यशस्वी उद्योजकाला त्याचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी भांडवलाची गरज असते आणि म्हणून तो वेळोवेळी कर्ज काढून, भागीदार जोडून किंवा मार्केट मध्ये शेअर्स विकून व्यवसायासाठी भांडवल उभे करत असतो. आज जगातील कोणतीही मोठी कंपनी बघा, त्यांच्या उत्पादन आणि सेवांच्या बळावर जगावर अधिराज्य गाजवत असतील; पण यामध्ये सर्वात मोठा वाटा अशा असंख्य हातांचा आहे, ज्यांनी या कंपन्या लहान होत्या तेव्हा त्यांच्यावर विश्वास दाखवून त्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. उदाहरणच घ्यायचं झालं तर, १९९३ साली इन्फोसिसमध्ये
केलेल्या १०००० रुपयांच्या गुंतवणुकीचे आज करोडो रुपये झाले, पण जेव्हा इन्फोसिस लहान कंपनी होती तेव्हा त्या कंपनीवर विश्वास ठेवून पैसे गुंतवणारे तुमच्या माझ्यासारखे छोटे-मोठे गुंतवणूकदारच.
IPO लॉन्च करण्याची कारणं :-
– एखाद्या कंपनीला आपलं काम वाढवायचं असेल तर त्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी ते आयपीओ लॉन्च करतात.
– एखाद्या कंपनीने जर आधी Debt म्हणजे कर्ज घेतलेले असेल तर त्यांना ते कर्ज फेडण्यासाठी आयपीओ लॉन्च करतात.
– काही जुन्या गुंतवणूकदारांना कंपनीतून बाहेर पडायचं असेल तर मग त्यासाठी कंपनी आयपीओ लॉन्च करते.
IPO कशा पद्धतीने काम करतो?
कोणतीही कंपनी तिचा IPO मार्केटमध्ये आणण्यापूर्वी private असते. या कंपनीमध्ये मग काही early investors असतात जसं की; founders, family, मित्र परिवार किंवा angel investors वगैरे. आपल्या कंपनीचा IPO मार्केटमध्ये आणणं ही खरं तर एक खूप मोठी गोष्ट असते. IPO मुळं कंपनीला जास्तीत जास्त पैसे उभारण्याची संधी मिळते. Private कंपनीपासून ती एक public कंपनी बनते. आयपीओचा कालावधी साधारणत: ४ दिवसांचा असतो. म्हणजे या ४ दिवसात या कंपनीचे शेअर्स विकत घेता येतात. त्यानंतर आयपीओ बंद होतो. मग गुंतवणूकदारांना शेअर्सचं वाटप केलं जातं. ह्या वाटप केलेल्या शेअर्सची, कंपनीची मार्केटमध्ये नोंदणी होते. त्याला ‘लिस्टिंग’ असं म्हणतात. या सर्व प्रक्रियेनंतर हे शेअर्स, गुंतवणूकदार मार्केटमध्ये हवे तेव्हा विकू शकतात.
आयपीओशी संबंधित महत्त्वाचे दिवस कोणते आहेत.
Opening Date: खऱ्या गुंतवणुकदारांसाठी आयपीओ विक्रीसाठी खुला करण्यात येतो.
Closing Date : त्या दिवसापर्यंत गुंतवणुकदार आयपीओसाठी अर्ज करु शकतात.
Allotment Date : जेव्हा शेअर वाटपाची माहिती मिळते.
Refund Date : जर तुम्हाला आयपीओमध्ये शेअर्सचे वाटप झाले नसेल, तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळल्यानंतर खात्यात अनब्लॉक केले जाते.
Credit of Shares Date : जेव्हा तुम्हाला वाटप झालेले शेअर्स तुमच्या डिमॅट खात्यात जमा होतात.
Listing Date : जेव्हा एखादी कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होते आणि इतर गुंतवणूकदारांप्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सुरु करतात
आयपीओची किंमत दोन पद्धतीने ठरवली जाते. एक फिक्स्ड प्राइस म्हणजेच निश्चित किंमत. आणि दुसरी म्हणजे बुक बिल्डिंग पद्धत. पहिल्या पद्धतीत कंपनी selling साठी काढलेल्या शेअरची किंमत आधीच ठरवते. त्यामुळे शेअर किती रुपयांना मिळणार आहे हे गुंतवणूकदारांना समजतं. त्यानंतर गुंतवणूकदार या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची की नाही याचा निर्णय घेऊ शकतात. दुसऱ्या म्हणजे बुक बिल्डिंग पद्धतीत शेअर्सचा price band ठरवला जातो. या price band मध्ये गुंतवणूकदारांना बोली लावावी लागते. म्हणजे कंपनीने जर ३०० ते ३५० रुपये असा price band ठरवला असेल, तर गुंतवणूकदारांना या किमती दरम्यान बोली लावता येते. इश्यू उघडताना कंपनी शेअरची किंमत fix करते म्हणजे त्या भावाने शेअर्सची विक्री करते. आता IPO चा main मुद्दा म्हणजे यात तुम्हाला एक, दोन shares घेता येत नाहीत. तुम्हाला shares हे लॉटमध्येच घ्यावे लागतात. उदा. जर एखाद्या आयपीओच्या एका लाॅटमध्ये १५ शेअर्स आहेत, तर गुंतवणूकदाराला कमीत कमी १५ शेअर्ससाठी बोली लावावीच लागते म्हणजे १ लाॅट खरेदी करणं compulsory आहे. त्यानंतर मग तुम्हाला १५ च्या पटीतच बोली लावावी लागते.
तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण IPO म्हणजे काय तो कशा पद्धतीने काम करतो, IPO लॉन्च करण्यामागची कारणं हे सगळं पाहिलं hope so तुम्हाला या लेखातून काहीतरी मदत नक्कीच झाली असेल. बाकी लेख आवडला तर आत्ताच त्याला like करा आणि जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा.