स्टार्टअपमध्ये काम करत असाल तर Cliff Vesting बद्दल जाणून घ्या
Business करावा की job हा खरंतर अनेक तरुण तरुणींना वर्षानुवर्षे पडलेला प्रश्न! काहीजण नको बॉसची कटकट, बनू आपणच आपल्या मनाचे राजे म्हणून business निवडतात, तर इतरांना जॉबचा मार्ग निवडावा लागतो. पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही ज्या कंपनीत आज काम करताय, ती कंपनी उद्या तुमच्या मालकीची होऊ शकते तर? विश्वास नाही ना बसत? अहो कसा बसेल. असल्या गोष्टी सांगायला आपल्या आजूबाजूला कोणीच सांगत नाही. पण काळजी नसावी. आम्ही आहोत ना, तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहचवायला. करूया सुरुवात.
तर स्टार्टअपविश्व मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत Cliff Vesting बाबत. पण Cliff Vesting बद्दल माहिती करून घेण्याअगोदर आपल्याला Compensation, Equity, ESOPs या काय भानगडी आहेत हे जरा बघावं लागेल.
तर पहिल्यांदा वळूया Compensation कडे. Compensation म्हणजे काय, तर एखाद्या employee ला त्याच्या कामाच्या बदल्यात दिलेला मोबदला. यात तुमची salary, comission, bonus, incentives या सगळ्या गोष्टी येतात.
दुसरी म्हणजे Equity. Equity ची साधी सरळ व्याख्या म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये मालकाचा, Employess चा, share holders चा त्या कंपनीत असलेला वाटा.
तिसरी कन्सेप्ट ESOP. ESOP चा full form आहे employee stock ownership plan. तर ESOP हा employee benefit plan आहे ज्यामुळे कंपनीच्या employees ला त्या कंपनीचे शेअर्स विकत घेता येऊ शकतात.
आता येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे म्हणजेच Cliff Vesting कडे. बऱ्याच कंपन्या त्यांच्या compensation package चा भाग म्हणून आपल्या employees ला equity देतात. Equity एम्प्लॉईजला partial ownership ऑफर करते, ज्यामुळे employess ला चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. Cliff vesting मध्ये employee ला एका विशिष्ट काळानंतर कंपनीमध्ये Equity मिळवण्याचा अधिकार प्राप्त होतो. हा अधिकार मिळण्यासाठी employee ला त्या कंपनीत काही काळ टिकून काम करावं लागतं. हा काम करण्याचा जो काळ असतो ना त्यालाच cliff period असं म्हणतात. Cliff Vesting मध्ये कंपनी आणि employee दोघांचाही फायदा आहे. त्यात कंपनीचा फायदा असा की, employee या या तारखेपर्यंत किंवा एखाद्या विशिष्ट कालावधीपर्यंत आपल्यासोबत काम करणारच आहे याची कंपनीला surety मिळते आणि employees चा फायदा म्हणजे त्यानी तो कालावधी पूर्ण केला, तर त्याला कंपनीमध्ये शेअर्स मिळतात. आहे का नाही दोघांचा फायदा? Cliff vesting चं प्रमाण हे मोठ्या कंपन्यांपेक्षा स्टार्टअपमध्ये जास्त असतं. कारण स्टार्टअप्सना आपले core employees जास्तीत जास्त काळ आपल्यासोबत टिकवायचे असतात.
आता पाहूया cliff vesting चे प्रकार :-
१. Vesting चा पहिला प्रकार म्हणजे time-based vesting. नावावरून तुम्हाला समजलंच असेल की याचा वेळेशी काही तरी संबंध आहे ते. तर या प्रकारात equity मिळवण्यासाठी काही काळ तुम्हाला त्या स्टार्टअप मध्ये काम करावं लागतं. Generally आपल्याकडे स्टार्टअप्स मध्ये cliff period हा एका वर्षाचा असतो, म्हणजे कमीत कमी तुम्हाला त्या स्टार्टअपमध्ये एक वर्ष काम करावंच लागतं, तरंच तुम्हाला तिथे equity मिळवण्याचा अधिकार प्राप्त होतो.
२. Vesting चा दुसरा प्रकार म्हणजे milestone vesting या प्रकारात कंपनीने तुम्हाला दिलेले जे काही targets किंवा goals achieve करावे लागतात म्हणजे तुम्हाला कंपनीसाठी एक milestone achieve करावा लागतो, तरंच ती कंपनी तुम्हाला equity देते.
३. Vesting चा तिसरा प्रकार म्हणजे Hybrid vesting या प्रकारात पहिल्या दोन प्रकारांचा अर्धा-अर्धा समावेश होतो. म्हणजे कंपनीसाठी तुम्ही काही काळ कामसुद्धा केलेलं असलं पाहिजे आणि कंपनीने दिलेले targets सुद्धा complete पाहिजेत, तरंच तुम्हाला equity मिळेल. तर आजच्या Article मध्ये तुम्हाला Cliff vesting Compensation, Equity, ESOPs याबद्दल माहिती मिळालीच असेल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे comment मध्ये नक्की सांगा आणि जर या Article मुळे तुमच्या ज्ञानात भर पडली असेल तर याला like आणि share जरूर करा आणि हो नवी अर्थक्रांतीच्या channel ला subscribe जरूर करा.