Business Plan: तुमच्या व्यवसायाची यशाची गुरुकिल्ली
BUSINESS PLAN
कोणतीही गोष्ट करताना आपण एक रफ प्लॅन बनवत असतो. आपण आखलेल्या प्लॅननुसार आपण दिवसभरातील कामकाज करत असतो. काही वेळेस तुम्ही केलेल्या प्लॅननुसार गोष्टी घडतात, तर काही वेळेस त्या घडत नाहीत, मात्र तरीही आपण प्लॅन हा बनवतोच. हे झाले आपल्या रोजच्या दिवसाचे. मात्र ज्यावेळी आपल्याला एखादा बिझनेस चालू करायचा असतो, त्यावेळी आपण आपल्याला वाटलं म्हणून कोणताही बिझनेस चालू नाही करू शकत ना! याचसाठी सर्वात महत्वाचे आहे ते Business Planning.
Business Plan ची सरळ सोपी व्याख्या म्हणजे असे document ज्यात कंपनीची उद्दिष्टे आणि ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठीच्या योजनांचा तपशील असतो. तुमचं उत्पादन बाजारात कोणत्या पद्धतीने येणार, ते कोणत्या ग्राहकाला आकर्षित करणार आहे, तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धीला कशी मात देणार, तुमच्या व्यवसायाचं बाजारमूल्य किती असणार, Business च्या बाबतीतला तुमचा दृष्टीकोन काय आहे यांसारख्या अनेक गोष्टींची मांडणी बिझनेस मॉडेलमध्ये असते. भविष्यामध्ये जशी परिस्थिती आणि गरज बदलते, त्यानुसार बिझनेस प्लॅन देखील बदलत असतो.
आता Business Plan करणं का गरजेचं आहे ते पाहूया.
पहिला मुद्दा म्हणजे कोणत्याही बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्याआधी इन्वेस्टर कंपनीचा बिजनेस प्लॅन बघतात. तो प्लॅन जर त्यांना convincing वाटला तरच ते तुमच्या business मध्ये गुंतवणूक करतात. तर दुसरा मुद्दा आहे लोनसंदर्भात. जर तुम्हाला तुमच्या business development साठी बँकेतून लोन घ्यायचे असेल तर बँकेला आधी हे सांगणं गरजेचं असत की तुम्हाला ते लोन कशासाठी पाहिजे आहे? तुम्ही मिळणाऱ्या पैशांचा वापर कशा पद्धतीने करणार आहात. जर तुमच्याकडे business plan असेल तर या सर्व गोष्टी explain करण तुम्हाला सोप्पं जातं.
तिसरा मुद्दा म्हणजे चांगले Employee मिळवण्यासाठी देखील बिझनेस प्लॅनचा उपयोग होतो. बरेच employee हे त्या ज्या कंपनीत काम करण्यासाठी इच्छुक आहेत त्या कंपनीचे future goals काय आहेत आणि ते आपल्या future goals ला पोषक आहेत का हे तपासतात. या सगळ्याचे तपशील त्यांना बिजनेस प्लॅनमध्ये मिळतात.
बिझनेस करताना अनेक अडचणी येतात आणि बिझनेस प्लॅनमुळे तुम्हाला आधीच त्याची तयारी करता येते.
आता वळूयात बिझनेस प्लॅनच्या प्रकाराकडे
बिजनेस प्लॅनचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे Simple Business Plan आणि दुसरा प्रकार आहे Detailed Project Report (DPR)
तर जाणून घेऊयात Simple Business Plan बद्दल
या बिजनेस प्लॅन मध्ये Short मध्ये एक-दोन पानांत किंवा ८-१० स्लाईडच्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व माहिती सांगितलेली असते. या प्रकारचा Business प्लॅन बऱ्यापैकी वापरला जातो. या plan मध्ये मार्केटची समस्या, तुम्ही त्यावर देत असलेले उपाय, तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस, तुमचे स्पर्धक आणि तुमची वैशिष्ट्ये, मार्केटिंग, ब्रॅंडिंग आणि सेल्स प्लॅन, व्यवसायाची उलाढाल, खर्च व नफा यांची अंदाजे गणितं हे सगळे महत्त्वाचे मुद्दे येतात.
आता जाणून घेऊयात Detailed Project Report बद्दल
हा बिझनेस प्लॅन एकदम Detail मध्ये लिहिलेला असतो. हा कधीकधी 25 ते 30 पानांचा देखील असू शकतो. यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक वर्षे मागदर्शन होत राहते, कारण यामध्ये सर्व माहिती एकदम Detail मध्ये लिहिलेली असते. बँका आणि Investor व्यवसायला Loan देण्याआधी किंवा Business मध्ये Investment करण्याआधी या बिझनेस प्लॅनची मागणी करतात. या मध्ये वर Simple Business Plan मध्ये नमूद केलेले सर्वच मुद्दे येतात. फरक फक्त इतकाच की वर हेच मुद्दे अत्यंत कमी शब्दांत येतात, तर यात सविस्तर येतात.
वरील दोन्ही Business प्लॅनमध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार अनेक गोष्टी अजून Add करू शकता किंवा यातील काही गोष्टी कमी देखील करू शकता.