Career in Fine Arts I फाइन आर्ट्समध्ये घ्या डिग्री, करिअरच्या आहेत विपुल संधी
आपले बऱ्यापैकी लेख हे बिझनेस रिलेटेड किंवा Finance रिलेटेड असतात. पण आजचा विषय थोडा वेगळा आहे. नुकत्याच 10वी, 12वीच्या Exam झाल्या. तेव्हा म्हटलं या 10वी, 12वी च्या मित्रांसाठीच काहीतरी बनवावं. म्हणजे सुट्टी एन्जॉय करता करता पुढे काय करायचं याचं प्लॅनिंग सुद्धा व्हायला पाहिजे ना…!
माझी ताई डॉक्टर आहे, मीही डॉक्टरच बनणार किंवा बाबा म्हणतायेत दादाने engineering केलं तूही engineering च कर, तो शेजारचा राकेश बघ MPSCचा अभ्यास करतोय, तूही सूरू कर. Career Guidance बाबतची ही वाक्यं आजकाल आपल्याला जास्त ऐकायला मिळत नाहीत. पालकांनी आपल्या मुलांना बऱ्यापैकी freedom दिलंय. तुला जे चांगलं वाटतंय, तुला जे आवडतंय ते तू कर, पण त्यात 100 % दे असंच बऱ्यापैकी पालक मुलांना सांगत असतात. अनेकांना science, math’s पेक्षा arts मध्ये जास्त इंटरेस्ट असतो. वर्गात बसून शिक्षकांकडे लक्ष देण्याऐवजी वहीच्या पानावर काही-ना-काही चित्रं रेखाटत बसणाऱ्यांसाठी आजचा लेख आहे
आज आपण चर्चा करणार आहोत Fine arts बद्दल. फाइन आर्ट्स म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर canvas वर चित्र रेखाटणारा चित्रकार उभा राहतो. पण हे क्षेत्र फक्त इथपर्यंतच मर्यादित नाहीये, तर यात खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमचं करिअर बिल्ड करू शकता. BFA अर्थात Bachelor of Fine Arts हा कोर्स करून तुम्ही painter, sculptors, craft artist, illustrators, cartoonist, sketch artist, Curator, printmaker, art teacher बनू शकता. म्हणजे या एका course मध्ये तुम्हाला इतके सारे option मिळून जातील.
तर पहिल्यांदा पाहूया painters बद्दल.
तुम्हाला माहितीच आहे की painters हे Brush, Fingertips, Razors, oil colour, ink चा वापर करून पेपर, cardboard, canvas, walls किंवा अगदी tissue paper वर चित्रं काढतात. एक professional painter स्वतःचे मोठे exhibition भरवू शकतो. हौशी लोक पैशाकडे न बघता तुमचे चित्र चांगल्या किमतीत खरेदी करू शकतात. या painter चीच एक दुसरी बाजू म्हणजे sketch artist. Sketch artist हे फक्त पेन्सिलच्या आधाराने चित्र काढतात. तुम्ही अनेक चित्रपटांत पोलिस स्टेशनमध्ये स्केच आर्टिस्ट witness ने सांगितलेल्या वर्णनानुसार गुन्हेगाराचे sketch रेखाटताना बऱ्याचदा पाहिलं असेल. तुमचा चित्रकलेत चांगला जम बसला तर तुम्ही नक्कीच लाखो रुपये कमवू शकता. आपल्या देशात Raja Ravi Varma, M. F. Hussain, वासुदेव गायतोंडे, Amrita sher-gil असे अनेक महान चित्रकार होऊन गेले, ज्यांच्या चित्रांनी एक अढळ स्थान निर्माण केले. त्यांचं एक-एक चित्र आज करोडोंना विकलं जातं.
दुसरा option आहे sculptors:
Sculptors म्हणजेच शिल्पकार. हल्ली सगळीकडेच शिल्पकारांची डिमांड खूप वाढलीये. एखाद्या हॉटेलपासून ते मोठमोठ्या heritage house मध्येसुद्धा आपल्याला अतिशय सुबक अशी शिल्पं दिसतात. एवढंच कशाला सर्वसामान्य माणसाच्या घरात देखील लहान मोठ्या देखण्या शोभेच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे सगळं शिल्पकारच बनवत असतो. तुम्हाला colour, brush सोडून clay, stone, wood, mud सोबत काम करायला आवडत असेल, तर नक्कीच BFA कोर्स करून तुम्ही नामांकित शिल्पकार बनू शकता.
craft artist: चित्रकार आणि शिल्पकार मिळून craft artist बनतो असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. craft artist हे जनरली Pots, Glassware, Jewelry, wall craft बनवतात. Craft बनवताना आर्टिस्टला वेगवेगळ्या raw material चा वापर करावा लागतो. जसे की, Clay, Paper, leather, mud, glass इत्यादी. तुम्ही बनवलेल्या क्राफ्टची विक्री local market मध्ये किंवा export market मध्ये देखील करू शकता.
Print Maker म्हणजेच blog printing. एखाद्या पेपरवरची किंवा cloth वरची printing. अत्यंत महागड्या handmade साड्यांवर हे printmaker छान कलाकुसर करतात. हे काम खूप नाजुक असते, त्यामुळे printmaker ला नेहमी सतर्क असावे लागते. या बारीक आणि रेखीव कोरीव कामामुळे आपल्या कामानुसार जास्त दर आकारता येतो.
art teacher : Art school किंवा BFA सारख्या course साठी मुलं अगदी मोठ्या संख्येने admission घेतात. यासाठी तुम्ही art teacher म्हणून काम करू शकता. Art teacher ला महिन्याला साधारणतः 60 ते 70 हजार पगार मिळू शकतो.
Next ऑप्शन आहे Illustrators :
यात तुम्ही Book, Magazine आणि इतर काही Publicationच्या commercial product साठी काम करू शकता म्हणजे Textiles, Wrapping Paper, Stationery, Greeting Card, Calendar साठी picture design चं काम यात करावं लागतं. illustrators हे काम हाताने नाही, तर software वर करतात हे करत असताना मात्र तुमची Imagination Power high असावी लागते.
यानंतरचा जो पॉइंट आहे, तो म्हणजे cartoonist
असा कोणीच नाही ज्याला कार्टून माहीत नाही. अगदी doremon पासून ते tom and jerry पर्यंत प्रत्येक कार्टून आपल्याला माहीत असतं. बच्चेकंपनीला तर त्यातलं प्रत्येक character पाठ असतं. पण ते character बनवणारा आपल्याला माहित नसतो. तर जो कोणी हे characters तयार करतो त्यालाच cartoonist म्हणतात. साध्या शब्दात सांगायचं झालं तर व्यंगचित्रकार. आपण पेपरमध्ये, magazine मध्ये अशी अनेक व्यंगचित्रं पाहतो. जर तुम्हाला कार्टूनिस्ट म्हणून नाव कमवायचं असेल, तर तुम्ही BFA करून एक चांगले Cartoonist बनू शकता. जर तुमच्याकडे चांगले स्किल असेल आणि चांगल्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये तुम्हाला संधी मिळाली तर लाखोंनी पैसे कमवू शकता.
Curator :
curtor म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर साध्या शब्दात सांगायचं झालं, तर curtor म्हणजे परीक्षक. आता तुम्ही म्हणाल यात कुठून मध्येच परीक्षक आला. तर मोठमोठ्या आर्ट गॅलरीमध्ये जेव्हा तुम्ही तुमची painting, sketch देता तेव्हा पहिल्यांदा curtor तुमचे painting, sketch चेक करतो आणि त्यानंतर तुम्ही गॅलरीमध्ये ते पेंटिंग ऍड करू शकता. मोठ्या आर्ट गॅलरी मध्ये curtor हा असतोच. त्यामुळे तुम्हाला पेंटिंगचे इत्यंभूत ज्ञान असेल, तर तुम्ही या art galleries मध्ये curtor म्हणून सुद्धा काम करू शकता.
काय मग आवडली का आजची माहिती…
मित्रांनो कोणतेच क्षेत्र हे लहान-मोठे नसते. एखादी गोष्ट तुम्हाला आवडत असेल आणि ते करण्याची तुमची मनापासून ईच्छा असेल, तर मार्ग मिळतच जातात. फक्त गरज आहे ती त्या विषयात खोलवर जाऊन अभ्यास करण्याची. आणि ही वाट दाखवण्यासाठी नवी अर्थक्रांती नेहमी तुमच्या सोबत आहे.
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर लाइक आणि subscribe जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.
आणखी वाचा
- करिअरबद्दल निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? I Career counselling
- १० वी आणि १२ वी नंतर काय?