Bootstrapping: व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग?
बिझनेस सुरु करायचा म्हटलं की, अनेक गोष्टींची माहिती असणं एका व्यावसायिकासाठी गरजेचं असतं, ज्यामुळे एखादा व्यवसाय यशस्वी करता येईल. स्टार्टअप विश्व या सिरीजमध्ये स्टार्टअप विश्वातल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण समजून घेत असतो. तर आज आपण पाहणार आहोत Bootstrapping बद्दल.
आत्तापर्यंत आपण angel investor, acquihire, acquisition, alpha आणि beta testing अश्या अनेक टर्म्स पहिल्या. याचे व्हिडिओस जर तुम्ही पाहिले नसतील, तर या सगळ्या व्हिडिओजच्या लिंक आम्ही description मध्ये देतोय. तुम्ही ते पाहू शकता.
तर आता येऊया Bootstrapping कडे. एखादा व्यवसाय उभा करण्यासाठी फक्त बिझनेसची आयडिया असून चालत नाही, तर खिशात पैसापण असावा लागतो. बिझनेस उभारण्यापासून ते प्रॉडक्ट तयार होईपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी पैशांची प्रचंड गरज असते. पैशाच्या याच गरजेला स्वखर्चातून पूर्ण करण्याचा एक मार्ग म्हणजे Bootstrapping.
सोप्या शब्दांत सांगायचं तर Bootstrapping म्हणजे व्यवसाय सुरु करण्यासाठी बाहेरुन पैसे न घेता स्वतःचेच पैसे वापरणे आणि जे पैसे व्यवसायातून मिळतील, त्याचा बिझनेस ग्रोथसाठी पुनर्वापर करणे. Bootstrapping ला Self Finance असे देखील म्हणतात. बऱ्याचदा आपल्याकडे एवढे पैसे असतात की त्यातून एखादा छोटासा व्यवसाय उभा राहू शकतो. ते पैसे आपण सेव्हिंग करून ठेवलेले असतात.
बिझनेससाठी सुरुवातीला अशा वेळी आपण त्या पैशांचा वापर करू शकतो. जेव्हा आपण बँकेतून लोन घेतो, त्यावेळी तेथे हप्ते भरावे लागतात, अँजेल इन्व्हेस्टरला शेअर्स द्यावे लागतात, पण Bootstrapping मध्ये कोणावरच अवलंबून राहण्याची गरज नसते. कारण तिथे तुमचे स्वतःचे पैसे असतात. यामुळे तुम्हाला हफ्ते फेडावे लागत नाहीत किंवा मिळणारा नफा इतरांसोबत शेअर करावा लागत नाही.
शेवटी एक लक्षात ठेवा तुमच्या व्यवसायाला Bootstrapping करत असताना त्यातल्या जोखमीबद्दल नेहमी जागरूक रहा. कारण यात रिस्क सुद्धा तितकीच असते, कारण जर तुमचं व्यवसाय चालला नाही तर तुम्ही तुमची सगळी कमाई गमावून बसता. झोहो, झेरोधा ही बूटस्ट्रॅपिंग, इंटर्न शाला, जगप्रसिद्ध Spanx कंपनी आणि Mailchimp ही ईमेल सॉफ्टवेअर कंपनी ही बूटस्ट्रॅपिंगची उत्तम उदाहरणं आहेत.
हा लेख विडीयो मध्ये पहा