पैशातून पुन्हा पैसा कसा कमवायचा शिकले पाहिजे
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; पैशातून पुन्हा पैसा कसा कमवायचा शिकलं पाहिजे… करायची सुरवात?
एका गावात एक व्यावसायिक कुटुंब होते. तिघे भाऊ, वडील मिळून इंजिनीअरिंग स्पेअर पार्टस, हॉटेल इत्यादी व्यवसाय करत होते. गेल्या ७ ते ८ वर्षात एक्सपोर्टमधून बराच फायदा कमविला. अंदाजे १ ते ३ कोटी रुपये एका रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये गुंतविले. मुंबईजवळ काही अंतरावर रोडलगत २७ एकर शेतजमीन १८ लाख रुपये एकर दराने विकत घेतली. काही महिने प्रोजेक्टचे नियोजन करीत होते. नंतर त्यांनी ती शेतजमीन एनए करून घेतली. त्यावर व जमिनीतील अंतर्गत रस्ते हेक्टरच्या लेवलने केले, वृक्षारोपण इत्यादीसाठी अंदाजे एकरी सहा लाख खर्च आला. तो त्यांनी बँकेतून कर्ज काढून केला. प्रत्येकी २००० वर्गफुटाने प्लॉट प्रत्येकी १६ लाख दराने विक्रीस आणले व ३ बीएचके बंगलो ४० ते ५० लाख ह्या दरम्यान. अशा अनेक प्रकारच्या प्रॉपर्टीची विक्री त्यांनी सुरू केली. सुरुवातीचे काही प्लॉट खपल्यानंतर थोडे महिने विक्री बंद करून आलेले पैसे खर्च करून सर्व प्लॉटना लहान बाउंड्री हॉल, छोटे वूड हाऊस, आकर्षक एन्ट्रन्स लॉन प्रोजेक्टससाठी बनविली. खूप लहान व १५ गुंठे ओपन जागेत लॉन बनविले. प्रोजेक्ट अंतर्गत खूप छान वृक्ष लागवड केली. प्रोजेक्ट्सचे थ्रीडी प्रझेंटेशन तयार केले, पूर्ण प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर कसा दिसेल याचा आकर्षक व्हिडीओ बनविला व त्यांची पुणे, मुंबई आणि इतर चांगल्या ठिकाणी जाहिरातबाजी केली. पुढे काही महिन्यात प्रॉपर्टीचे दरही वाढले होते. प्लॉट, बंगलो बघायला येणाऱ्यासाठी आकर्षक वेटिंग रूम, छोटेसे छान ऑफिस, साईटवर माहिती देण्यासाठी एमबीए झालेल्या तरुणाची नियुक्ती केली.
२७ एकर जमिनीपैकी एनए केल्यानंतर सुमारे २२ एकर जमीन विक्रीस उपलब्ध होती व प्रत्येकी २००० वर्गफुटाचे ४४० प्लॉट विक्रीस तयार होते. म्हणजे तो प्रोजेक्ट म्हणजे ४४० गुणिले २० लाख बरोबर आठ कोटी ऐंशी लाख इतक्या किंमतीचा होता. एनए करणे, अंतर्गत रस्ते, सजावट, बाउंड्री वॉल, गार्डनिंग, फलकहाऊस, प्लॅन, मार्केटिंग, ब्रॅंडिंग, एजंटना देऊ केलेले ५% कमिशन, बँकेचे व्याज, कामगारांचा पगार इत्यादीवर १५ ते २०% खर्च त्यांनी केला होता. पाच ते सहा वर्षात हळूहळू करून सर्व प्लॉट विकले गेले. सुरुवातीचे काही प्लॉट १० लाखाने विकले व परत प्रत्येक सहा महिन्यात किंमत वाढत गेली, शेवटचे ३० ते ३५% प्लॉट २७ लाखाच्या दराने विकले गेले. सरासरी दर १८ लाखाचा राहिला. ज्या शेतकर्याने १८ लाख एकरी दर म्हणून जमीन विकली त्याला त्याच जमिनीला दोन गुंठ्याला १८ लाख दर केवळ ५-७ वर्षात होईल असा विचार केला नसेल.
पैशातून पैसा कमविण्याचे हे एक उदाहरण खूप काही सांगत आहे. जमिनी विकून खायच्या की आपण उद्योजक व्हायचं हे ज्याचे त्याने ठरवावे. जसे कस्तुरीमृगाला माहीत नसते की, आपल्याकडे अत्यंत किंमती कस्तुरी आहे, तसे शेतकर्यांनाही माहीत नाही आपल्या जमिनीचे भविष्यातले खरे मोल काय आहे. ज्यांनी जमिनी २० लाख प्रति एकराने विकल्या तेथे आज २० लाख गुंठ्याचा दर आहे व दुर्दैव त्या मुळ जमीन मालकाकडे एक गुंठा तेथे घेण्याची ऐपत नाही. कारण बाटली, गाडी, सोन्याची चेन, राजकारण यातच त्याचे सर्व पैसे संपले.
पैशाने पैसा वाढवायचं तंत्र तुम्ही कधी अंमलात आणलाय का? आणलं असेल तर तुमच्याकडे असणाऱ्या पैशाचे नियोजन तुम्ही कसं केल? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेल ला आताच सब्स्क्राइब करा.