घरबसल्या युट्युब देईल लाखो रुपये; ना डिग्री, ना कोणत्या सर्टिफिकेटची गरज
आत्ताच्या घडीला महागाई जोमाने वाढत आहे आणि म्हणूनच एखादा सामान्य माणूस केवळ कंपनीच्या पगारावर अवलंबून राहू शकत नाही. चार-पाच मंडळींचा जर का परिवार असेल, तर नक्कीच एका कमावणाऱ्या माणसाच्या पगारावर संपूर्ण महिन्याभराचा खर्च निघू शकत नाही. मग अशावेळी काय करावं?
एक तर आपण सात-आठ तास काम करून दमून-भागून घरी परतत असतो आणि त्यानंतर काम करण्याची ना इच्छा असते ना तयारी. मग अश्यावेळी आपल्या आवडीची कामं करावीत जेणेकरून मनाला समाधान, काम करण्याचा आनंद आणि सोबत चार-दोन पैसे देखील कमावता येतील. आम्ही देखील तुम्हाला आज अशीच एक भन्नाट कल्पना सुचवणार आहोत जिचा वापर करून तुम्ही घरबसल्या लाखो रुपये कमावू शकता.
व्हिडिओ बनवण्याची आवड आहे का?
आजकाल सोशल मीडियाचा आवाका बऱ्यापैकी वाढत चालला आहे. सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही क्षणार्धात शेकडो लोकांपर्यंत पोहोचू शकता. तुम्हाला जर का व्हिडिओ बनवण्याची आवड असेल तर काही ठराविक विषयांवर घर बसल्या 60 सेकंदांचा व्हिडिओ बनवत पैसे कमावणं सहज शक्य आहे. युट्युबच्या दुनियेत अशा प्रकारच्या व्हिडिओजना युट्युब शॉर्ट्स (YouTube Shorts) असं म्हटलं जातं. आजकाल लोकांना जास्त वेळ एका जागेवर बसत काही ऐकण्याची किंवा बघण्याची सवय राहिलेली नाही किंवा एवढी उसंत सुद्धा मिळत नाही. मग अशावेळी लोकनांची गरज ओळखून त्यांच्या कलाकलानं जात जर का तुम्ही कमीत कमी वेळात महत्वाची आणि मुद्याची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकलात, तर नक्कीच यामधून भरपूर पैसे कमावता येतात.
हा व्यवसाय करण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे इथे तुम्हाला भरमसाठ पैसे भरत कोणताही कोर्स करण्याची किंवा सर्टिफिकेट मिळवण्याची गरज नसते. लोकांना काय जाणून घेण्याची इच्छा आहे, त्यांचं मनोरंजन नेमकं कशातून होऊ शकतं, ते काय बघणं किंवा ऐकणं पसंत करतात या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास केल्याने आपण कुठे भर दिला पाहिजे याचा अंदाज येतो आणि पुढे जात त्यावर काम करणं सहज शक्य होतं.
युट्युबवरून पैसे कमवा:
आपण सध्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत जगात वावरतो, म्हणजे काय तर टेक्नोलॉजिचा (Technology) वापर करून काही मिनिटातच अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील सहज शक्य झाल्या आहेत. लक्षात घ्या की, प्रत्येक नाण्याला नेहमी दोन बाजू असतात, एक चांगली आणि दुसरी वाईट. त्यामुळे आपण टेक्नोलॉजी कशी हाताळतोय यावर ती आपल्यासाठी चांगली ठरेल की नाही याचा निर्णय अवलंबून असतो. मुळातच कोणतीही गोष्ट वाईट नसते, त्यामुळे इतरांच्या अनुभवांवरून कोणतेही मत बनवू नका.
युट्युब हे आताच्या घडीला सर्वाधिक वापरलं जाणारं माध्यम आहे, एखादा नवीन पदार्थ देखील बनवायचा म्हटलं तरीही आई हमखास युट्यूबची मदत घेताना दिसते. हो ना? मग आपण देखील याचाच वापर करत पैसा कसा कमावता येईल हे पाहुयात.
युट्युब शॉर्ट्स (YouTube Shorts) बनवताना सर्वात अगोदर एका विषयाची निवड करा, यासाठी तुम्हाला समोर असणाऱ्या ग्राहक वर्गाची माहिती असणं गरजेचं आहे. ग्राहक वर्गाची ओळख पटल्यानंतर त्यांना समजेल आणि उमजेल अशा भाषेत माहिती तयार करा. असे व्हिडिओ बनवताना तुम्हाला मोठाल्या सेटअप किंवा कॅमेऱ्याची गरज भासत नाही. अगदी घरच्या घरीच आणि ते देखील मोबाईलच्या साहाय्याने असे व्हिडीओ बनवता येतात. अधिकाधिक लोकांपर्यत लवकर पोहोचायचं असेल, तर आपलं कंटेन्ट प्रेझेंट एकदम उत्तमरित्या झालं पाहिजे. आणि त्यासाठी तर थोड्या प्रमाणात व्हिडिओ एडिटिंगची माहिती असावी जेणेकरून यासाठी वेगळा खर्च करावा लागणार नाही.
युट्युब व्हिडीओ बनवण्याच्या नियम व अटी:
हे काम जरी सोपं वाटत असलं तरीही युट्युबने या प्रक्रियेला काही नियम आणि अटी घातल्या आहेत. कोणत्याही व्यवसायात किंवा कामात उतरताना आपल्याला अशा नियम आणि अटींची माहिती असणं सोपं आणि सोयीस्कर ठरतं. तुम्ही जर का युट्युब शॉर्ट्सचा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून करणार असाल, तर त्यामधून पैसे कमावण्यासाठी तुमच्या चॅनलवर 1,000 किंवा त्याहून अधिक फॉलोवर्स (Followers) असणं अत्यावश्यक आहे. तुमचा चॅनल जर का या नियमाच्या चौकटीत बसत नसेल, तर यातून तुम्ही आर्थिक नफा कमावू शकणार नाही.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही या व्हिडिओ मधून जी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहात ती माहिती शंभर टक्के खरी असलीच पाहिजे, कारण लोकं अशा प्रकारच्या माहितीवर डोळे बंद करून विश्वास ठेवतात आणि केवळ पैसे कमावण्याच्या उद्देशाने आपण इतरांचं नुकसान करू शकत नाही.
आता तुमच्या मनात साहजिकपणे कंटेंट क्रिएशनसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) विचार आलाच असेल. AI चा वापर करणं ही चुकीची गोष्ट नाही. आधुनिक सुविधांचा वापर करून नक्कीच आपण काम सोपं करून घेऊ शकतो किंवा स्मार्टवर्क करून वेळही वाचवू शकतो मात्र लक्ष्यात असुद्या की वेळ वाचवण्याच्या नादात तुम्ही कोणतीही माहिती डोळे बंद ठेऊन उचलणार नाही. तुम्ही जर का युट्युब व्हिडीओ बनवत असाल तर एकार्थाने तुम्ही तुम्हाला समजलेली माहिती इतरांपर्यंत पोहोचवत असता आणि म्हणूनच यात युट्यूब कोणत्याही प्रकारची उचललेली किंवा कॉपी पेस्ट केलेली माहिती खपवून घेत नाही. इथे नक्कीच तुमच्याकडून मेहनतीची अपेक्षा केली जाते.
युट्युबचा व्हिडीओ बनावत असताना एक शेवटचा पण महत्वाचा नियम लक्षात ठेवावा लागतो आणि तो म्हणजे युट्यूबची मोनेटायझेशन पॉलिसी (Monetization Policy). चॅनल मोनेटायझेशनचा अर्ज करण्याआधी 90 दिवसांच्या काळात दहा दशलक्ष व्हिव (Views) किंवा गेल्या बारा महिन्यात 4,000 तासांचा watch time पूर्ण करणं अनिवार्य आहे. व्यवसाय करणं हा वाटत असला तरीही सरळ आणि सोपा मार्ग नाही. तुम्हाला व्यवसाय वाढवण्यासाठी दिवसरात्र व्यवसाय जपावा लागतो आणि तेव्हाच तो व्यवसाय खऱ्या अर्थाने अर्थाने यशस्वी होतो.
आणखी वाचा:
- १० वी आणि १२ वी नंतर काय?
- करिअरबद्दल निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?
- Career in Fine Arts I फाइन आर्ट्समध्ये घ्या डिग्री, करिअरच्या आहेत विपुल संधी