स्टार्टअपस्टार्टअप विश्व

स्टार्टअपसाठी फंडिंग मिळवण्यासाठी Pitch Deck कसा तयार करावा?

Pitch Deck – मित्रांनो आजपर्यंत आपण स्टार्टअप विश्वाच्या भागात वेगवेगळ्या terms पाहिल्या. यातल्या बराचशा गोष्टी तुमच्यासाठी नवीन असतील किंवा काही आधीपासून माहितीही असतील. जर तुम्ही सुरुवातीपासून ही series पाहत असाल, तर नक्कीच तुमच्या डोक्यात स्टार्टअपची एखादी तरी कल्पना शिजली असेल. काही जणांनी ती प्रत्येक्षात उतरवलीसुद्धा असेल. पण कसंय, कल्पना वगैरे सगळं ठीके ओ! ती कल्पना सत्यात उतरवायला किती पैसे लागतात याचा एकदा हिशोब काढला ना की, वाटतं जाऊ दे… कोणी सांगितलेत एवढे पैसे घालायला? त्यापेक्षा आपलं रोजचं कामच बरंय! पण सगळेच काही असा विचार करत नाहीत बरं का! काहीजण असतात खतरों के खिलाड़ी; रिस्क घ्यायला तयार असतात.

सुरुवातीला स्वतःचे पैसे घालवून, family कडून, मित्रांकडून पैसे घेऊन ते एकदाचा स्टार्टअप सुरु करतात, पण अजून growth करण्यासाठी अजून पैसे हवे असतात; सगळी गडबड होते ती इथं! डायरेक्ट एखाद्याकडे पैसे मागायला गेलं, तर कोणी पैसे देत नाही… तोंडी व्यवहाराला काही व्हॅल्यू नसते. Pitch Deck बद्दल त्यांनी कधी ऐकलेलंच नसतं; ऐकलं असेल तरी त्यात करायचंय काय हे त्यांना माहिती नसतं. तुम्हाला माहितीये का? असेल तर चांगलंच आहे आणि नसेल तर त्याहून चांगलंय; कारण आजचा हा लेख तुमच्यासाठीच आहे. चला मग करूया सुरुवात.

Pitch deck / startup deck / slide deck म्हणजे काय तर तुमच्या कंपनीबद्दलचं असं एक presentation जे तुम्ही investors ला दाखवता. त्या presentation च्या आधारावरच investors  ठरवतात की तुमच्या कंपनीत investment करायची का नाही ते. हे ऐकून तुमच्या डोक्यात काही तरी आलं असेल; आलं ना? बरोबर Shark Tank. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या show मध्ये वेगवेगळे founders यायचे आणि तिथल्या Sharks ना त्यांच्या कंपनीबाबत pitch करायचे. मग Sharks ना जर ते सगळे मुद्दे पटले, काही तरी interesting वाटलं तरंच ते त्यात investment करायचे. यासाठी एक साधं, सरळ, Concise Pitch Deck बनवणं हे खूप गरजेचं असतं, कारण याचाच फायदा तुम्हाला Funding raise करण्यासाठी होतो.

Slide 1: Problem

कोणत्याही स्टार्टअपची सुरुवात होते एका problem पासून. म्हणजे लोक त्यांच्या रोजच्या जीवनात काय problems face करतायेत आणि तुम्ही त्या problem कडे कसं पाहताय हे येणार first slide मध्ये. उदाहरणार्थ, लोकांना जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असायचं, तेव्हा त्यांना कधी कधी वेळेवर रिक्षा मिळायच्या तर कधी कधी तासनतास थांबून सुद्धा एकही रिक्षा मिळत नसायची. हा झाला Problem जो लोक face करत होते.

Slide 2: Solution

आता तुम्ही त्या problem वर काय solution देताय हे येणार second slide वर. पहिल्या उदाहरणाला जर continue करायचं ठरवलं, तर यावरचं solution काढलं Ola ने. 

Slide 3: Market

तुमच्या या solution ला market मध्ये किती value आहे हे येणार third slide वर. तुमचं जे market आहे त्याची size किती आहे, तुमचा target audience कोणता आहे? या सगळ्या गोष्टी इथं येतील.

Slide 4: Business model

तुमच्या business चं model कसं असणार आहे ते सगळं fourth slide वर येईल. आता Business model म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणकोणते आहेत? हे सगळं आम्ही आधीच एका लेखा मध्ये cover केलेलं आहे. वेळ काढून तो लेख नक्की पहा. अगदी थोडक्यात सांगायचं तर, बिझनेसमध्ये तुम्ही काय विकणार आणि त्यातून पैसे कसे येणार आहेत ते इथं सांगायचं आहे. 

Slide 5: Competitive Advantage किंवा USP

आता, तुम्हाला सुचलेली Business Idea ही कदाचित आधीही कोणाला तरी सुचलीच असेल, तशीच सर्व्हिस देणारे किंवा सेम प्रोडक्ट विकणारे हजारो जण मार्केट मध्ये असतील, पण त्यातही ती idea तुम्ही कशा वेगळ्या पद्धतीने मांडणार आहात आणि बाकीच्यांपेक्षा तुम्ही कसे  वेगळे आहात हे इथं explain करायचं आहे.

Slide 6: Marketing and sales strategy

कोणत्याही product ला जर मार्केटमध्ये आणायचं असेल, तर त्यासाठी काहीतरी strategy plan करावी लागेल आणि याबद्दल In detail माहिती हवी असेल, तर तुम्हाला आधी Go-to-market strategy चा लेख बघावा लागेल. बघा मग लवकर कशाला वेळ घालवताय?

Slide 7: Team

प्रत्येक startup ला grow करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती team. तुमच्या team मध्ये कोण कोण आहे, त्यांच्या expertise काय आहेत, त्यांचे key roles काय आहेत. हे सगळं येणार या slide मध्ये.

Slide 8: Financials

यामध्ये तुम्हाला तुमच्या startup चा revenue, expenses आणि cash flow असं सगळं explain करायचं आहे. त्याचसोबत तुम्ही याआधी काही fundraising केली आहे का? किंवा त्याबाबत तुमचे future मध्ये काही plans आहेत का? हेसुद्धा सगळं सांगायचं आहे.

Slide 9: Milestones and timeline

याआधी तुमच्या Startup ने काही milestones achieve केले आहेत का? म्हणजे पहिले १०००, १० हजार किंवा लाख product कधी sale झाले, नवीन ऑफिस कधी सुरु झालं वगैरे त्याची timeline काय आहे? हे सगळं येईल या slide वर.

Slide 10 Ask

Finally आता सांगायचं आहे की तुम्हाला किती रुपयांची गरज आहे? ते पैसे कुठे, किती, कसे खर्च होणार आहेत आणि या पैशांच्या बदल्यात तुम्ही इन्व्हेस्टरला किती percent equity देणार आहात.

आपण ज्याप्रमाणे या slides पाहिल्या अगदी त्याचप्रमाणे त्यांचा sequence असावा असा काहीही नियम नाहीये. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याचा sequence change करू शकता किंवा काही points सुद्धा बदलू शकता. बाकी तुम्हाला आजचा आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर लेख like आणि share करा.

हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button