आपल्या व्यवसायाला धोका देणारा ‘Churn Rate’ म्हणजे काय?
बऱ्याचवेळा तुम्ही ऐकलं असेल की ज्या मोठमोठ्या tech कंपन्या आहेत जसं की HCL, Infosys, TCS, Wipro या कंपन्यांचा Churn Rate हा खूप वाढलाय. पण बऱ्याच जणांना हे माहित नसतं की नक्की झालंय काय. हो ना? तर आज आपण पाहूया हा Churn Rate म्हणजे नेमकं काय ते.
Churn Rate म्हणजे काय?
तर Churn Rate म्हणजे एक असा rate ज्यामध्ये आपल्याला समजतं की एखाद्या कंपनीला तिथले employees किंवा त्या organization चे clients किती rate ने सोडून चालले आहेत ते आणि यामुळेच कंपनीला त्यांच्या revenue मध्ये झालेल्या loss चा अंदाजदेखील येतो. Churn Rate ला Attrition Rate सुद्धा म्हणतात. Tech Companies मध्ये हा rate खूप जास्त आहे. २०२२ च्या Financial Year मध्ये IT Sector चा चर्न रेट हा 25% पर्यंत गेला होता आणि याचा तोटा अनेक मोठमोठ्या कंपन्यांना सहन करावा लागला होता. Churn Rate हा काही फक्त एखादी organization आणि त्याच्या employees बद्दल नसतो जर समजा तुम्ही तुमच्या customers ला एखादी service देत आहात आणि त्या service च्या बदल्यात तुम्ही त्यांच्याकडून काही charges घेत आहात off course ते तर तुम्ही घेणारच पण काही काळानंतर त्या customer ने तुमच्याकडून service घेण्याचे थांबवले तर customer च्या याच churning ला चर्न रेट म्हणतात. आता उदाहरण म्हणून आपण आपल्या लाडक्या Netflix ला घेऊया. तर Netflix आपल्याला एक streaming service provide करते आणि बदल्यात आपल्याकडून वेगवेगळे subscription साठी पैसे आकारते. तर दर महिन्याला आपण Customers नियमितपणे पैसे भरत असतो पण कधीतरी आपल्याला वाटत च्यायला आपण subscription घेतलय पण वेळ नसल्यामुळे आपल्याला याचा काहीच फायदा होत नाहीये मग आपण लगेच ठरवतो या महिन्यापासून आपलं Netflix चं subscription बंद! ज्या क्षणी तुम्ही हे subscription बंद करता त्याच क्षणी Netflix चं customer churning चालू होतं.
Churn Rate Calculate करण्याचे फायदे
कंपनीचा churn rate calculate करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळं आपल्याला समजतं की attain केलेले customer आपण कश्या पद्धतीने retain केले आहेत म्हणजे मिळवलेलं आपण टिकवलय का? हे समजायला यामुळे मदत होते. जर कंपनीचा चर्न रेट हा कमी असेल तर उत्तमच आहे पण जर तो वाढत चालला असेल तर ? तर कंपनीला आपल्या product किंवा service मध्ये काहीतरी गडबड आहे हे ओळखता आलं पाहिजे . कंपनी may be Faulty products provide करत असेल, poor customer service देत असेल किंवा कंपनीचं product cost worthy नसेल.
चर्न रेट मुळे कंपनीला हे ही समजतं की किती employees कंपनीला सोडून चालले आहेत. जर हा rate जास्त असेल तर कंपनीने कुठे सुधारणा करायला पाहिजे हे यावर विचार करायला सुद्धा कंपनीला वेळ मिळतो.
Churn Rate Calculate करण्याचे तोटे
आता ज्या गोष्टीचे फायदे असतात त्या गोष्टीचे तोटे सुद्धा असणारच नाही का? Churn Rate मुळं कंपनीला हे तर समजतं की किती customer सोडून चालले आहेत पण त्या customers चा type कोणता आहे हे मात्र समजत नाही म्हणजे ते customers नवे आहे की जुने
जेव्हा आपण कंपनीच्या product, services ची advertisement करायला सुरुवात करतो मग ती social media वर असेल किंवा Outdoor असेल जेव्हा ती लोकांपर्यंत पोहचते तेव्हा सुरुवातीला खूप वेगाने new customer जॉईन होतात आणि तेवढ्याच वेगाने ते जातात सुद्धा. पण जेव्हा आपण कंपनीचा चर्न रेट काढतो तेव्हा हे कळत नाही की churn customer हे नवे आहेत की जुने? जर customer नवे असतील तर एकवेळ आपण ते समजून घेऊ शकतो पण जर हे customer जुने असतील तर कंपनीला खरोखर आपल्या product आणि सेर्विसेस ची quality सुधारण्याची गरज आहे.
तर आजच्या Article मध्ये तुम्हाला Churn Rate म्हणजे काय, Churn Rate Calculate करण्याचे फायदे तोटे कोणते या सर्वाची माहिती तुम्हाला मिळालीच असेल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे comment मध्ये नक्की सांगा आणि जर या Article मुळे तुमच्या ज्ञानात भर पडली असेल तर याला like आणि share जरूर करा आणि हो नवी अर्थक्रांतीच्या channel ला subscribe जरूर करा.