कमी भांडवलात जास्त टर्नओव्हर कसा करायचा?
एक सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झालेला तरुण, पुण्याला आठ वर्षे नोकरी केली, कामाचा चांगला अनुभव घेतला. घेतलेला फ्लॅट ५० लाखांना विकला व नोकरीचा राजीनामा देऊन गावी जिल्ह्याच्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरु केला. गोड बोलणे, अप्रतिम संवादकौशल्य, बांधकाम व्यवसायाचे चांगले ज्ञान याचा पुरेपूर वापर करून पहिला पाच गुंठ्याचा एक प्लॉट घेतला. मूळ मालकाला पैसे न देता २ बीएचके देऊन व्यवहार केला. उरलेले सात फ्लॅट जाहिरात करून विकले. बाकीचे बिल्डर्स १ बीएचके २० लाखाला द्यायचे व एका फ्लॅटमागे पाच लाख नफा काढायचे. याने मात्र १७ लाख दर लावला. पेमेंटमध्येही फ्लेक्झिबिलिटी (सुलभता) ठेवली. सात जणांनी ३०% भरून बुकिंग केले. त्यामुळे हातात २०-२५ लाखांचे खेळते भांडवल आले. शिवाय पुण्यातील फ्लॅटचे पैसे तसेच शिल्लक होते. ते नवीन प्लॉट खरेदीसाठी वापरले. पीडीसी चेक देऊन ६० दिवसांच्या क्रेडिटवर माल उचलू लागला.
हातात असणाऱ्या भांडवलावर त्याने ७ प्रकल्प पूर्ण केले. प्रत्येक प्रकल्पात ८ फ्लॅट आणि एका फ्लॅटमागे १-२ लाख रुपये एवढाच नफा ठेवला; पण उलाढाल मोठी झाली. त्यामुळे मार्केटमध्ये पत निर्माण झाली. माफक दरात व योग्य वेळेत घर देणारा बिल्डर म्हणून नावही झाले. केवळ दोन वर्षांत १०-१२ कोटींची उलाढाल खात्यावर दिसू लागली, त्यामुळे बँकेनेही १ कोटींचे बिझनेस लोन देऊ केले.
हे उदाहरण आहे, कमी भांडवलात जास्त टर्नओव्हर करण्याचे. हे मूळ व्यवसायातच गुंतवावे. लगेच फर्निचर, गाड्या, ऑफिस अशा अनुत्पादक बाबीत गुंतवू नये. उद्योजकाला कोणतेही अनुत्पादक ओव्हरहेड्स नसावेत. जर टर्नओव्हर वाढवायचा असेल, तर प्रॉफिट मार्जिन कमी ठेवावे. मार्केटिंगवर भर द्यावा. पर्चेसमध्ये क्रेडिट वाढवत ठेवावी. योग्य वेळेत पैसे व हमी दिली की पत वाढतच जाते. एकामागून एक माल विकणे किंवा दुसरे प्रोजेक्ट चालूच ठेवावेत.
तुम्ही तुमचे भांडवल कसे मॅनेज करता आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी नवी अर्थक्रांतीला फॉलो करा.
आणखी वाचा
- तुमच्या व्यवसायासाठी Hero Product कसे निवडावे?
- स्टार्टअपसाठी फंडिंग मिळवण्यासाठी Pitch Deck कसा तयार करावा?
- 7 चुका ज्या तुम्ही तुमच्या स्टार्टअपमध्ये टाळल्या पाहिजेत