कमी खर्चात लाखोंची कमाई, बेबी कॉर्न लागवड करा
आजकाल मोठ-मोठे पदवीधर, सुशिक्षित वर्गातील लोक नोकरीपेक्षा शेती करण्यास जास्त प्राधान्य देत आहेत. उत्तम पद्धतीची आधुनिक शेती करून चांगलीच कमाई देखील कमवत आहेत. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत अशाच एका आधुनिक पिकाबद्दल बेबी कॉर्न या पिकाबद्दल.
कॉर्न मंच्युरीयन, चिली, पकोडे, कॉर्न मसाला असे बेबी कॉर्नचे सगळेच पदार्थ प्रत्येकाच्याच आवडीचे असतात. त्यामुळे बेबी कॉर्नची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अगदी आपल्या घरापासून ते 5 स्टार हॉटेल्स, पिझ्झा, पास्ता चेन आणि छोट्या-मोठ्या रेस्टॉरंटमध्ये देखील कॉर्नला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
तांदूळ आणि गहू या पिकांनंतर मका हे भारतातील सर्वात जास्त लागवडीचे पीक म्हणून ओळखले जाते. याच मक्याच्या अपरिपक्व कोंबांना बेबी कॉर्न असे म्हणतात. लागवडीनंतर दोन महिन्यांच्या आताच बेबी कॉर्न तयार होतात. बेबी कॉर्नमध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वं असतात. म्हणून आरोग्याच्या दृष्टीने ते खूप फायद्याचे मानले जाते, पण केवळ आरोग्याच्याच दृष्टीने नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या विचार केला तर यातून खूप फायदा मिळू शकतो. एका एकरात बेबी कॉर्नच्या लागवडीसाठी जवळपास 15 हजार रुपये खर्च येऊ शकतो. फक्त 15 हजारांच्या गुंतवणुकीतून एकरी चार ते सहा क्विंटल उत्पादन घेऊन तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. याचे उत्पादन तुम्ही वर्षातून केवळ एकदाच नाही तर 4 वेळा घेऊ शकता. फक्त इतकेच नव्हे तर तुम्हाला यातून दुप्पट नफा मिळवता येऊ शकतो. म्हणजे बेबी कॉर्नच्या कापणीनंतर त्याचा जो उर्वरित भाग असतो, तो जनावरांसाठी चारा म्हणून वापरता येऊ शकतो. शेतकरी त्याचा हिरवा चारा म्हणूनही वापर करू शकतात किंवा कापून सुकवल्यानंतर सुकी पेंडही बनवता येतो. मक्याचे खाद्य हे जनावरांसाठी अतिशय पौष्टिक मानले जाते. त्याचा चारा जनावरांना दिल्याने त्यांची दूध उत्पादन क्षमताही वाढते.
फायदेमंद शेतीसाठी बेबी कॉर्न हा एक अगदी उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात बेबीकॉर्नचे उत्पादन घ्यायचे असेल मात्र तुम्हाला पैशांचा प्रश्न भेडसावत असेल, तर शासनाकडून तुम्हाला कर्ज मिळू शकते. भारत सरकार मका आणि बेबी कॉर्नच्या लागवडीसंदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी कर्ज उपलब्ध करून देते. याच्या सहाय्याने तुम्ही बेबी कॉर्नची शेती करून लाखोंनी पैसे कमवू शकता.
अशा या बेबी कॉर्न लागवड ची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. हा लेख जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि नवी अर्थक्रांतीच्या यू ट्यूब चॅनलला आत्ताच subscribe करा.
आणखी वाचा
- उत्तम शेती करण्यासाठी कोणत्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.
- Agro Tourism – शेतकऱ्यांसाठी वरदान
- शेतकऱ्यांसाठी 20 लाख कोटी रुपयांचं कर्ज! KCC योजनेची माहिती जाणून घ्या
- काय आहे एसआरटी तंत्रज्ञान?
- पंतप्रधान कुसुम सोलार योजनेबद्दल सर्वकाही
- शेतजमीन विकत घ्यायची आहे का? वाचा या 5 गोष्टी, नाहीतर पडाल नुकसानीत!
- Tomato Price : टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल! नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकार सज्ज