1 जानेवारीला नवीन वर्ष का साजरे करतात? जाणून घ्या इतिहास आणि रहस्ये
नमस्कार Wishing you a very Happy New Year हो हो आम्हाला माहितीये की New Year सुरु व्हायला काही तास बाकी आहेत पण म्हटलं आता तुम्हाला सगळीकडून New Year Wishes चे Calls, Messages यायला सुरुवात होईल आणि परत तुम्ही Busy होऊन जाल त्यापेक्षा आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला Advance मध्ये New Year च्या शुभेच्छा देऊन ठेवलेल्या बऱ्या. काही तासांतच आता नवीन वर्षाला सुरुवात होतीये त्यामुळं आम्ही ठरवलं की नवीन वर्षात पहिला लेख हा नवीन वर्षावरंच बनवला तर तुम्हालाही तो पाहायला आवडेल.
आता मला सांगा तुम्ही कधी विचार केलाय का, की 1 जानेवारीपासूनच हे नवं वर्ष का सुरू होतं? वर्षात नेहमी 364 किंवा 365 दिवस आणि 12 महिनेच का असतात? वर्षाला 12 महिने देण्यात हिंदू Calendars ची काही भूमिका आहे का? हिंदू, रोमन रिपब्लिकन आणि ग्रेगॅरियन कॅलेंडर केव्हा आलं? अशा काही प्रश्नांची उत्तर आपण या लेखातून जाणून घेऊया.
Calender च्या बाबतीत बोलायचं झालं तर आधी हिंदू मग रोमन रिपब्लिकन, ज्यूलियन आणि त्यानंतर ग्रेगॅरियन कॅलेंडर आलं. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया हिंदू Calendars बाबत. हिंदू कॅलेंडरद्वारे तारखांचा वापर भारतात इसवी सन पूर्व 1000 वर्षांपासून केला जातोय. याचा उपयोग हिंदू धार्मिक वर्ष ठरवण्यासाठी केला जातो. हे Calendars 12 चांद्र म्हणजेच Lunar Months वर आधारित आहे. हिंदू कॅलेंडरमध्ये Lunar Year नेहमीच 354 दिवसांचं, तर Solar Year 365 दिवसांचं असतं. प्रत्येक महिन्यात प्रत्येकी 15 दिवसांचे दोन पक्ष असतात. कधी तरी दोन तिथी एकाच दिवशी येतात. अशा परिस्थितीत, वर्षातल्या दिवसांची संख्या संतुलित करण्यासाठी असतो तो अधिक मास.
हिंदू कॅलेंडरनंतर रोमन रिपब्लिकन कॅलेंडर इसवी सन पूर्व 738 मध्ये प्रचलित झालं. हे कॅलेंडर सुरुवातीला रोममध्ये प्रचलित होतं. त्यापूर्वी ग्रीक Lunar कॅलेंडर इसवी सन पूर्व 800 मध्ये ग्रीसमध्ये प्रचलित होतं. या कॅलेंडरमध्ये 354 दिवसांचं Lunar Year आणि 365 दिवसांचं Solar Year असल्यानं नवीन खगोलशास्त्रीय गणनांऐवजी ती थेट हिंदू कॅलेंडरला धरून केली गेली, असं मानलं जातं.
सुरुवातीच्या रोमन कॅलेंडरमध्ये 10 महिन्यांचं वर्ष व फक्त 304 दिवस होते. यामध्ये 61 दिवस दुर्लक्षित करण्यात आले होते. त्यामुळे ऋतूंच्या महिन्यात फरक पडत होता. या कॅलेंडरमध्ये मार्टिस, एप्रिलिस, माइस, जुनिस, क्विंटिलीस, सेक्सटिलिस, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर अशी महिन्यांची नावं होती.
बर्याच काळानंतर, इसपू ७१५ ते ६७२ या काळात रोमचा शासक असणाऱ्या नुमा पोम्पीलिअस याने हे कॅलेंडर बदललं. त्यामध्ये जानेवारी हा पहिला आणि फेब्रुवारी हा शेवटचा महिना म्हणून जोडला गेला. पुढे इसवी सन पूर्व 452 मध्ये फेब्रुवारी हा महिना जानेवारी ते मार्च या दोन महिन्यांच्या दरम्यान आणला गेला. इ. स. पूर्व पहिल्या शतकात रोमन कॅलेंडर खूप गोंधळात टाकणारं बनलं होतं. शेवटी, ज्युलियस सीझरने इसवी सन पूर्व 46 मध्ये या कॅलेंडरमध्ये मोठ्या सुधारणा केल्या. त्यामुळे तारखांची नवीन System Generate झाली. या नवीन कॅलेंडरला ‘ज्यूलियन कॅलेंडर’ असं नाव देण्यात आलं. Solar Year ची संकल्पना स्वीकारून ज्युलियसने वर्षातल्या दिवसांची संख्या 445 पर्यंत वाढवली. यामुळेही बराच गोंधळ निर्माण झाला आणि इसवी सन पूर्व 8 पर्यंत त्याचा म्हणावा असा उपयोग होऊ शकला नाही.
पोप ग्रेगरी यांनी इसवी सण 1582 मध्ये जूलियस सीजरने तयार केलेल्या कॅलेंडरमधील लीप वर्षांची चूक शोधली आणि दर चार वर्षांनी एक Extra Day म्हणजेच Leap Day या Calendars मध्ये Add केला. जूलियस सीजरने ज्याप्रमाणे त्याने केलेल्या Calendars ला नाव दिलं, तसं पोप यांना सुद्धा आपण बनवलेल्या Calendars ला काहीतरी नाव द्यावं असं वाटलं आणि म्हणूनच त्यांनी या कॅलेंडरला नाव दिलं ‘ग्रेगरियन कॅलेंडर’.
चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ही हिंदू नववर्षाची सुरुवात मानली जाते. त्याला ‘हिंदू नवसंवत्सर’ असंही म्हणतात. इस्लामिक कॅलेंडरनुसार, हिजरी नवीन वर्ष मोहरम महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरू होतं, तर आपले ख्रिस्ती बांधव 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरं करतात. धर्मानुसार पाहायला गेलं, तर प्रत्येक धर्माचं नवीन वर्ष हे वेगवेगळ्या दिवशी सुरु होतं, पण उत्सव हा सगळ्यांनी सोबत येऊन साजरा करायचा असतो. त्यामुळे धर्म थोडा बाजूला ठेऊन सर्वजण माणूस म्हणून एकत्र येऊया आणि या नववर्षाचं स्वागत धुमधडाक्यात करूया.