मरीन इंजिनिअरिंग या हटके क्षेत्रात करिअर मध्ये कसे यशस्वी व्हावे?
12 वी सायन्स मधून झाली असेल, तर बऱ्याच मुलांच्या डोळ्यांसमोर करिअरचे सहसा दोनच पर्याय उभे राहतात आणि ते म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंग. यापलीकडे सुद्धा बरेच करिअर ऑप्शन उपलब्ध आहेत, पण बऱ्याच वेळा त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. अनेकदा असेही होते की, आपल्या आसपास कोणाला या विषयी माहिती नसते आणि कोणी त्या क्षेत्रात करिअर सुद्धा केलेले नसते. त्यामुळे मार्गदर्शनाअभावी आपण त्याकडे वळत नाही आणि नव्या संधी आपल्यासाठी दार उघडत नाहीत. मरीन इंजिनिअरिंग सुद्धा अशा सहसा न विचार केल्या जाणाऱ्या पर्यायांपैकी एक आहे. आज आपण जाणून घेऊयात की या क्षेत्रात करिअर करण्यासाठी काय करावे लागेल.
ही अभियांत्रिकीची एक शाखा आहे, जी बांधकाम तसेच सागरी क्राफ्ट, डॉक्स आणि हार्बर इंस्टॉलेशन्सच्या यांत्रिक उपकरणांच्या ऑपरेशन्सशी संबंधित आहे. सागरी अभियंत्याचे मूलभूत काम म्हणजे पाण्यावर किंवा आसपास वापरल्या जाणार्या वाहनांची रचना करणे, बांधणे आणि त्यांची देखभाल करणे. यात जहाजे, विमानवाहू जहाजे, पाणबुड्या, सेलबोट, टँकर इत्यादींचा समावेश आहे. जहाजाच्या अंतर्गत प्रणालीसाठी मरीन इंजिनीअर्स जबाबदार असतात ज्यात इलेक्ट्रिकल, रेफ्रिजरेशन आणि स्टीयरिंग सिस्टम असतात. जहाजे, नौका, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि पाइपिंग सिस्टीम तसेच जहाजाच्या प्रोपल्शन सिस्टीमचे डिझाईन, इन्स्टॉलेशन, ऑपरेशन आणि देखभाल यांसंबंधीत कामे मरीन इंजिनीअर्स करतात तसेच ते या प्रणालींच्या देखभाल आणि दुरुस्तीवर देखील काम करतात. सागरी जहाजांची रचना, बांधणी, वापर आणि देखभाल हे सागरी अभियांत्रिकीच्या विस्तृत श्रेणीत येतात. हे एक बहुविद्याशाखीय क्षेत्र आहे, ज्यामध्ये यांत्रिक अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, आणि स्थापत्य अभियांत्रिकी इतर तांत्रिक वैशिष्ट्यांसह माहिती समाविष्ट केली जाते.
मरीन इंजिनिअरिंग शिकण्यासाठी काय करावे?
या क्षेत्रात शिक्षण घ्यायचे असेल तर ते डिप्लोमा पासून पी.एच.डी पर्यंत घेता येते. डिप्लोमा करायचा असेल तर तो दहावी नंतर करता येतो आणि याचा कालावधी 3 वर्ष असतो.
पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी 4 वर्ष असतो. पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल, तर 12 वी ला PCM ग्रुपसोबत किमान 60% गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. काही इन्स्टिट्यूटसाठी वयोमर्यादा ही अट असू शकत नाही. पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असेल तर उमेदवाराला पदवी मरीन किंवा मॅकॅनिकल या शाखेतून किमान 60% मार्क मिळवून पूर्ण करावी लागते आणि पी. एच. डी करायची असल्यास पदव्युत्तर अभ्यासक्रमात किमान 55% गुण मिळवून प्रवेश परीक्षा देणे आवश्यक आहे. यासाठी JEE Mains, JEE Advance, MHT-CET, CUET, TS EAM-CET यापैकी परीक्षा द्याव्या लागतात.
मरीन इंजिनिअरिंगसाठी टॉप कॉलेजेस
आंध्रा युनिव्हर्सिटी, CUSAT Kochi, Indian Maritime University Kolkata, Indian Maritime Academy, Indian Maritime University Chennai, Dr. Babasaheb Ambedkar Institute Of Technology ही काही नावाजलेली विद्यापीठे आहेत जिथून शिकणे जास्त फायदेशीर ठरू शकते.
का करावे मरीन इंजिनिअरिंग?
ही पदवी असलेल्या लोकांसाठी रोजगाराच्या संधी आज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत, कारण ते सागरी परिसंस्थेचे शाश्वत संतुलन, जहाजे आणि सीक्राफ्टच्या निर्मितीमध्ये सहाय्य करतात. सागरी जीवनाचे रक्षण करण्याचे वाढते महत्त्व आणि सागरी प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. संशोधनानुसार या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी 2026 पर्यंत इतरांशी तुलना करता वाढण्याची शक्यता आहे. भारतीय नौदल, शिपयार्ड्स, इंजिन निर्मिती कंपन्या, जहाज बांधणी कंपन्या, जहाज डिझाइन कंपन्या यामध्ये नोकरीच्या संधी मिळू शकतात.
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर लाइक आणि subscribe जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.
आणखी वाचा
- करिअरबद्दल निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? I Career counselling
- १० वी आणि १२ वी नंतर काय?