प्रत्येकजण बिझनेस सुरू करताना करतो ‘या’ 7 Common चुका, पण तुम्ही चुकू नका; वाचा
व्यवसाय करायचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मित्रांनो, असे अनेक बिझनेस स्टार्टअप आहेत, जे सध्याच्या बाजारात मोठ्या आव्हानांचा सामना करताना दिसत आहेत. मात्र, जर तुम्ही स्वतःचा स्टार्टअप लाँच करण्याचा विचार करत असाल किंवा आधीपासून या प्रक्रियेत उडी घेतली असेल, तर तुम्ही एक किंवा त्याहून अधिक कॉमन (Common) स्टार्टअप समस्या अनुभवल्या असतील. खरं तर, आज आम्ही तुम्हाला अशा ७ कॉमन स्टार्टअप चुका सांगणार आहोत, ज्यांच्यावर तोडगा काढला जाऊ शकतो. चला तर, वेळ न घालवता जाणून घेऊयात…
१. पात्र उमेदवार
हे जग वेगाने पुढे जात आहे. जगात अनेक लोक आहेत आणि त्यांच्यासाठी कधीही न संपणारे इंटरनेट कनेक्शनही आहे. अशात तुम्हाला वाटते की, नवीन स्टार्टअपमध्ये काम करण्यासाठी आपल्याला पात्र उमेदवार सापडतील. मात्र, दुर्दैवाने असे नसते. पात्र उमेदवार शोधणे हे तितकेच आव्हानात्मक असू शकते. तसेच, तुम्हाला पात्र उमेदवार जरी मिळाला, तरीही त्याच्या कामाची पद्धत, त्याची मूल्ये आणि इतर गोष्टी आवडतीलच असे होत नाही.
त्यामुळे नवीन स्टार्टअप आणि प्रस्थापित व्यवसायांसह पात्र उमेदवारांना जोडण्यासाठी चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या जॉब पोर्टल साइट्सचा वापर केल्याने तुम्ही फक्त आवश्यक पात्रता असलेल्यांचीच मुलाखत घेत आहात, याची खात्री करू शकता. इंटरनेट तुमच्या निवडी कमी करण्यासाठी अनेक उत्तम साधने ऑफर करत असताना तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका.
२. एचआर आणि पगार
स्टार्टअप सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात एचआर विभाग आणि त्याचे सर्व पैलू हाताळणे, यामुळे संपूर्ण स्टार्टअप प्रक्रियेत अतिरिक्त ताण आणि चिंता वाढवू शकते. त्यामुळे, तुमच्याकडे जे काही आहे ते पुरेसे आहे. तुमच्यासाठी फक्त तुमच्या ब्रँडची प्रतिमा आणि मूल्यांवर काम करणे, नवीन कर्मचारी नियुक्त करणे, दुकान सुरू करणे आणि आपल्या ग्राहकांचा शोध घेणे, हे महत्त्वाचे आहे. तुम्हाला शेवटची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे एचआर विभाग स्थापन करणे.
हा अधिकचा ताण टाळण्यासाठी, काही व्यवसाय एचआर विभाग हाताळण्यासाठी पीईओ (Professional Employer Organization) सेवा निवडतात. जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी सर्वोत्तम PEO कंपन्यांपैकी एक निवडता, तेव्हा तुमच्या सर्व HR संबंधी गरजांची काळजी घेतली जाते. यामुळे होतं असं की, तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू शकता.
३. वाढती स्पर्धा
सध्याच्या जगात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. यामागील कारण फक्त एकच आहे. ते म्हणजे वेब. वेब पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात लोकांना जोडत असल्याने स्पर्धा वाढली आहे. नवीन व्यवसायांना त्यांच्या उद्योगांमध्ये अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते, ज्यामध्ये सारखाच व्यवसाय करणारे सुस्थापित व्यावसायिक आधीच मोठ्या संख्येने ग्राहकांचे नेतृत्व करतात. तसेच, आपली प्रतिष्ठाही निर्माण करतात. अनेकदा काही व्यवसाय मालक या आव्हानामुळे भारावून जातात, परंतु याकडे वाईट गोष्ट म्हणून पाहण्याऐवजी, वाढ होण्याची संधी म्हणून पाहा. स्पर्धेचा अभ्यास केल्याने, बाजार आणि तुमच्या भावी ग्राहकांबद्दल महत्त्वाची माहिती मिळू शकते.
४. मार्केटिंगसाठी कष्ट न घेणे
मार्केटिंग हा तुमच्या व्यवसायाच्या आत्मा आहे. कारण, यामुळेच नवीन ग्राहक तुमच्या स्टोअर किंवा वेबसाइटवर येतात. तसेच, तुमच्या ब्रँडची दृश्यमानता (Visibility) वाढवते आणि तुम्ही ज्या उद्योगात काम करत आहात, त्या उद्योगाचा एक प्रतिष्ठित भाग म्हणून तुमचा व्यवसाय स्थापित करण्यात मदत करते. अनेक स्टार्टअप्स मार्केटिंगसाठी संघर्ष करतात. कारण, त्यांच्याकडे पेरोलवर कोणीही नसते, ज्यामुळे त्यांना कळेल की, ते काय करत आहेत. मार्केटिंग किंवा SEO तज्ञ हा नवीन व्यवसायाचा व्यावहारिकदृष्ट्या एक आवश्यक घटक आहे. कारण, चांगल्या मार्केटिंगशिवाय, आपल्या उत्कृष्ट उत्पादनांबद्दल किंवा सेवांबद्दल कोणालाही माहिती होणार नाही.
तुम्ही जर मार्केटिंगमध्ये संघर्ष करत असाल, तर थर्ड पार्टी फर्म किंवा SEO तज्ञ नियुक्त केला पाहिजे. जेणेकरून तुमच्या नवीन व्यवसायाला तुमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत मिळू शकते. तसेच, ते सातत्याने तुमच्याकडे येत राहतील.
५. निधी (फंडिंग)
खरं तर, अनेक व्यवसाय असे असतात, ज्यांना पुरेसा निधी कधीच मिळत नाही, मिळतो का? दररोज किंवा आठवड्याला आपल्याकडे कल्पना येतात, त्यापैकी काहींवर आपण कृती करतो आणि इतर काही बॅकअपमध्ये अशा वेळेसाठी ठेवतो, जेव्हा आपल्याकडे जास्त पैसा, अधिक वेळ किंवा स्पष्टता असते. अनेक स्टार्टअप्सना निधीच्या कमतरतेच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि काहींना मर्यादित बजेटमुळे काही उत्पादने आणि सेवाही मिळतात.
निधी कधीही पुरेसा पुरवठा करत नाही, परंतु स्टार्टअप आणि स्थापित व्यवसायांसाठी बरेच पर्याय असतात. नवीन स्टार्टअपसाठी एंजेल गुंतवणूकदार, बँक कर्ज आणि नेहमीच लोकप्रिय क्राऊड-फंडिंग यांसारखे काही पर्याय आहेत. गुंतवणूकीसाठी पैसे कर्ज म्हणून घेण्यापूर्वी किंवा स्वीकारण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या निधीच्या अटींची चांगली जाणीव आहे, याची खात्री जरूर करा.
६. वेळेचे खराब नियोजन
नवीन व्यवसाय जेव्हाही सुरू करतात, तेव्हा व्यवसाय मालक एक सामान्य चूक नक्कीच करतात. ती म्हणजे, त्यांना वाटते की, ते संपूर्ण व्यवसाय स्वत: व्यवस्थापित करू शकतात. आपल्या वैयक्तिक दृष्टिकोनातून इतरांवर विश्वास ठेवणे, अर्थातच कठीण काम आहे. तुमच्या व्यवसायाचे यश हे थेट तुमच्या वैयक्तिक यशाशी जोडलेले असते. वस्तुस्थिती अशी आहे की, प्रत्येकजण चांगला व्यवस्थापक नसतो. काही लोक जरी कल्पना, वित्त किंवा मार्केटिंगमध्ये उत्कृष्ट असले, तरीही व्यवसाय व्यवस्थापित करू शकत नाहीत. तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या व्यवस्थापनाशी संघर्ष होत असल्यास, तुम्हाला तो चालवण्यात मदत करण्यासाठी कोणालातरी कामावर घेणे, यात कसलीही लाज नाही. याव्यतिरिक्त तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखत असलेल्या व्यक्तीला, ज्याला व्यवस्थापन प्रक्रियेसाठी योग्य कौशल्ये माहिती आहेत, अशा व्यक्तीला व्यावसायिक भागीदार बनवण्यात कोणतीही अडचण नाही.
७. संवाद
नवीन स्टार्टअप म्हणजे एका कॉर्पोरेट छताखाली काम करणारी पूर्णपणे नवीन टीम असू शकते. अगदी उत्तम परिस्थितीतही संवाद आव्हानात्मक बनू शकतो. नवीन लोकांशी जुळवून घेणे प्रत्येकासाठी सोपे नसते, परंतु व्यवसायाच्या निरंतर यशासाठी तुमच्या सहकाऱ्यांमध्ये योग्य संवाद असणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन चॅट रूमसह एक संघ व्यवस्थापन प्लॅटफॉर्म सेट करा, जेणेकरून व्यवसायातील प्रत्येकजण सहजपणे एकमेकांशी संपर्क साधू शकेल, फायली शेअर करू शकेल आणि त्यातूनच कामांचे वाटपही करू शकेल.
तर मित्रांनो, आता व्यवसायात उतरताना किंवा उतरला असाल, तर तुम्ही या समस्या ओळखून त्यावर तोडगा काढू शकता.
तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर कमेंटमध्ये Yes असे लिहा. तसेच, तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवर लेख वाचायला आवडतील, हेदेखील कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमच्या मित्रमंडळींनाही हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.