व्यापाराची त्रिसूत्री : चतुराई, मेहनत, नीती
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विस्डम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे जे तराजू चालवतील, तेच संपत्ती कमवतील… करायची सुरवात?
व्यापार हा चतुराईने होत असतो. तुमच्याकडे खूप भांडवल, खूप हुशारी आहे, तुम्ही खूप मेहनती आहात, तरीही व्यापारात यशस्वी होण्यासाठी चतुराई खूप महत्वाची आहे. फक्त मेहनतीनेच व्यापार होत असता, तर काबाडकष्ट करणारे सर्वजण व्यापारी व श्रीमंत झाले असते. चतुराई म्हणजे योग्य वेळी, योग्य निर्णय घेण्याची कला… योग्य व्यक्ती, संस्थांशी संवादाची कला… कधी थांबायचे, कधी माघार घ्यायची, कधी व कसे आक्रमक व्हायचे? कधी बचत करायची, कधी खर्च करायचा याचे तारतम्य. मार्केटची हवा ओळखून आपला बिझनेस चालविणे होय.
फक्त चतुराई असेल पण मेहनत नसेल तरी चालणार नाही. चतुराईने बिझनेस चालतो, पण काही मर्यादेपर्यंत… पुढे तो वाढवण्यासाठी सतत मेहनत करावी लागते. योग्य व्यवस्थापन ठेवण्यासाठी, व्यवसायाला योग्य तो वेळ देण्यासाठी तसेच योग्य लोकांची नियुक्ती करण्यासाठी मेहनत करावी लागते. तुमचा आयक्यू कितीही चांगला असला तरी मोठे ज्ञान मिळविण्यासाठी तुम्हाला शेकडो पुस्तके वाचावीच लागतात, तेव्हाच तुम्ही ज्ञानी व्हाल. फक्त आयक्युने काम चालणार नाही. त्याप्रमाणे चतुराईला मेहनतीची जोड लागते.
नीती म्हणजे तुमचा व्यवसाय करण्याच्या पध्दतीमुळे मार्केटमध्ये तुमचा एक प्रकारचा नावलौकिक तयार होतो. तुमची व्यापार करण्याची हातोटी, व्यवहार करण्यातील प्रामाणिकपणा, ग्राहकांना विक्री पश्चात सेवा, योग्य ब्रँड व व्यक्तीबरोबर नेटवर्क यामुळे ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्यात तुमचे नाव व ब्रॅंड तयार होतो व व्यवसाय मोठा होतो. याचा मूलभूत पाया व तयारी तुमच्या नीतीपासून तयार होते. तुमच्या कर्मचाऱ्यांशी तुम्ही प्रोफेशनल वागत असाल तर अधिक चांगले लोक तुम्हाला येऊन मिळतील. तुम्ही पुरवठादारांची देणी वेळेत देणार असाल, तर अधिक क्रेडिट मिळते व मोठी पत तयार होते.
म्हणजेच, व्यवसाय करण्यासाठी माणसाला चतुराई लागते, तो चालवण्यासाठी मेहनत लागते आणि तो मोठा होण्यासाठी नीती असावी लागते. तुम्ही ही त्रिसूत्री वापरताय का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडल्यास लेख लाईक आणि शेअर करा. नवी अर्थक्रांती चॅनेल अजून सब्स्क्राइब केला नसेल तर आत्ताच सब्स्क्राइबसुद्धा करा.