उद्योजकता विजडमलेखमालिका

Live and let live ‘जगा आणि जगू द्या’ हे जीवन, व्यवसायाचे मूलभूत तत्व

Live and let live भगवान महावीरांच्या शिकवणीचा हा खूप महत्वाचा भाग आहे आणि तो पुढे अनेक संताच्या आचरणात व लेखनात सापडतो. संत तुकाराम त्यांच्या शेतामध्ये ज्वारीची राखण करायचे तेव्हा चिमण्यांनी दाणे खाल्यानंतर त्यांना पिण्यासाठी मडकी भरून पाणी शेतात ठेवायचे. तोच मार्ग पुढे मोठ्या कॉर्पोरेट ब्रँडनी अवलंबला. बिल गेट्स यांनी आतापर्यंत ९० अब्ज डॉलरचे दान विविध समाजजोपयोगी उपक्रमांना दिले.

कायद्याने CSR (Corporate Social Responsibility) फायद्याच्या २-३% रक्कम अशा सामाजिक कामासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. पिकावर येणारे पाखरे, चिमण्या, फुलपाखरू इत्यादी १ ते २% धान्य खातील पण त्यामुळे परागीभवन होऊन पिकांचे उत्पन्नही वाढायचे, पण जेव्हापासून कीटकनाशके, फवारणी सुरू झाले व त्याचा अतिरेक झाला. तेव्हा कोणतेच पीक औषध फवारलेशिवाय येईना मग पराग संचयन करणार कोण? कीटकांची संख्या कमी झाली, खर्च वाढू लागला व उत्पन्न घटू लागले. आपण दुसऱ्यांना जगू नाही दिले तर आपण ही जगू शकत नाही हे भगवान महावीर, संत तुकाराम यांनी सांगितले. सगळंच १००% मीच खाणार, माझं एकट्याच राज्य असणार याला दुर्योधन प्रवृत्ती म्हणतात. ज्याने पांडवांना काही गाव तर सोडाच, पण सुईच्या टोकावर इतकी पण जमीन देण्यास नकार दिला त्यामुळेच महाभारत घडले.

मोठी कार कंपनी अनेक लहान उद्योगांना स्पेअर पार्ट बनवायचे कॉंन्ट्रॅक्ट देते. कारण तेथे अनेक कामगारांना काम मिळते व त्यांचीही कामे सोपी होतात. जगात कोणतेही काम, उद्योग सगळं मीच खाणार व सगळं मीच कमविणार या प्रवृत्तीने कधीच मोठा होत नाही व टिकतही नाही. ‘जिओ और जीने दो!’(Live and let live) ही प्रवृत्ती जोपासणारे मोठे होतात. आपल्या सोबत इतरांना, प्राण्यांना, पशूंना, झाडांना सांभाळा. ते तुम्हाला सांभाळतील व तुम्हाला मोठे करतील. मुंबईत ठिकठिकाणी सकाळी दुकान उघडण्या अगोदर कबुतरांना धान्य, गाईला चारा टाकताना अनेक व्यापारी बंधू तुम्हाला दिसतील. हे ‘जिओ और जीने दो!’ या तत्वातूनच येते.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर प्रत्येकाला वाटत असते कि लोकांनी आपल्याशी सन्मानपूर्वक वर्तणूक केली पाहिजे, इतरांनी आपल्याला इज्जत, मानसन्मान द्यावा, आपली प्रतिष्ठा निर्माण व्हावी. परंतु त्यासाठी आपणसुद्धा इतरांचा सन्मान केला पाहिजे, इतरांच्याही भावनांची कदर केली पाहिजे. इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल असे वर्तन करू नये. आपण इतरांना सुखी नाही करू शकलो तरी चालेल, परंतु आपल्यामुळे कोणी दुःखी होता काम नये याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे. आपण आणि भोवतालचा समाज यात सुसंवाद असेल तरच सामाजिक संतुलन अबाधित राहील.

हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button