करिअरविद्यार्थीमित्रांसाठी खास

शिक्षणात वेगळेपण जपणारी विद्यापीठे

हे खरे आहे की, देशातील शिक्षणाच्या विकासाला अधिक विस्तारावे लागेल. पण गेल्या वर्षात झालेल्या भारतीय शिक्षणाच्या प्रगतीला बेदखलही केले जाऊ शकत नाही. रोचक हे आहे की, जगभरात पहिल्यांदा उघडणारी अनेक विद्यापीठे भारतात आहेत. काही विशेष क्षेत्रांमध्ये विशेष (स्पेशलाइझ्ड) शिक्षणाशी जोडलेल्या संस्थादेखील इथे अस्तित्वात आहेत, ज्या शैक्षणिक विकासासाठी
प्रयत्नरत आहेत.

👍 पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमध्ये

अशातच झालेल्या सरकारी घोषणेनुसार, गुजरातच्या वडोदरा येथे देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यापीठ एमबीए व एमटेक पदवी प्रदान करील. नंतर रेल्वे ऑपरेशन्समध्ये (अभियान) पदविका व बीटेकची पदवीदेखील इथे उपलब्ध असेल.

  • काय विशेष : ही संस्था भारताला रेल्वे अभियांत्रिकी व व्यवस्थापनात संशोधन व विकासाच्या जागतिक केंद्रात परिवर्तित करेल.
Top Universities Embracing Uniqueness in Education

👍 गुडगावात पहिले संरक्षण विद्यापीठ

संरक्षण क्षेत्रात धोरण बनवणाऱ्या विशेषज्ञांपासून ते परदेशाशी संरक्षण संबंधांवर संशोधनासाठी सुरू होणाऱ्या या देशातील पहिल्या राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाची निर्मिती गुडगावातील बिनौला गावात सुरूही झाली आहे. इथे लष्करी शिक्षणात प्रशिक्षण आणि शोधासाठी ही एक अशा प्रकारचे अनोखे व पहिले शिक्षण संस्थान असेल.

  • काय विशेष : संरक्षण संशोधनासह युनिव्हर्सिटी डिफेन्स स्टडीज, डिफेन्स मॅनेजमेंट, डिफेन्स सायन्स व टेक्नॉलॉजी क्षेत्रात उच्च शिक्षणाला विकसित करेल.

👍 मणिपुरात राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ

तसे पाहता खेळासाठी देशात अनेक संस्था आहेत. पण आता राष्ट्रीय स्तरावर खेळाच्या विकासासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी बजेट २०१४-१५ मध्ये प्रस्तावित राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना मणिपुरातील थाऊबल जिल्ह्यामध्ये केली जाईल.

  • काय विशेष : खेळाच्या क्षेत्रात शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावर शिक्षण संस्था असतील. बीपीएड, एमपीएड, फिजिओथेरपी, फिटनेस, क्रीडा व्यवस्थापनाशी संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध होतील.
Top Universities Embracing Uniqueness in Education

👍 रोचक तथ्य

  • २०,००० हून अधिक विद्यार्थ्यांसह बीएचयू आशियातील सर्वात मोठ्या निवासी विद्यापीठांपैकी एक आहे.
  • ७०० हून अधिक विद्यापीठे व ३८,००० महाविद्यालयांसह भारत जगातील सर्वात मोठ्या हायर एज्युकेशन सेक्टर(क्षेत्र) असणाऱ्या देशांपैकी एक आहे.
  • ४० लाखांहून अधिक विद्यार्थी संख्या असणारे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ हे जगातील सर्वात मोठे राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आहे.
  • भारतात केवळ भाषांनाच समर्पित वा वाहिलेली हून २० अधिक विद्यापीठे आहेत.

👍 जगभरात पहिल्यांदा

  • गुजरात फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी, फॉरेन्सिक व इन्व्हेस्टिगेटिव्ह सायन्सला समर्पित जगभरातील हे एकमेव विद्यापीठ आहे.
  • जगातील पहिली होमिओपॅथी युनिव्हर्सिटी जयपुरात (साईपुरा) आहे.
  • जगातील पहिली किडनी प्रत्यारोपण युनिव्हर्सिटी अहमदाबादेत आहे.
  • २०१५ मध्ये स्थापन झालेल्या गुजरात युनिव्हर्सिटी ऑफ ट्रान्सप्लांटेशन संपूर्ण विश्वात ट्रान्सप्लांटेशन व अलाइड सायन्सेसचे हे पहिले विद्यापीठ आहे.
  • देशातील पहिली ट्रान्स डिसिप्लिनरी हेल्थ युनिव्हर्सिटी – इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्स डिसिप्लिनरी हेल्थ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी बंगळुरूत स्थापन झालेली आहे.

👍 हेदेखील आहे विशेष

रॉयल स्कूल ऑफ माइन्स – लंडनच्या धर्तीवर तयार झालेली इंडियन स्कूल ऑफ माइन्स धनबादला खाण शिक्षणाच्या उद्देशानेच सुरू केले गेले. जे अनेक विभागांसह टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये विकसित झालेले आहे.
आंध्र प्रदेशची द्रविड युनिव्हर्सिटी – द्रविड भाषा आणि संस्कृतीच्या विकासासाठी स्थापित केली गेली होती. दोन विभागांसह सुरू झालेले हे विद्यापीठ आता जवळजवळ २० शैक्षणिक विभागांसह विस्तारली आहेत.

👍 देशात प्रथमत:च

  • रक्षा शक्ती युनिव्हर्सिटी – भारतात अशा प्रकारातले हे पहिलेच विद्यापीठ आहे. जे पोलिस सायन्स व इंटर्नल सिक्युरिटीमध्ये प्रमाणपत्र, पदविका व पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून देते.
  • हरियाणास्थित नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर देशातील एकमात्र इन्स्टिट्यूट आहे. जे न्यूूरो सायन्समधील संशोधन व शिक्षणासाठी समर्पित आहे.
  • बीएचयूचे मालवीय सेंटर फॉर पीस रिसर्च भारतीय विद्यापीठाच्या प्रणालीत आपल्या प्रकारातले पहिलेच केंद्र आहे.
  • युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी स्टडीज भारताची पहिली एनर्जी युनिव्हर्सिटी आणि आशियातील पहिली आणि एकमात्र ऊर्जा व कोअर सेक्टर विद्यापीठ आहे.

👍 केरळात येणार जेंडर रिसर्च युनिव्हर्सिटी

केरळ सरकार देशातील अशा प्रकारचे पहिले विद्यापीठ कोझिकोडे जिल्ह्यात स्थापन करण्याच्या तयारीत आहे, जे विशेष करून जेंडर(लिंग)शी संबंधित संशोधन अभ्यासासाठी असेल. विद्यापीठाची संकल्पना विदेशी संस्थांच्या नमुन्यानुसार तयार केली जात आहे.

  • काय आहे विशेष : करिकुलम आणि अभ्यासक्रम पारंपरिकऐवजी आंतरराष्ट्रीय मानकानुसार वा त्यावर आधारित असेल.

👍 झारखंडमध्ये सेंट्रल आयुष युनिव्हर्सिटी

अशातच झालेल्या एका घोषणेच्या अनुसार, रांचीत सेंट्रल आयुष युनिव्हर्सिटीची स्थापना होईल, ज्यात देशी आणि पारंपरिक चिकित्सा पद्धती व औषधी वनस्पतींवर संशोधनाशिवाय पदवी व पदविका अभ्यासक्रम असेल. छत्तीसगडमध्येही आयुष अँड हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटी, छत्तीसगड अस्तित्वात आहे.

  • काय विशेष : याविषयी संबंधित क्षेत्रातील शिक्षणाला अधिक मजबुती मिळेल.
Top Universities Embracing Uniqueness in Education

👍 संशोधन व नवकल्पनांचे शिक्षण

अशातच प्रधानमंत्री कार्यालयात मनुष्यबळ विकास मंत्रालयातून संशोधन व नवकल्पनांसाठी (सर्जनशीलता-नवोन्मेष) १० खासगी स्वायत्त विद्यापीठे स्थापन करण्याच्या योजनेत वेग आणण्यासाठी सांगितले गेले आहे. या प्रकरणी उच्च शिक्षणासाठी जगभरातील खासगी संस्थांचा भारतात येण्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकेल.

  • काय विशेष : ही विद्यापीठे संशोधन व नवकल्पनांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करवतील.

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button