Acquisition : व्यवसायातील एक महत्त्वपूर्ण टर्म
नवी अर्थक्रांतीच्या स्टार्टअपची या नव्याकोऱ्या सिरीजमध्ये पून्हा एकदा तुमचं स्वागत आहे. स्टार्टअप जगतात असे शब्द जे सर्रास वापरले जातात, पण त्यांचा अर्थ अनेकांना माहिती नसतो. अशाच शब्दांचा अर्थ सोप्या भाषेत या सिरीजमध्य आम्ही तुम्हाला समजावून सांगत असतो.
तर आजचा शब्द आहे (ॲक्वीजिशन)
Acquisition चा साधासोपा अर्थ म्हणजे अधिग्रहण किंवा संपादन करणे.
जर एखादी कंपनी दुसऱ्या एखाद्या कंपनीचा पूर्णपणे किंवा अर्धा किंवा त्यापेक्षा जास्त हिस्सा खरेदी करत असेल, तर त्या प्रक्रियेला Acquisition म्हणतात. ती कंपनी आधीच्याच नावाने आपले काम करत असते. acquisition मध्ये त्या कंपनीचे नाव बदलत नाही, फक्त काही टक्के शेअर्स हे त्यांचे होतात. जरी A या कंपनीने B हि कंपनी खरेदी केली, तरीही त्या दोघांचीही ओळख कमी होत नाही. या टर्ममध्ये दोन्हीही कंपन्यांचे फायदे हे होतातच.
एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीत विलिन होण्यामागे किंवा एखाद्या कंपनीने दुसऱ्या कंपनीचे अधिग्रहण करण्यामागे अनेक उद्देश असू शकतात, जसे की – बाजारहिस्सा एकत्र करणे, फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड इंटिग्रेशन, भौगोलिक अस्तित्व मिळवणे किंवा ग्राहकसंख्या विस्तारणे. साधारणतः एकमेकांत विलीन होणाऱ्या कंपन्यांची क्षमता यामुळे दुप्पट होते. ॲक्वीजिशन दोन प्रकारचे फ्रेंडली म्हणजेच मैत्रीपूर्ण किंवा होस्टाईल म्हणजेच शत्रुतापूर्ण. नुकतीच अदानी समूहाने एका न्यूज चॅनेल विकत घेतला. तो होस्टाईल ॲक्वीजिशनचाच एक प्रकार होता.
आता, तुम्ही म्हणाल, यात फायदा कसा काय? तर आपण लहान असताना एक गोष्ट ऐकली आहे
की, एका माणसाला चार मूलं असतात, तो प्रत्येकाला एक लहान काठी देतो, आणि ती मोडायला सांगतो सगळे जण लगेचच ती काठी मोडतात मग तो प्रत्येकाला एक-एक अशी लाकडाची मोठी मोळी देतो. आणि ती मोडायला सांगतो मात्र ती कोणालाच मोडता येत नाही.ती मूलं थोडा विचार करतात, चौघे एकत्र येतात आणि मग चौघे मिळून लाकडची मोळी सहज मोडतात. हेच ते एकीचे बळ. जर कोणत्याही गोष्टीत एकी असेल तर काहीच अशक्य नाही. हीच एकी आपल्याला acquisition मध्येही पाहायला मिळते. जर अनेक कंपन्या सारख्याच सेवा पुरवत असतील तर तिथे स्पर्धा निर्माण होते. मात्र जर त्याच 2 कंपन्या एकत्र आल्या तर तेथील स्पर्धक संख्या कमी होते. इतकंच नाही तर कंपनीची ग्राहक संख्या देखील वाढते आणि तुमचा ब्रॅंड आणखी स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते.
हे सगळं जरी खरं असलं, Acquisitionचा हेतू साध्य करणं फार अवघड काम आहे. एका रिपोर्टनुसार जगातील ५० टक्के कंपन्यांची Acquisitions फेल झाल्याचं दिसतं.