अ कप ऑफ कॉफी कॅन चेंज द लाईफ
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विस्डम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजचा विषय आहे; अ कप ऑफ कॉफी कॅन चेंज द लाईफ करायची सुरवात?
तुम्हाला बिझनेस करायचा व वाढवायचा आहे, मग मोठी कामे मिळविण्यासाठी क्लायंटना कसे पटवायचे हे जमले पाहिजे. समोरचा माणूस क्लाईंट असो, सप्लायर असो, कर्मचारी असो किंवा खबऱ्या असो, अशांना पटवायचे असेल, तुम्हाला हवी असणारी माहिती पाहिजे असेल, तर त्यांना एखाद्या चांगल्या ठिकाणी जेवायला निमंत्रण द्या. चांगले थ्रीस्टार, फाईव्ह स्टार हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा, कॅफे किंवा अशा काही ठिकाणी. चांगलं रुचकर जेवण कोणाला आवडत नाही? प्रत्येकजण खाण्यासाठी तर कमवितो. जेवणासाठी एकत्र भेटल्याने संवाद चांगला वाढतो, संबध अधिक चांगले प्रस्थापित होतात.
आम्हाला एका जिल्ह्यात बिझनेस प्रोजेक्टसाठी तेथील स्थानिक माहिती, जमीन, जागा, कामगार व इतर माहिती पाहिजे होती. आम्ही तेथील एका जाणकाराला एका ढाब्यावर जेवणाचे निमंत्रण दिले. त्याने चिकन रस्सा खायला सुरुवात केल्याबरोबर, आम्हाला हवी असलेली माहिती पटापट बाहेर येऊ लागली. अशी माहिती मिळवायला आम्हाला तेथे १५ दिवस राहावे लागले असते व आमचे हजारो रुपये खर्च झाले असते. पण केवळ एका जाणकाराला जेवायला बोलावून काम झाले. खरेतर मालाची देवघेव, कॉंन्ट्रॅक्ट, पैसे, चेक इत्यादी गोष्टी नंतर होणाऱ्या फॉरमॅलिटी असतात. खरे निर्णय तर असे ओव्हर लीड किंवा डिनरवरच होतात. कुणाचा माल घ्यायचा? कुणाला कॉंन्ट्रॅक्ट द्यायचे? काय टर्मवर व्यवसाय करायचा? हे तेथेच ठरते. पाश्चिमात्य देशात याला ‘बिझनेस ओव्हर कप ऑफ कॉफी’ म्हणतात. ‘अ कप ऑफ कॉफी टूगेदर कॅन चेंज द लाईफ’ म्हणतात ते खरंच आहे. आज अनेक बिझनेस मिटिंग्ज कॉफी शॉपमध्ये होतात व तेथेच लाखोंचे व्यवहार होतात. अनेकजण केवळ फोन, मीटिंगवर कोट्यावधीचा डील करतात.
आज बिझनेस करण्यासाठी तुमच्यामधले व्यवहार कौशल्य, गट्स महत्वाचे आहेत. तुमचे ऑफिस, फॅक्टरी, कंपनी किती मोठी आहे कोणी विचारत नाही. तुम्हाला डील करता आली पाहिजे, मार्केटिंग जमले पाहिजे. क्लाईंटबरोबर व्यवहार व संबध प्रस्थापित करता आले पाहिजेत. हे बिझनेस तंत्र तुम्हीही शिकून घ्या आणि आजमावून पाहा.
तुम्ही ही ट्रिक वापरली आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही माहिती आवडल्यास व्हिडीओ लाईक आणि शेअर करा. नवी अर्थक्रांती चॅनेल अजून सब्स्क्राइब केला नसेल तर आत्ताच सब्स्क्राइबसुद्धा करा.