यशस्वी होण्यासाठी टाईम मॅनेजमेंट (Time management) कसे करावे?
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; यशस्वी होण्यासाठी टाईम मॅनेजमेंट (Time Management) कसे करावे… करायची सुरवात?
आयुष्य म्हणजे तरी काय? जन्मापासून मृत्यूपर्यंत तुमच्याकडे असणारा वेळच. जो हा वेळ अत्यंत प्रभावीपणे वापरतो, तोच आयुष्यात यशस्वी होतो. आपला वेळ शास्त्रशुध्द पध्दतीने कसा वापरावा, जेणेकरून तुम्ही जीवनात व उद्योगात यशस्वी व्हाल? प्रथम आज, या महिन्यात, या वर्षी, या आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे, ते ध्येय निश्चित करा व त्यानुसार टाईम मॅनेजमेंट (Time Management) करा. रोज सकाळी शांतपणे दिवसभराच्या नियोजनासाठी १५ मिनिटे द्या. प्राधान्यक्रमानुसार कामाची यादी बनवा, कामाचे चार भाग बनवा.
पहिली – अत्यावश्यक व अर्जंट अशी कामे पहिल्यांदा करा;
दुसरी – महत्वाची पण अर्जंट नाहीत, ती त्यानंतर करा;
तिसरी – अर्जंट पण महत्वाची नाही, ती त्यानंतर करा;
चौथी – अर्जंटही नाहीत व महत्वाची नाहीत, ती कामे शेवटी वेळ उरला तर करा.
दिवस सुरू करताना वहीमध्ये कामाची नोंद करा व दिवस संपताना ती पूर्ण झाल्याची खात्री करा. नाही म्हणायला शिका, प्रत्येक फोन घेतलाच पाहिजे किंवा लगेच घेतला पाहिजे, ईमेल किंवा फेसबुक किंवा व्हॉटसअपवर आलेल्या मेसेजला लगेच रिप्लाय केलाच पाहिजे असे नाही. पहिल्यांदा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. फोन कितीही वाजू दे, अत्यंत महत्वाचा असेल, तरच उचला. ई-मेल, व्हॉटसअपला ठराविक वेळेनंतर रिप्लाय द्या. सकाळी एकदा, दुपारी एकदा, सायंकाळी एकदा असा प्रत्येकी १५ मिनिटांचा वेळ द्या. सर्व कामे स्वतः करण्याचा आग्रह धरू नका कमी महत्वाची, वेळखाऊ कामे इतरांकडून करून घ्या. ज्याचे काम त्याने करावे, वेळेचा व पैशाचा अपव्यय त्यामुळे टळतो.
आज जीवनातील अनेक लोकांच्या एकाच वेळी संपर्कामुळे डिस्ट्रॅक्शन खूप वाढले आहे, ते कमी करा, त्यामुळे तुमचा वेळ वाचेल. नातेवाईक, मित्र, क्लब इत्यादींचा उगाचच फापट पसारा वाढवू नका. सिलेक्टिव्ह व्हा, ज्याच्यांशी आपले जमते अशांशी सबंध व संपर्क ठेवा, त्यामुळे तुमचे आयुष्यातील वेळ वाचून सुखी, श्रीमंत व समृध्द होत राहाल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःची काळजी घ्या, वेळेवर उठणे, थोडासा का होईना व्यायाम करणे, वेळेवर योग्य आहार घेणे याकडे लक्ष द्या. किमान आठ तास झोप व्हायला हवी, तरच दिवसभराचे जीवनाचे टाईम मॅनेजमेंट (Time Management) तुम्हाला साधता येईल.
तुम्ही तुमचे टाइम मॅनेजमेंट (Time Management) कसे करता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेल ला आताच सब्स्क्राइब करा.